एक शृंगारीक कविता

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
15 Sep 2008 - 7:05 pm

भिरभिरते अशी नजर कशाला
का, पदर चाचपून बघते ग.
भाळावरचे थेंब टिपूनी
का ,उगाच खुद्कन हसते ग.

एकांतामधी चावेचिमटे
कोण तपासून बघते ग
दाताखाली ओठ चावूनी
कोण उसासून थकते ग.

झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी ग
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली ग

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.

प्रेमकाव्यअनुभव

प्रतिक्रिया

विद्याधर३१'s picture

15 Sep 2008 - 7:11 pm | विद्याधर३१

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.

वा फक्कड कविता.... आवडली......
सुरेख...
विद्याधर

विनायक प्रभू's picture

15 Sep 2008 - 7:29 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
दहीवर म्हण्जे काय. खुप गोंधळ होतो आहे.
पीक लुटायला पहाटेपर्यंत वाट बघावी लागली.
फोर्मुला सांगा. सहजरावाच्या फेव्रिट धिरुभाई पेक्षा अमिर होईन.
गोफण कसली मध्ये कसली प्रश्नार्थक आहे का दुसरे काही.
दुसरे काही असले तर त्याचा पण फोर्मुला सांगा.
जगातल्या ३०% पूरुशांचे प्रोब्लेम सुट्तील.
बर आहे बाबा पहाटे पीक लुटुन गोफण कसलेली.
आय्ला कशाला काका लो़कांचे त्रास वाढव्ताय.
आपला चेला विनायक प्रभु

आयुर्हित's picture

3 Nov 2014 - 10:52 pm | आयुर्हित

फोर्मुला हवाय का?
तर मग व्यनि करा!

फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि करा!
आँ?? जापानचं त्याल इकणारं ते तुमीच काय ? :))

(फोर्मुल्याची गरज नसलेला) - SYG

बॅटमॅन's picture

4 Nov 2014 - 12:32 am | बॅटमॅन

ट्ठो =))

बाकी आपल्या हिकडंही लै जुने जुने फोर्मुले हाईत म्हनं. कुनाचा प्रसाद अन कायबाय ;)

रामदास's picture

15 Sep 2008 - 7:47 pm | रामदास

१ दहीवर म्हणजे सकाळी पडणारं धुकं +दव.
२ पीक बर्‍याच वेळा लुटलं गेलं.
३ गोफण म्हणजे साधी गोफण.
अंकल ,काय विचार आहे?

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

विनायक प्रभू's picture

15 Sep 2008 - 9:56 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कळत नकळत तुम्ही एक मास्टर पीस लिहिला आहे. बहुदा कळतच. मराठी भाषेच्या लवचिकतेचा आधार घेत. इंग्रजी मध्ये अनुवाद ह्याच प्रतीचा झाला तर मास्टर जॉन्सनचे प्रकाशक डॉलर मध्ये पैसे देतील. कॉपी राईट घ्या. रुटीन ला कंटाळ्लेल्या किंवा रुटीन च्या बाहेर चे जग माहित नसलेल्याना ही कविता संजिवनी आहे. विश्वास ठेवा मला लोणी लावायला अजिबात जमत नाही.
विनायक प्रभु

धनंजय's picture

15 Sep 2008 - 10:21 pm | धनंजय

लडिवाळ प्रसंग नाजुकपणे डोळ्यासमोर उभा राहिला.

शेवटच्या दोन ओळी पुन्हापुन्हा वाचाव्या लागल्या.
या ठिकाणी माझ्या डोक्यात पेरणीचे चित्र इतके घट्ट बसले आहे, (विशेषतः दिवस मोजायच्या संदर्भात) की पीक लुटले, गोफणीने रक्षण करायला उशीर झाला हे उपमाचित्र काही केले तरी चपखल बसत नाही.
तरी वेदकाळापासून रखडत आलेल्या तप्तमुद्रांकित "पेरणी"पेक्षा कापणीची तुमची उपमा तजेलदार, आह्लाददायक, गोड-वात्रट आहे. त्यामुळे कविता पुन्हापुन्हा वाचून पूर्ण अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2008 - 11:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शृंगारातल्या नाजुकपणाचा तोल शब्दात मस्त बांधलाय वाचायला मजा आली.

