पारंपरिक भोपळ्याचे घारगे

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
19 Jul 2024 - 3:37 pm

*घारगे
*लालभोपळा
*आषाढ

Q
खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.मुळातच मला ही एक पारंपरिक पाककृती खासच वाटत राहते ;)
गुळाचा मुरलेला गोडवा,जायफळ वेलचीचा मंद सुगंध, वाफवलेल्या भोपळ्याचा मऊसर गोडसर ओलावा जिभेला कमाल तृप्त करतो.

*कृती
भोपळ्याच्या बिया,शिरा व सांगली काढून टाकायची.बारीक किसून घ्यायचा ,एक मोठी वाटी किस घ्यावा.तूपात परतून घ्यायचा.अर्धी वाटी गूळ,वेलची,जायफळ पावडर घालून मऊसर शिजवून घ्यायचा.हे मिश्रण थंड झाल्यावर बसेल तेवढी कणीक+तीन चमचा तांदळाची पिठी घालत मळून घ्यायचे.घारगे पुरीच्या आकारात लाटून तळून घ्यायचे.
गुळाचे योग्य प्रमाण असेल तर पुरी छान फुगते.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2024 - 11:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तळलेलं कुरकुरीत काहीही आवडतं. घारगे पालक पूरी वगैरे सारखेच आवडले. बाकी, मिपावर लेखन असो की पाककृती आपला उत्साहही आवडतो. पुपाशु

-दिलीप बिरुटे

धन्यवाद सर,आपणही सतत उत्साहदायी लिहिण्यासाठी प्रेरणा देत असता!!
बाकी डाएट /आरोग्यदायी जीवनशैली बर्यापैकी अंगवळणी पडल्यामुळे तळण हा विषय कमालीची दूर गेलाय.मागच्या महिन्यात एका नातेवाईकांकडे भजी खाल्ली, आम्हां दोघांना अगदी जसं भरून आलं होतं (हा हा).

कर्नलतपस्वी's picture

20 Jul 2024 - 8:02 am | कर्नलतपस्वी

मस्त.

Bhakti's picture

20 Jul 2024 - 10:43 am | Bhakti

आखाड तळावाच लागतो.

श्वेता२४'s picture

20 Jul 2024 - 4:07 pm | श्वेता२४

माझी आजी व मावशी हा पदार्थ अत्यंत छान करतात. शिजलेल्या भोपळ्यामध्ये पीठ कमी भरावे. आमच्याकडे अगदीच थापून हा पदार्थ करतात. हे घारगे टुम्म फुगतात. त्यावरती लोणी लावून आम्ही लोण्या सोबत खायचो...आता घारगे करणे आले!!

अरे वाह ,थापून मस्तच की.मिपावरच एका धाग्यात गूळ भोपळ्याचा मिश्रणात उकड काढत मग लाटूनही घारगे केल्याचं वाचलं.

आमच्याकडे अगदीच थापून हा पदार्थ करतात.

+१ माझी आई पण हा पदार्थ थापुनच करते. सध्या बऱ्याच दिवसांत खाल्ला नसला तरी माझाही हा आवडता पदार्थ आहे!