रागा रागानं घरातून बाहेर पडलेलं त्याच पाऊल मला अस्वस्थ करत होत . चिडण नवीन नव्हतं , स्वभाव तसा हेकेखोरच होता ,पण तरीही त्याच्या चिडण्याची सवय असूनही मला ती झेलण्याची ताकद मात्र अजूनही मिळत नव्हती .तो गेला तस मीही माझ आवरू लागले .रोज नाही पण बहुतेक वेळा एकत्र जान होत आमच .त्याच आणि माझ ऑफिस चार \पाच किलोमीटरच्या अंतरावर एकमेकांपासून ,त्यामुळे एकच गाडी काढायची .संध्याकाळी पुन्हा येताना एकत्र .कधी भाजी मार्केट तर कधी मुलानी ची भेळ , कधी कधी उगाच वेड्यासारख गाडी पार्क करून पायीच फिरायचो .अश्यावेळी खूप खुललेला असायचा तो ,तेव्हा नवरा कमी मित्र जास्त वाटायचा .लहान असतानाच्या ,कॉलेजातल्या , मामा , मावश्या ,अगदी आज्ज्या पन्ज्या पर्यंतच्या गप्पा मारत बसायचा ,हलवाव लागायचं एवढी तंद्री लागायची त्याची . गप्पांचा ओघ असा असायचा कि त्यात मला स्वतःबरोबर वाहात वाहात दूरवर न्यायचा .
आज तब्बल पंधरा दिवसांनी माझ्या गाडीला हात लागला होता .थोडी वरवर साफ करत मी फाटकातन बाहेर काढली . एकट जाणं जीवावर यायचं ,पण पर्याय नव्हता . गाडीच्या चाकांसोबतच मनाची चाक फिरू लागली . रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर येवून उभा राहिला .
रणधीर रात्री उशिरा घरी परतला होता .त्याच्या मित्राचं लग्न ठरलं होत ,त्याचीच पार्टी होती जुईनगर ला . ड्रिंक घेवून आला होता . बीअर घ्यायचा तो अधूनमधून ,शक्यतो घरीच ,कधी तरी सुट्टीच्या एखाद्या शनिवारी किवा रविवारी मस्त मूड बनवून प्यायला बसायचा . मी नाही अडवायचे ,कारण पिल्यानंतर भलताच रोम्यांटिक व्हायचा तो .मग कविता ,शेर ,शायरी ,खूप खुश असायचा . खर सांगायचं तर त्याच पिन आवडायचं नाही मला ,पण त्याच्या चेहेर्यावरचा तो आनंद ,त्याच स्वताहात हरवून गेलेलं बघायचा मोह आवरायचा नाही मला .गोड दिसायचा ,निरागस डोळे , खोडकर हसण , त्याचं नशेत असण म्हणजे मला न पिताच नशा चढण काय असत ह्याच प्रात्यक्षिक .काल रात्री तो ड्रिंक करूनच घरी आला . खूप उशीर पर्यंत वाट बघून बघून मी झोपून गेली ,त्याच्याकडे असणाऱ्या किल्लीनच दार उघडून आत आला .
अचानक होणार्या गरम स्पर्शान मी दचकून जागी झाले . काही कळायच्या आत , रणधीरन हातांच्या विळख्यात मला जखडल . का कुणास ठावूक ,पण मी स्वतःला सोडवून घेत होते त्याची घट्ट होणारी मिठी ,मी दोन्ही हातांनी जमेल तितकी ताकद लावून सैल करू पहात होते . तो चिडला , ओरडला माझ्यावर ,हातावरची पकड इतकी घट्ट केली कि हाताला मुंग्या आल्याच जाणवू लागल .ह्यापूर्वी रणधीर अस कधीच वागला नव्हता .रागाच्या भरात मी उशी घेवून ड्रॉइंग- रूम मध्ये येवून झोपले . झोप नव्हती लागली , पण त्याला शांत करण्याचा हाच एकमेव पर्याय वाटला तेव्हा .
