जनातलं, मनातलं
साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते.
सरडा चेला तर नेता गुरू
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो.
भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्हाडे
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
|| उत्कीर्ण विनायक ||
"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल.
तो : उत्कीर्ण !
"काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!"
तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती"
हृदयाची गोष्ट...
अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ?
संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.
श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास
✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए"
✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही
✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं
✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत
✪ क्षमतेला साकार करण्याची वाट दाखवणारी शिक्षिका
अवघड काळात निर्णय कसा घ्यावा?
कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे.
महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -
"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"
माईलस्टोन....
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं न
मदत हवी आहे,,,
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय.
हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे.
कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात?
चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते !
संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास !
प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे .
अभ्यास केला पाहिजे .
कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .
- 1 of 989
- next ›