धुके असे पडले की

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
5 Nov 2025 - 9:01 pm

धुके असे पडले की

धुके असे पडले की
धुक्याचा महाल आकाशी
सोपान त्याचा असा की
त्यावरी उभी तू टोकाशी

तू परी अस्मानीची
मी फकीर धरतीचा
वाट अशी भयंकर
मार्ग नसे परतीचा
विचार तरी काय करावा ?
तोही थांबला तर्कापाशी

सोपानावरून खुणवू नको
जीवाची होईल तडफड
तुजसवे वर जायाचे तर
प्राणपाखरू करेल धडपड
इथे जगुनी काय करावे ?
आता जावे स्वर्गलोकाशी

हे ठिकाण

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे ,
पण गल्ली चुकली आहे असे नमूद करून खाली बसतो

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Nov 2025 - 10:51 pm | बिपीन सुरेश सांगळे

राऊतजी
खूप आभार

आणि सर्व वाचकांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Nov 2025 - 10:52 pm | बिपीन सुरेश सांगळे

कविता कशी पहावी ? ... असो
ज्याची प्रेयसी देवाघरी गेली आहे अशा एका प्रियकराची ही वेदना आहे .
त्यामुळे अर्थ लागेल