पहाटे पाच वाजता मी खोलीत जावून पाहिलं तर तो तसाच अगदी तसाच झोपला होता .जवळ जाऊन मी त्याच्या चेहेर्याकडे पाहिलं . रात्रीचा रणधीर आणि आत्ताचा शांत झोपलेला रणधीर ,खूप फरक होता दोघांमध्ये . मी त्याच्या केसावरून हात फिरवला ,तशी त्याने कूस बदलली ,मग पायात रात्रभर तसेच असणारे पायमोजे काढून , पायाखाली गेलेलं पांघरून काढून त्याच्या अंगावर घातलं .क्षणभर जीव तिथेच रेंगाळला होता माझा . निपचित झोपलेलं त्याचं शरीर , शांत वाटणारा चेहेरा ,फार मस्ती करून थकल्यासारख वाटणारं , लहान मुल जस पाय गुढग्यात दुमडून झोपत , तसा झोपला होता रणधीर . बराच वेळ मग मी त्याच्या केसातून ,त्याच्या पाठीवरून ,प्रेमान ,मायेन हात फिरवत बसली होती ,जणू रात्रीच्या प्रसंगाला आपल्याच ओंजळीत सावरत होती .
रस्ता संपला होता .गाडी ऑफिसच्या गेटवर येवून पोचली . रोजचेच हे चेकिंगचे सोपस्कार . फुकटचे दहा बारा मिनिट इथेच वाया जातात . वैतागलेला चेहेरा करतच मी डिकी ओपन करून दिली . मग सरळ गाडी पार्किंग मध्ये लावून ऑफिसात शिरली . आज तो उठल्यापासून अजिबात बोलला नव्हता . आधी वाटलं अपराधी पणा जाणवत असेल त्याला ,पण त्याचा स्वभाव होता ,काहीच न बोलण्याचा . चूक असली तरी बोलायचा नाही , नसली तर काय मग ..साहेब सातव्या आसमानावर असायचे .मला सवय लागली होती त्याला सांभाळून घ्यायची ,त्याला जपायची . किती का चुका करेना ,कसाही का वागेना ,पण माघार घ्यायला मला कसलीच लाज वाटायची नाही ,माझ प्रेम होत त्याच्यावर ..मनापासून ..अगदी मनापासून .
विचारांच वादळ डोक्यात पिसाट सुटल्यासारख , तरीही मन शांत ,चेहेरा हसरा ठेवून काम करण्याचा प्रयत्न करू लागले . खूपच अस्वस्थ वाटू लागल . मी ऑफिसात पोचल्यावर बरोब्बर पंधराच मिनिटांनी रणधीर फोन करून पोचल्याची वर्दी द्यायचा . त्यानंतर दर दोन तासांनी फोन . पण आज त्याचा एकदाही फोन आला नाही .
म्हणून मीच केला ....." हम्म बोल "
काही नाही रे सहज ,सकाळपासून आत्ता जरा फ्री झाले , म्हणून म्हटलं तुला फोन करावा "
" मी कामात आहे ,नंतर बोलू " अस म्हणून ठेवूनही दिला .
मला सहनच झाल नाही . माझी मीच रडत होते आतून . डोळे पाण्यानं भरून सुद्धा अश्रूंची ओघळन्याचीही हिम्मत होईना .कुठेतरी कुणाशीतरी बोलाव ..म्हणून आईला फोन लावला. तिला सांगायचं तर काहीच नव्हत ,पण तिच्याशीच बोलावस वाटलं.फोन केला तेव्हा ती घरी एकटीच होती .
" सकाळपासून फोन वर फोन ग बाई " अस म्हणताच मला जाम टेन्शन आल ,म्हटलं " काय झाल .सगळ ठीक आहे ना? "
" नाही ग ..सकाळपासून मामीचा दहावेळा फोन झाला ..निशा रात्री घरी आलीय ,तेव्हापासून सगळेच काळजीत आहेत .."
" अस झाल तरी काय ..अचानक "
नवरा बायकोची भांडण ..दुसर काय ....."
