वाढदिवस स्पेशल: आलू बोंडे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
3 Apr 2024 - 11:01 am

आज माझा ६३वां वाढदिवस. सौ. ने वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.

आलू बोंडेपाच-सहा बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले. कोथिंबीर, कैरी, पुदिना (घरचा), आले, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची टाकून झणझणीत हिरवी चटणी बनवली. एक कांदा, चार टॉमेटो, लसूण, आले, आणि थोडे तिखट टाकून थोडी टॉमेटोची लाल रंगाची सौम्य चटणी बनवली.

उकडलेले बटाटे थंड पाण्यात टाकून थंड करून किसले (असे केल्याने स्वाद उत्तम राहतो), त्यात १०० ग्राम पनीर ही किसून टाकले (पनीर हे पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही), थोडी फुल गोबी ही किसून टाकली.(चव मस्त येते). कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. हळद, आंबट, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एक जीव केले. हळद आणि मीठ टाकून बेसनाचा घोळ तैयार केला. मिश्रणाचे गोळे करून बेसनाच्या घोळात fबुडवून तेलात तळले. सौ. ने सोम बाजारातून कमी तिखट वाल्या मोठ्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. उरलेल्या बेसनाच्या घोळात बुडवून मिरचीचे भजे केले. आलू बोंड्या सोबत चवीसाठी काही मिरच्या तेलात तळल्या. त्या मिरच्यांवर लिंबू पिळले.

झणझणीत भजे खाल्यानंतर. शिऱ्यावर ताव मारला. अश्या रीतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली.

प्रतिक्रिया

कांदा लिंबू's picture

3 Apr 2024 - 11:17 am | कांदा लिंबू

@विवेकपटाईत काका,

वाढदिवसानिमित्त दीर्घायुरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

बाकी, मनोगताची सुरुवात तुपातल्या शिर्‍यापासून केलीत, पण शिर्‍याचा फोटू कुठाय?

श्वेता व्यास's picture

3 Apr 2024 - 11:47 am | श्वेता व्यास

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही फक्त ६३ चे आहात ? की ७३ ?
तुम्हाला आयुष्यभर उत्तम आरोग्य, उत्साह, ऊर्जा, सृजनशीलता, प्रियजनांचा सहवास आणि प्रेम लाभो.
(अवांतरः गायीचे तूप 'पतंजली'चे की घरी कढवलेले ? आणि हो, दुपारी आणि संध्याकाळचा बेत काय होता ? आता ग्रेटर नोएडाला रहायला गेलात का ?)

विवेकपटाईत's picture

10 Apr 2024 - 4:01 pm | विवेकपटाईत

६३. बाकी बहुतेक जून महिन्यात दिल्ली सोडणार. सध्या इंटिरियरचे काम सुरू आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मेन्यू फक्कड जमलाय..

मजा आहे . वाढदिवसाची सुरुवात झणझणीत घरच्या आलू बोंड्यांनी. दुपारी श्रीखंड पुरी असणार. रात्री बासुंदी.
शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

3 Apr 2024 - 2:22 pm | मुक्त विहारि

आलू बोंडे, कधीही खायला आवडतात....

छानच! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अनन्त अवधुत's picture

3 Apr 2024 - 3:53 pm | अनन्त अवधुत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अहिरावण's picture

8 Apr 2024 - 10:12 am | अहिरावण

पोट बरं आहे का आता?

विवेकपटाईत's picture

10 Apr 2024 - 3:59 pm | विवेकपटाईत

सात वर्ष आधी पेंक्रिया चा टिबी झाला होता. भयंकर साईड इफेक्ट्स वाल्या औषधी घेतल्या होत्या.पोट कायम बिघडलेले असते. तूर्त करोना नंतर औषधी अत्यंत कमी केल्या आहेत.बाकी जिभेवर नियंत्रण नाही.

अहिरावण's picture

12 Apr 2024 - 9:49 am | अहिरावण

काही जण म्हणतात तुमचे कळफलकावर सुद्धा नियंत्रण नाही. खरे खोटे तुम्ही, ते जाणो... ;)

विवेकपटाईत's picture

10 Apr 2024 - 3:54 pm | विवेकपटाईत

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व मीपावकरांना शुभेच्छा.

निनाद's picture

12 Apr 2024 - 9:07 am | निनाद

वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

बेत छान जमला आहे.

पाककृती आवडली!