पाककृती

hrkorde's picture
hrkorde in पाककृती
27 Sep 2021 - 08:09

उकडहंडी

लागणारे जिन्नस:
एक कांदा, १ मोठा बटाटा, १ कच्चे केळ, लाल भोपळा १०० ग्रॅम, फरसबी ५० ग्रॅम, कांद्याची पात ४-५ कांदे, १ लहान रताळे, १ वांगे

१-२ चमचे मीठ, १-२ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा काळा मसाला, १/२ चमचे जिरे, २ लवंगा, दालचिनी, कढीपत्ता १०-१२ पाने. साखर अर्धा चमचा.

२ चमचे तेल

क्रमवार पाककृती:
१. सर्व भाज्या चिरून लांबलांब फोडी कराव्यात.

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
24 Sep 2021 - 17:10

झटपट मोदकाची आमटी

मोदकाची आमटी करण्यात माझा हात सफाईदारपणे बसला आहे .वेळेला कोणतीच भाजी नसेल तर २५-३० मिनिटांत ही आमटी तयार होते.ही आमटी खानदेशातली खासियत आहे .पण सुगरणीला कोठेही अगदी सहज शक्य आहे.
झटपट का ? तर इथे चातुर्मासामुळे कांदे नसल्याने ग्रेव्हीला फाटा मिळाला आणि पदार्थ लवकर होतो.
साहित्य :

दोन वाटी डाळीचे पीठ (बेसन)
ओवा १ चमचा
तेल २ चमचे

मनस्विता's picture
मनस्विता in पाककृती
19 Sep 2021 - 23:12

अळीवाचे लाडू

माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे  यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
16 Sep 2021 - 16:17

मक्याची पोळी आणि डाळवडे गुंडाळी!

शीर्षक दिलाय मराठी खरं पण हि पाककृती आहे लेबनी / इजिप्त मध्ये मिळणाऱ्या फलाफल रोल ची ... आज थोडी खिचडीच झालीय खर करताना पिझ्झ्यासारखी , वाढताना गुंडाळी केलेली आणि पातळ पोळी
साहित्य
- फलाफल वडे ( छोले आणि तीळ, पार्सली आणि जिरे वैगरे घातलेले मिश्र वडे म्हणा ना ) हे मी तयार आणून त ळून किंवा एअर फ्र्यार मध्ये खरपूस करून घेतले

मनस्विता's picture
मनस्विता in पाककृती
14 Sep 2021 - 18:04

तंबिटाचे लाडू

खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे. मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in पाककृती
12 Sep 2021 - 21:08

चिजी - बटरी पिझ्झा.

चिजी - बटरी पिझ्झा.

ग्रीन पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य.
(चार मिडीयम साईझ पिझ्झा साठी)

  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • १० पाकळ्या लसूण
  • १.५ इंच आलं
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • थोडी कोथिंबीर
  • अर्धे लिंबू
  • १ टी स्पून मीठ
  • १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
  • ५० ग्रॅम अमूल बटरटर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in पाककृती
29 Jul 2021 - 15:59

मसुर पुलाव

मसुर पुलाव

साहित्य (चार जणांसाठी) :-

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
25 May 2021 - 16:31

भाजलेले फेटा (ग्रीक , डोक्यवरचा नाही! ) + अँग्लोटि पास्ता

भाजलेले फेटा + अँग्लोटि पास्ता

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
13 Apr 2021 - 01:10

गुढीपाडव्यानिमित्त पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या बनवण्याची पाककृती

गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो!

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
13 Apr 2021 - 01:08

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या बनवण्याची पाककृती

गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो!

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
11 Apr 2021 - 22:59

हैद्राबादी जेवण - बग़ारा ख़ाना, कद्दू का दालचा

बग़ारा ख़ाना आणि कद्दू का दालचा ही पाककृती मला खूप दिवसांपासून मिपावर लिहायची होती. शेवटी आज मुहूर्त लागला.

लई भारी's picture
लई भारी in पाककृती
6 Apr 2021 - 09:50

उकडलेले अंडे!

हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-)
आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत.
तर, असो!

लई भारी's picture
लई भारी in पाककृती
6 Apr 2021 - 09:50

उकडलेले अंडे!

हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-)
आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत.
तर, असो!

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
26 Mar 2021 - 17:45

हिरव्या हरभऱ्याची आमटी

हिरव्या हरभऱ्याची आमटी म्हणजेच सोलाण्याची आमटी हो! असे हरभाऱ्याचे घाटे भरभरून शेतात आले की कोवळे उपटून आणून मस्त आमटी असा दर आठवडी बेत झालाय होता बघा.बर गंमत अशी की सोललेल्या घाट्यापासून नुसते खाता येतात,चटपटीत तिखट (आमच्या ह्यांना असे आवडते ते पण कधीतरी;()करता येतात.मला बाई आमटीच आवडते मस्त हिरवी आणि त्याच्यावर लाल तर्री..

काळे मांजर's picture
काळे मांजर in पाककृती
6 Feb 2021 - 22:46

गोबी मुसल्लम Gobi Musallam Gobhi Musallam

पूर्वतयारीचा वेळ:
३० मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
अख्खा फ्लॉवर

चटणी साठी
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लसूण
पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
5 Feb 2021 - 12:56

खुसखुस उप्पीट

पश्चिमेत मेडिटीरीयन सी म्हणजे भूमध्य समुद्र काठच्या देशांचा आहार सर्वोत्तम (मांस बेताने आणि भाज्या भरपूर) समजला जातो असे आंजा ज्ञानाने कळल्यानंतर त्यात असते तरी काय पहाण्यासाठी डिशेस तुनळीवर शोधण्याचा प्रयत्न एकदा फसून झाला होता, पण मागच्या आठवड्याभरात योगायोगाने कुसकुस couscous नावाच्या डिशपर्यंत पोहोचलो.

देवीका's picture
देवीका in पाककृती
8 Jan 2021 - 09:16

माझे युट्युबर्स वरील पाककृतींचे विडिओ!!

बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.