आईच्या ह्या वाक्यानं पोटात गोळाच आला .पुढे नेहेमीचच बोलून फोन ठेवून दिला ..आणि कुठून दुर्बुद्धी सुचली नि फोन केला अस झाल .रणधीर सारखाच डोळ्यापुढे येवू लागला . आमच्या लग्नाला तीन वर्ष उलटून गेली होती , तरीही दोघातलं शारीरिक ,मानसिक आकर्षण तिळमात्र कमी झाल नव्हतं .जीवघेणा असायचा त्याचा अबोला , पण मी तितकीच चिवट ,त्यामुळे सकाळी धरलेला अबोला रात्रीच्या कुशीत मिटून जायचा ...पण हा अबोला रात्रीच्या कुशीतच धरला गेला होता त्यामुळ जास्तच निर्दयी बनला होता .
आयुष्यातली तीन वर्षात ,पुढे पुढे सरकलेली संसाराची पान भरभर डोळ्यासमोरून उलटली ,त्यात जगलेले रुसवे ,फुगवे ,प्रेम ,आनंद सगळच आत्ता आत्ता घडल्यासारख ताजतवान .रणधीर रागावला होता ,हे त्याच्या बोलण्यावरून मी ओळखल होतं . खरतर मीच रागवायला हव ,तर हाच फुगून बसलाय ,नेहेमीच असा वागतो ,अगदी लहान मुलासारखा .मला त्याला शांत बसलेलं बघायला अजिबात आवडायचं नाही , त्याचा शक्य तितका बोलका सहवास मी जगून घ्यायचे ,आवडायचं मला त्याच्याशी बोलायला ,त्याला बोलत करायला .खोल रुतलेल्या भावनानाही मग शब्दांच रूप देत बसायचा .कोण जाणे काय होत त्याच्यात ,पण क्षणभरही मला त्याच्याशिवाय करमायचं नाही .
बस ठरलं तर ,साहेबांचा रुसवा काढायचा .
पाच वाजायची आतुरतेने वाट पाहत होती आज मी . रणधीरला फोन करून त्याच्या मूडचा अंदाजा घ्यायचा ठरवलं . फोन केलाही मी ,पण त्याने उचलला नाही ,बहुतेक मीटिंग मध्ये असेल ,किवा ड्रायीव करत असेल ,म्हणून मी पुन्हा प्रयत्न केला नाही . बरीच काम तशीच पेंडिंग ,अक्षरश: उद्यावर ढकलून मी घरी जायला निघाले .जाता जाता मार्केट मधून त्याच्या आवडीचे मासे आणि थोडफार रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागणारे जिन्नस घ्यायचे होते .
आज त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायचा ..रणधीरच्या प्रेमाचा रस्ता त्याच्या पोटापासनच चालू होतो .खाण्याचा खूप शौकीन . चमचमीत ,तिखट आणि तेवढच गोडही आवडायचं त्याला .सगळ्या गोष्टी वेळेत आटोपून मी घरी पोहोचले . दारात त्याची गाडी उभी असलेली दिसली . " स्वारी आज लवकर आली आहे " अस मनाशीच पुटपुटत मी गाडी पार्क केली .तो आत आहे हे माहित असूनही मी दारावरची बेल मारली नाही .पर्स मधून किल्ली काढून दार उघडलं .रणधीर कसल तरी मासिक चाळत बसला होता .एकदाही माझ्याकडे न पहाता तसाच ..तिथेच .मी शांतपणे आत आले .त्याच अस दुर्लक्ष करणं जाम खटकल होत मनाला , जे काही घडल होत ,ज्या कारणावरून अबोला धरलाय त्यात नक्की चूक कुणाची होती? मग स्वतःची चूक कबूल करण्यात कसला आलाय अपमान ? तेही आपल्याच माणसापुढे मन मोकळ करायचं आहे ना ,कि कुणा लोकांपुढे जावून गार्हाण मांडायचंय ? अस्वस्थ झाले होते मी ,एकटी पडले होते .वाटलं पुन्हा आठवून बघावं सांर ,कि माझ कुठे काही चुकल का? मी अस का वागले तेव्हा? ज्याच्या विचाराशिवाय दिवसातला एक क्षण जात नाही ,त्याचाच सहवास मी का नाकारला त्यावेळी? त्याच्या स्पर्शाला का घाबरले मी? कशाचच उत्तर सापडत नव्हत .
