भटकंती
आहुपे - चिंब पावसाळी भटकंती
पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला.
जाता पंढरीसी-२ (संपादित)
https://www.misalpav.com/node/52913
मिपावर छायाचित्र डकवणे जिकीरीचे काम,माझी मुलगी, टर्मिनेटर भौ,कंजूस भौ यांनी शिकवण्याचा,मदत करण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी.
जाता पंढरीसी....
"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....."
आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच,
"पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....",
दुधवा अभयारण्यात सफर आणि व्याघ्रदर्शन
माझ्या पुणे ते आयोध्या (नोव्हेंबर 2024) सायकलवारीनंतर मला उत्तर भारतात असलेल्या लखनौ जवळील दुधवा नॅशनल पार्क ह्या वन्यजीव अभयारण्यात सफारी करण्याचा योग जुळून आला. तेथे आम्हाला वाघ आणि इतर वन्यजीव हिवाळ्याच्या सुंदर सॉफ्ट लाईट मध्ये फोटोग्राफी करायची छान संधी होती.
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ
आधीचा भाग : हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे
आज सहलीचा तिसरा दिवस. लवकरच जाग आली आणि सहज म्हणून किनाऱ्यावर फिरायला बाहेर पडलो . आमचे हॉटेल पाळोळे किनार्याच्या अगदी दक्षिण टोकाला होते . काल संध्याकाळी ओंडक्यांवरून ढकलत आणलेल्या काही होड्या अजूनही किनाऱ्यावरच उभ्या होत्या .
पुणे ते अयोध्या सायकल राईड
जय श्रीराम उत्तर दिग्विजय
पुणे ते अयोध्या सायकल राईड २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे
यापूर्वीचा भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १
काल रात्री छान झोप झाली . बंगल्यात गरम पाण्याची तसेच शॉवर वगैरेला चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होती . (नळ उघडताच प्रेशर पंप सुरु होत असावा )
आजच्या कार्यक्रमाविषयी 'चाय पे चर्चा'
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १ : प्रवास
गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले .
दुर्ग देवराई - पुन्हा एकदा
सप्टेंबरच्या मध्यात जोरदार पावसात आंबे-हातविज, दुर्ग देवराईची भटकंती करुन आलो होतो, जेमतेम ३ आठवड्यात परत एकदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नाणेघाटात जाण्यास निघालो. जुन्नर सोडलं पण काय वाटलं कुणास ठाऊस, ऐनवेळी आपटाळ्यावरुन नाणेघाटासाठी उजवी मारण्याऐवजी सरळ आंबोलीच्या रस्त्याला लागलो. आणि दुर्गवाडीस जाण्यासाठी निघालो.
पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई
ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज.
- 1 of 110
- next ›