एकांतामधी चावेचिमटे
कोण तपासून बघते ग
दाताखाली ओठ चावूनी
कोण उसासून थकते ग.

क्या बात है ! उघड्या रानात चाव्याचिमट्यांच्या आठवणींनी उसासा नाही टाकायचं तर काय !
अप्रतिम चित्र उभ केलंय, जब्रा रे !

झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी ग
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली ग

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.

गोफनीची गरज पीक लुटून नये म्हणुन,तो केवळ धाक. पण आता बुगडी सांडली आहे, याच्यातच पीक नेल्याची खूण दिसते. तेव्हा बोटावर आता कोणता हिशोब करायचा ! असो, बर्‍याच दिवसानंतर एक चांगली कविता वाचायला मिळाली.

बेसनलाडू's picture

15 Sep 2008 - 10:23 pm | बेसनलाडू

कविता फार फार आवडली.
(शृंगारप्रेमी)बेसनलाडू

अजय जोशी's picture

15 Sep 2008 - 10:50 pm | अजय जोशी

अनुभवास प्राधान्य आहे. छान.

(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी

ऋषिकेश's picture

15 Sep 2008 - 10:51 pm | ऋषिकेश

;)
मस्त! एकदम मस्त!

-(लब्बाड!) ऋषिकेश

शैलेन्द्र's picture

15 Sep 2008 - 10:57 pm | शैलेन्द्र

सुरेख,

अस फक्त अनुभवि लोकच लिहु शकतात का हो काका?

फटू's picture

16 Sep 2008 - 7:01 am | फटू

मिपावर इंजिनियरींगला असणारी, नुकतीच इंजिनियरींग कॉलेज सोडलेली पोरंही आहेत बरं का...

बाकी,

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग

हे अगदी क्लास !!!

(शृंगाराचं पुस्तकी ज्ञान असलेला :P )
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 5:11 pm | विसोबा खेचर

रामदासराव,

साधी, सोपी परंतु तेवढीच सुंदर कविता आवडली....! :)

आपला,
(दहिवरप्रेमी) तात्या.

अप्पासाहेब's picture

17 Sep 2008 - 9:08 pm | अप्पासाहेब

लुटून गेले पीक पहाटे

ह्या ऐवजी

लुटून नेले पीक पहाटे

असा बदल करावा, जर 'गेले' हाच शब्द हवा असेल तर -

लुटले गेले पीक पहाटे

असा बदल करता येईल..

पटलं तर व्हय म्हना

आप्पा

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

रामदास's picture

18 Sep 2008 - 11:27 am | रामदास

नेले काय आणि गेले काय...
भरतपूर लूट गयो, मोरी अम्मा हे खरे..
टे.इ.इ.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

वाचून बघा. त्यात थोडी त्रुटी आहे.जो अपेक्षीत तो इंपॅक्ट आला नाही असं वाटतंय.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सर्वसाक्षी's picture

17 Sep 2008 - 11:18 pm | सर्वसाक्षी

रामदासशेठ
आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 12:12 am | विसोबा खेचर

आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला

सहमत आहे...!

स्वगत : आयला, हा रामदाससुद्धा अंमळ पोचलेला वाटतो! :)

तात्या.

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 10:20 am | मदनबाण

शेअर बाजारातुन डायरेक्ट कविता ? :)

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सुनील's picture

18 Sep 2008 - 10:33 am | सुनील

लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.

क्या बात है!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 7:36 pm | लिखाळ

रामदास,
कविता जबरदस्त. लयबद्ध. फार आवडली.
आपण महान आहात !
--लिखाळ.