हात पाय धुवून मी चहा ठेवला . आज फिश फ्राय , फिश करी करण्याचा बेत आखला होता . रणधीरची आवडती डिश म्हणजे चमचमीत ,मसालेदार शालोव्फ्राय फिश . मी तयारीला लागले होते ,पण एकटीच होते .एरवी रणधीरला चैन पडायचं नाही .हॉल ते किचन सारख्या फेर्या मारत बसायचा ,माझा स्वयंपाक होईपर्यंत कधी कधी किचनमध्येच गप्पा मारत बसायचा ,कधीमध्ये मदतहि करायचा ..पण आज अजिबात नाही .आज त्याने माझ्याकडे पाहिलही नव्हतं .
फार कसतरी झाल होतं , वाटलं जावून बोलावं ,विचारावं "काय चुकल रे माझ ? का अस वागतोयस ? पाहिजे ती शिक्षा दे पण अबोला सोड ..माझा जीव कासावीस करतो हा अबोला ..दिवसातला बराच काळ तुझ्यापासन दूर असते शरीरानं ,पण मन मात्र तुझ्याच भोवती घिरट्या घालत असत माझ ..मला समजाव ,माझ कुठे काही चुकल असेल तर ..पण हा जीवघेणा खेळ सोड रे ..." आता मात्र डोळ्यातलं पाणी मोकळ्या वाटेनं वाहू लागलं .
मी चहा घेवून हॉल मध्ये आले ," चहा घेतोयस ना ?" त्यावर फक्त एक रुसलेला स्वर आला " हम्म " ..
मी म्हटलं " काही खाणार का ? " त्यावर पुन्हा " हम्म " . मी आत जावून चहासोबत खायला बिस्किट्स घेवून आले . पुन्हा एकजात शांतता अगदी एकसाथ नमस्ते म्हणत हजर .मी नंतर स्वयंपाकाला लागले .बाहेर रणधीरची चुळबुळ सुरु झाली होती ..त्याला भूक सहन व्हायची नाही . आणि अस थोडफार भांडण झाल कि बोलायचा नाही पण त्याला करमायचं नाही माझ्याशिवाय .सांगत नसला तरी त्याच्या हालचालींवरून कळायचं .स्वयंपाक आवरून मी ताटं वाढली आणि त्याला हाक मारली . शांतपणे येवून जेवायला बसला . आता थोडासा राग निवळला होता त्याचा . चेहेरा वाचायची इतकी सवय लागली होती मला कि तो कधी काय विचार करेल ह्याचा जास्त नाही पण थोडा तरी अंदाज लागायचा मला .
किचन आवरून मी बेडरूम मध्ये गेले तर हा अजून तेच मासिक चाळताना दिसला . चेहेरा शांत आणि सुन्न ,कसलेच भाव नव्हते .ना रागावण्याचे ,ना चीडण्याचे ,कसलेच नाही .ओझरातच माझ्या येण्याचा अंदाज घेत त्याने नजर पुन्हा त्या मासिकात लावली . मी जावून त्याच्या शेजारी बसले तस मासिक ठेवून कूस बदलून झोपण्याच नाटक . मग मात्र माझा बांध सुटला ..
