नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन
काथ्याकूट
लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280
पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.
चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
धनवापसी : एक आयडिया
दिल्ली मधील मोक्याच्या जागी खालील समाधी स्थळें आहेत.
राज घाट : ५ एकर (गांधी)
शांतीवन : ५२ एकर (नेहरू)
विजय घाट : ४० एकर (शास्त्री)
शक्तिस्थळ : ४५ एकर ( इंदिरा)
समता स्थळ : १२ एकर
किसान घाट : १९
वीर भूमी: १५
एकता स्थळ : २२
एकूण जागा : २१० एकर.
हो .... आम्हाला लाज वाटते ....
1. नेहरू यांना, भारताचे तारणहार म्हणायला.... चीन आणि काश्मीरचा प्रश्र्न व्यवस्थित न हाताळल्या बद्दल, चीनला, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत, आपल्या जागी नेमल्या बद्दल .... तशी नेहरूंनी, भारताच्या मागे भरपूर शुक्लकाष्ठे लावली आहेत, पण चीनच्या बाबतीत प्रचंड हेळसांड करून ठेवली आहे ...
इंग्लंडचा भारत दौरा
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. या दौर्यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
कसोटी सामने
पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
न्यूड फोटो शूट
एका अभिनेत्रीची न्यूड फोटोशूटवरची मुलाखत पाहीली. तिचं नाव वनिता खरात. ती म्हणतेय, "आत्तापर्यंत आयुष्यात कधी स्लीव्हलेस सुद्धा घातलं नव्हतं आणि आता न्यूड फोटो. या सगळ्याच्या यशाचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांना त्यांनी हे सगळं अक्षरशः पटापट दोन तासात उरकलं.
हे दोघे आजूबाजूला असताना माझ्या अंगावर कपडा नाही याचं मला काहीही वाटलं नाही"
खादी आणि हातमाग
भारत एके काळी वस्त्र निर्माणातील आघाडीचा देश होता. सुती कपड्यांचा शोध भारतातूनच लागला असावा कारण ग्रीक लोक जेंव्हा भारतात आक्रमण करायला आले तेंव्हा सुती कपडे पाहून त्यांना विलक्षण नवल वाटले. झाडावर उगवणारी लोकर अश्या पद्धतीने त्यांनी कापसाचे वर्णन केले होते आणि चित्रे सुद्धा काढली होती.
भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?
आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे.
आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही.
अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत.
आपण पॉडकास्ट ऐकता का ?
इंग्रजी भाषा सोडून आपण देशी भाषांतील पॉडकास्ट ऐकता का ? पॉडकास्ट हा शब्द "श्राव्य मजकूर" अश्या अर्थी वापरला आहे. संगीत सोडून इतर कोणत्याही प्रकरज मजकूर तुम्ही ऐकता तर कसे ऐकता, कुठे ऐकता इत्यादी माहिती द्या. काही लोकांना पु ल देशपांडे सारख्या लेखकांचे विनोदी वाचन ऐकायला आवडते तर काही लोक अध्यात्मिक प्रवचने वगैरे ऐकतात.
प्रतिभा आणि त्यातली करिअर्स
प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?
प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?
क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?
प्रायव्हसी – भाग ३
आंतरजालावर किंवा एकंदरीत जर प्रायव्हसी जपायची असेल तर मग प्रायव्हसी आणि सोय (Privacy Vs convenience) हा महत्वाचा मुद्दा ठरतो. प्रायव्हसी जपण्यासाठी तुम्ही स्वतःची सोय किती बघता किंवा कितपत गैरसोय तुम्हाला मान्य आहे, यावर तुमची प्रायव्हसी अवलंबून आहे.
Zone 1 सोपे, सहज शक्य. (या गोष्टी नक्कीच करा)
डेकोरम
ट्रम्प तात्या ह्यांचा अमेरिकन विलेक्शन मध्ये दारुण पराभव झाला. अर्थांत दारुण हे विशेषण इथे अनावश्यक होते पण तात्यांच्या हेकेखोर आणि असंतुलित व्यवहाराने तो पराभव दारुण ह्याच श्रेणीत गेला. तात्यांनी इलेक्शन तर घालवलेच पण रुडी सारख्या अतिवृद्ध आणि थकल्या वकिलाच्या नादी लागून सर्वत्र आपली शोभा वारंवार करून घेतली. तात्यांच्या नादात सिनेट सुद्धा रिपब्लिकन लोकांच्या हातून गेली.
भंडारा ते पुणे कारण काय
महाराष्ट्र भंडारा जिला दवाखाना येथे बारा बालगोपाल आगीत मृत्युमुखी पडले ते केवळ निष्पाप जीव आणि ज्यांनी अजून डोळे उघडले नाहीत तोच कायमचे मिटले
हा एक विचार येतो कि आग यंत्रणा येथे का असू नये किंवा जर असली तर कर्मचारी झोपी गेले होते का आणि यांची चौकशी कधी होणार
हि आग शमते नाही तोवर गेल्या काही दिवसांपूर्वीची हि घटना आहे तर पुणे येथे सिरम मध्ये आगीत भर दुपारी सहा कामगार आगीने मेले
सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य....
लहानपणी एक कथा वाचली होती.
एका गावात चार हुषार विद्यार्थी रहात असतात.पुढील शिक्षण घेण्यासाठी, ते एका गुरू कडे जायचे ठरवतात.हाताशी, एखादा स्वयंपाकी असावा, म्हणून ते गावातीलच एका माणसाला बरोबर घेतात.
चौघेही विद्यार्थी, गुरूकडून शिक्षण पुर्ण करून गावी येत असतात, बरोबर स्वयंपाकी असतोच.
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.
3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,
केवायसी, एक बँकानुभव
मिसळपाव वर दोन चार धागे वाचून झाले आठ दहा कॉमेंट्स करून झाल्या अन एकदम आठवले बँकेत पैसे जमा झाले का ते बघायचं राहील. लगेच डबडीहाय बँकेच्या साईटवर गेलो लॉगिन केलं. पैसे परवाच जमा झाले होते. बॅलन्स दीड लाख रु दाखवत होता. सध्या या पैश्याचं खरेदी करायचं वै काही प्लॅन नव्हता. वर्षभरासाठी एफडी करायची आयडिया चांगली होती. व्याज मिळून पैसे थोडे वाढणारही होते.
लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?
मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
आघाडी सरकार आणि सामान्य जनता
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
3. साधु हत्याकांड
4. तांदूळ घोटाळा
5. अर्भक मृत्यू
6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत
7. वाढीव पेट्रोल दर.
8. ड्रगचा वाढता वापर...
- ‹ previous
- 2 of 340
- next ›