काथ्याकूट

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in काथ्याकूट
1 Oct 2025 - 18:41

आरती हवी आहे

नमस्कार .

मला एक आरती हवी आहे .
कोणी सांगू शकाल का ?

तिची सुरुवात खालीलप्रमाणे -

जय देवी जय देवी जय राम माते
जय दीनानाथे
आरती ओवाळू भावार्ति ओवाळू तुझी माय आनंदे

आभार

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
28 Sep 2025 - 21:57

ठाणे अरबस्तान ला जोडण्याचा कुटील डाव ?

स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.

आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
26 Sep 2025 - 20:09

आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

हे गाणे श्री गदिमा यांनी एका लहान मुलीच्या तोंडी लिहिले आहे कि लहानपणी आई कसा जाच करते, ते मी तिची आई झाले तर तिला दाखवून देईन या अर्थाने.

आता स्थिती उलटी होऊ घातली आहे. मुलगा किंवा मुलगी आज आईबापांना जास्त दिवस सांभाळतो अशी स्थिती आली आहे

हि आज अनेक घरात दिसणारी कहाणी आहे. सत्य घटनांवर आधारित आहे. नावे अर्थात बदलली आहेत.

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
24 Sep 2025 - 10:54

लंडनस्थित मिपाकर

लंडनमधे वास्तव्यास असलेले मिपाकर आहेत का कोणी?

लंडनमधे काही कामानिमीत्त २५-३० सप्टेंबर असणार आहे, जमल्यास एका संध्याकाळी भेटून मिपाकट्टा करता येऊ शकेल.

कोणी उत्सुक असल्यास कळवा.

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
13 Sep 2025 - 21:46

"Honey, it's not about money"

मागच्या आठवड्यात सलग ३ वेळा ३ वेगवेगळ्या लोकांकडुन तोच जुना डायलॉग ऐकला म्हणजे मला नाही ऐकवला कोणी. इन जनरल बोलण्याच्या ओघात मारला.
"पैशासाठी वेडी झालेली आहेत लोक हल्ली,
"पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते,"
"पैसा जणु देवच झालाय आता, "
थोड्याफार फरकाने उन्नीस बीस इधर उधर पैशा संदर्भात तेच ते तेच ते
मनात विचारचक्र सुरु होण्यास इतकं trigger पुरे होतं.

Bhakti's picture
Bhakti in काथ्याकूट
10 Sep 2025 - 21:25

सध्या काय पाहता?(२०२५)

जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
1

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
6 Sep 2025 - 21:49

चालू घडामोडी सप्टेंबर २०२५

६ सप्टेंबर आला तरी चालू घडामोडींचा धागा दिसत नव्हता, म्हणून सुरू केला. बहुधा सगळे गणपतीत मग्न आहेत.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
5 Sep 2025 - 13:39

वोट चोरी वर चर्चा

बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.

गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.”

चिखलू's picture
चिखलू in काथ्याकूट
26 Aug 2025 - 01:57

आर्थिक खिचडी

अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे. वय ४८. २ मुले, बायको खाजगी शालेत शिक्षिका, पगार जास्त नाही. मोठा मुलगा PICT मध्ये Open Category मध्ये CS ला दुसर्या Year ला.

dadabhau's picture
dadabhau in काथ्याकूट
25 Aug 2025 - 10:34

फकीरा १९६३

अण्णाभाऊंचा मराठी चित्रपट "फकीरा"(१९६३) बराच शोधूनही मिळत नाहीये..कुणी मिपाकर हा पिक्चर फुकट किंवा विकत कसा बघता येईल यासाठी काही मदत करु शकेल तर अवश्य करावी ही नम्र विनंती.

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
25 Aug 2025 - 09:10

"नाते कुठवर सांभाळायचे"

"नाते कुठवर सांभाळायचे"

प्रेरणा- https://www.misalpav.com/comment/1197629#comment-1197629

हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय -

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
16 Aug 2025 - 12:28

स्वतःचे घर की भाड्याचे घर?

- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
12 Aug 2025 - 17:24

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
10 Aug 2025 - 09:33

संमतीवय: १८ -> १६

संमतीवय: १८ -> १६
============

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
6 Aug 2025 - 07:01

लोकतंत्र वाचविण्यासाठी "SIRची" आवश्यकता

मतदाता यादीचे विशेष गहन पुनरीक्षण करणे म्हणजे SIR. नुकतेच बिहार राज्यात निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया राबवून मतदार यादीतील नावांची सत्यता तपासली. निवडणूक आयोगाने मृत, स्थलांतरित किंवा एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत मतदारांची नावे मतदाता यादीतून हटवली.

बिहार मध्ये राबविलेल्या SIR प्रक्रियेचे परिणाम :

मुख्य निष्कर्ष (जुलै 2025 पर्यंत):

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
1 Aug 2025 - 15:26

दिवाळी अंक २०२५ - आवाहन

आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत.

दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत.

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
1 Aug 2025 - 10:01

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे.

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
30 Jul 2025 - 19:38

आले अंबानीच्या मना

नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते.

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
30 Jul 2025 - 08:56

दारू आणि गरीबी

दारू आणि गरीबी
=========

आत्ता सकाळी माझ्या प्रात:कालीन बाजाराच्या अभ्यासात एका समभागाने माझे लक्ष वेधले. तो समभाग म्ह० युनायटेड स्पिरीट. जूनपासून हा समभाग बराच गडगडला आहे आणि सध्या त्याची घसरगुंडी थांबली आहे, असे वाटत आहे.

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Jul 2025 - 13:57

जुलै ११, २००६ चे शेवटी दोषी कोण?

जुलै ११, २००६ केवळ 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, या स्फोटांच्या मालिकेत 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. हा मुंबईच्या इतिहासातील काळा अध्याय ठरला होता.