" रणधीर किती रे आर्जवी करायच्या ..निदान माणसाच्या वागण्या बोलान्यातन तरी जाणवून घेत जा ना ...अस काय चुकल माझ ..सतत हवाहवासा असणारा तुझा सहवास नकोय का मला ? ..पण ..पण कालच्या रात्री मी बेसावध असताना तुझ अचानक येवून मिठीत घेण ..खूप घाबरले होते मी . गाढ झोपेत होती रे कळलंच नाही काही ...आणि अचानक येवून तू घट्ट केलेली मिठी मला खूप दचकवून गेली .मला तुझ्या हळुवार स्पर्शाची सवय आहे रे ..मखमली सारखा तुझा सहवास ..ह्या रात्री उमलणार्या रातराणीच्या गंधा सारखा भासतो मला .. त्या गंधात प्रेम , अलगद स्पर्श ..त्रुप्तीच शिखर गाठणारे श्वास ,नितांत सुखाची आशा दाखवणारी तुझी नजर ..सगळ्या सगळ्याच गोष्टींची इतकी सवय लागून गेलीय कि त्यातला नाजूक पणा ..हळवेपणा मला जास्त महत्वाचा वाटतो ...दोन शरीरांच मिलन हे तेव्हाच सुखद होत ..जेव्हा ती दोन मन मनापासून एकरूप होण्याची इच्छा व्यक्त करतात , एकमेकांच्या भावनानशी हितगुज करतात ."
माझा आवाज भयान कापरा झाला होता , शब्दही साथ सोडू लागले होते . बोलता बोलता मी केव्हा रंधीराच्या खांद्यावर डोक ठेवल मला कळलंही नव्हत .
जणू ' कुठ्लीका वेळ असेना मला सावरायला फक्त तूच हवायस ..आधाराच दुसर नाव म्हणजे तू '
रणधीर आश्चर्यान भरलेल्या नजरेन माझ्या डोळ्यात पहात होता ...
" काही क्षण खूपच असुरक्षित असल्यासारख वाटत होतं , वाटलं अस का झाल असावं ,तुला माझा स्पर्श ,माझा सहवास का नकोसा झाला असेल ,आधी कधीच चुकूनही आढेवेढे न घेणारी तू ,अचानक मला दूर करताना पहिल्यांदाच अनुभवलं . नशेत होतो ,त्यामुळे जाणीव खोल झाली ,पण स्त्री कुठल्याही प्रसंगी खूप सावध असते हे पटलं बॉ ..."
सुटला होता अबोला त्याचा ..तिरपे ओठ करून हसला होता ,नजरेचे खेळ चालू झाले होते ..हळुवार बोटात बोट गुंतवण चालू होतं ...क्षणभर श्वासाचं थबकन जाणवल होतं ..हळव्या स्पर्शाची लाघवी हाकही मनान ऐकली होती ,सहवासाची नितांत गरज एकमेकांच्या भावनाना जाणवली होती ..हळुवार मी त्याच्या मिठीत सामावली होती .
धुंद रातराणी ,तिच्याच गंधाच्या स्पर्शात तन्मयतेन दरवळत होती .
मला आवडतोस म्हणण्यापेक्षा,
माझाच आहेस अस म्हणेन..
तुझ्यावर प्रेम आहे म्हणण्यापेक्षा,
जीव अडकलाय तुझ्यात अस म्हणेन ..!!
************************---/\---*************************
प्रतिक्रिया
31 Mar 2012 - 10:52 am | रुमानी
मस्तच ग !
छान लिहिलेस स्त्री मनाचा भावनिक आर्जव .......
31 Mar 2012 - 11:24 am | शैलेन्द्र
मस्तच ग/ छानचं गं/ कस्स जमत गं असे प्रतिसाद दील्यानंतर होणार्या परिणामांना तयार रहा.. :)
31 Mar 2012 - 11:14 am | शैलेन्द्र
:) छान.
31 Mar 2012 - 12:01 pm | रुमानी
शैलेन्द्र
धन्यवाद !सागीतल्याबद्दल.
31 Mar 2012 - 1:38 pm | अमितसांगली
अप्रतिम..........खूप आवडल तुमच लिखाण....
31 Mar 2012 - 1:41 pm | तर्री
आवडले.
31 Mar 2012 - 2:11 pm | किचेन
छान...
31 Mar 2012 - 2:12 pm | बॅटमॅन
छान!
31 Mar 2012 - 11:08 pm | निनाद मुक्काम प...
दोन जीवांची घालमेल .नात्यांचा गुंता अश्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या विषयात तुमचा हात कोणीही धरू शकत नाही.
असो प्रस्तुत लेखात अवचित पणे हात धरल्याने पुढचे रामायण घडले. पण शेवट गोड झाला.