दत्ता काळे's picture

23 Sep 2008 - 7:53 pm | दत्ता काळे

चित्रंच् डोळ्यासमोर उभं राह्यलं

संदीप चित्रे's picture

23 Sep 2008 - 7:56 pm | संदीप चित्रे

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.

व्वा ! इथल्या इथे नमस्कार घ्या रामदास.
बर्‍याच दिवसांनी महानोरांसारखी सकस कविता महानोरांशिवाय कुणाकडून तरी आली :)
लिखते जियो !

उत्खनक's picture

10 Mar 2013 - 10:28 am | उत्खनक

आवडले.

वैशाली हसमनीस's picture

10 Mar 2013 - 2:22 pm | वैशाली हसमनीस

कविता मनाला भावली.

टवाळ कार्टा's picture

10 Mar 2013 - 2:31 pm | टवाळ कार्टा

आयला भारी

अविनाशकुलकर्णी's picture

10 Mar 2013 - 4:29 pm | अविनाशकुलकर्णी

बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग

लाडिक अन सुचक

इनिगोय's picture

10 Mar 2013 - 9:23 pm | इनिगोय

मस्त रोमँटिक कविता.!

आई गं!

मस्त रोम्यांटिक कविता :)

आतिवास's picture

11 Mar 2013 - 11:13 am | आतिवास

अतिशय सुंदर, चित्रदर्शी, अर्थपूर्ण कवितेला इतकं 'गद्य' शीर्षक का दिलं असेल हा प्रश्न पडला आहे!

जेपी's picture

20 Oct 2013 - 8:40 pm | जेपी

लया भारी कवीता ,
या मीपाच्या खजीन्यात काय काय दडलय मिपाच जाणे .

स्वप्नज's picture

3 Nov 2014 - 7:51 am | स्वप्नज

मिपाच्या खजिन्यातले एक अप्रतीम रत्न...

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 9:09 am | टवाळ कार्टा

कचकचीत रोम्यांटिक एक्दम ;)

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2014 - 11:39 am | बोका-ए-आझम

सुंदर. लताबाईंनी गायलेलं एक अप्रतिम गीत - बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग - याची आठवण झाली. ही कविता म्हणजे त्याचा समर्पक उत्तरार्ध वाटतो.

सतिश गावडे's picture

3 Nov 2014 - 12:32 pm | सतिश गावडे

शुक्रवारी कवीशी प्रत्यक्ष भेटीत मनसोक्त गप्पा झाल्या त्यामुळे असं वाटतंय की रामदास काका कविता वाचत आहेत आणि आपण ऐकतोय.

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर उभा केलात .. अप्रतिम

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2014 - 2:40 pm | टवाळ कार्टा

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर उभा केलात .. अप्रतिम

"कहर"च आहे :प

आयुर्हित's picture

3 Nov 2014 - 10:54 pm | आयुर्हित

वाह रामदासजी, अनुभव व कविता उत्तमच आहे!
पण हे प्रेमकाव्य आहे कि प्रणयकाव्य?

बॅटमॅन's picture

4 Nov 2014 - 12:31 am | बॅटमॅन

त्याने काय फरक पडणार? की प्रेमकाव्य असल्यास फोर्मुला वेगळा अन प्रणयकाव्य असल्यास वेगळा असं काही आहे?

चिनार's picture

4 Nov 2014 - 11:36 am | चिनार

सुंदर कविता . नेमक्या ओळींमध्ये संपूर्ण प्रणयराधना वर्णिली आहे !!

विवेकपटाईत's picture

4 Nov 2014 - 1:13 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली कविता. आपल्या जवळ प्रेम करणार हृद्य आहे, नक्कीच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या सारखीच माझी प्रतिक्रिया आहे ! त्यांच्या प्रतिक्रियेतील एकही शब्द न पुसता मी इतकेच म्हणेन कि, कविता वाचताना चलतचित्र पाहतोय असा भास होत राहिला. खूप खूप आवडली शृंगार कविता !
क्या बात है! बर्‍याच दिवसानंतर एक चांगली कविता वाचायला मिळाली.