1 Apr 2012 - 9:12 am | प्रचेतस
लिखाण छान.
आवडले.
1 Apr 2012 - 12:13 pm | सानिकास्वप्निल
छान :)
1 Apr 2012 - 12:40 pm | इरसाल
अप्रतिम. आवडले
2 Apr 2012 - 12:07 pm | नन्दादीप
आवडले...... मस्त...
2 Apr 2012 - 12:13 pm | मन१
भावनिक ह्या कॅटॅगरीअमध्ये छान झाले आहे.
2 Apr 2012 - 7:42 pm | जेनी...
धन्यवाद..!!
वाचकांची मनापासुन आभारी आहे .
शुद्धलेखनासाठी मदत केल्याबद्दल
श्रियुत अन्या दातार ह्यांचे मनपूर्वक आभार.
विषेश वेळ काढुन कथा वाचुन त्यानी लेखनातले अशुद्ध शब्द..
शुद्ध करन्यास मदत केलि त्याबद्दल त्यांचे पून्हा एकदा आभार.
नव्या लेखका\ लेखिकेंसाठी मिपावर असे मदत करनारे सदस्य आहेत
ह्याबद्दल मिपाचं कौतुक वाटतं.
धन्यवाद.:)
2 Apr 2012 - 7:49 pm | प्रास
वाचकांची मनापासून आभारी आहे .
शुद्धलेखनासाठी मदत केल्याबद्दल
श्रीयुत अन्या दातार ह्यांचे मनपूर्वक आभार.
विशेष वेळ काढून कथा वाचून त्यानी लेखनातले अशुद्ध शब्द..
शुद्ध करण्यास मदत केली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार.
नव्या लेखका\ लेखिकेंसाठी मिपावर असे मदत करणारे सदस्य आहेत
ह्याबद्दल मिपाचं कौतुक वाटतं.
पूजाबैंच्या शुद्धलेखनासाठी आमचाही हातभार.....
2 Apr 2012 - 7:54 pm | जेनी...
आयला हो तुम्हाला विसरलिच कि मी :(
तुम्हाला प्रतिक्रियेतलं शुद्धलेखन सुधरवन्यासाठी मदत केल्याबद्दल तुमचे आभार ..प्रसाद अकोलकर सायेब.
:D
thank you ...:)
3 Apr 2012 - 1:19 am | अविनाशकुलकर्णी
छान लिहिले आहे.. आवडेश
3 Apr 2012 - 4:04 am | सुहास..
छान लिहीतेस गो बाय ;)
बाकी, आम्हा पुरुषांच होत बर का अस , उसन अवसान आणुन भांडलो तरी बायडी शिवाय करमत नाय हे बाकी खर ;)
' नसतेस घरी तु जेव्हा
'
अवांतर : चला , स्त्री च्या कोमल भावना लिहीणारी ( लेखिका, कवयित्री नव्हे , कवयित्री म्हणशील तर , एक प्राजु तै आणि क्रांती काकु सारख लिहाव कोणी !! शपथ आहे ;) ) भेटली ब्वा आंजा ला !!
3 Apr 2012 - 9:33 pm | निनाद मुक्काम प...
सलील तू तमाम कुलकर्ण्यांचे स्फूर्तीस्थान आहे.
तू जर स्वतःला गायक ,संगीतकार ,निवेदक आणि काय काय म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकतो हे पाहूनच आम्हीच काय पाप केले आहे असे वाटून मी बोरू हातात घेतला.
काहींनी राष्ट्रीय पारितोषिक पटकावली.
लगे रहो .
मी जेव्हा कधी माझा दिवाळी किंवा असाच एखादा अंक काढेन तेव्हा माझ्या मानलेल्या गुरूला उद्घाटनाला बोलवेन ( तशी पध्धत आहे म्हणे )
16 Dec 2012 - 4:26 am | जेनी...
आणि हा लेख पण हवाय . प्लिझ हेल्प मी :(
16 Dec 2012 - 1:31 pm | श्री गावसेना प्रमुख
तु ठीक तर आहे ना.
की येउ