पंजाबी पिन्नी करंजी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
24 Jan 2024 - 11:23 am

क
थंडीचे छान गार गुलाबी दिवस आहेत.पोटातला अग्नी खारीक-खोबर्याने तृप्त होतो.ऊबदार होतो.पण माझी लेक खारीक खोबरं लाडूंना तोंड लावेल तर शपथ!मग आईने त्यात एक वाटी गव्हाचे पीठ भाजून टाकले (अशा लाडूंना पंजाबी पिन्नी म्हणतात हे मी #Mumbai Swayampakghar च्या एका पोस्टमध्ये वाचलं होतं).तरीही खाईना.लहान मुलांचे खाण्याचे अजब गणित असतं.आता यात गव्हाचे पीठ पडलाच आहे ,तर करंज्या कराव्यात.तर यात तीळही घालावेत असं वाटलं.मला करंज्यांना मूरड पाडता येत नव्हत्या चारचौघी फराळ करतांना त्यांना पटापट करंज्यांना मूरडी घालताना , आपल्याला येत खुप वाईट वाटायचं.चित्त एकाग्र केले आणि करंज्यांच्या कडांना मूरड घातल्या(चुकल्या तरी आपल्यालाच खायच्या आहेत हे समजून).अशा मस्त जमत गेल्या ,खरच #डरकेआगेजीतहै हे ब्रीद काय खोटं नाही.
म्हणून रव्या मैद्याच्या करंज्या केल्या.अहो आश्चर्यम गरमा गरम पाच एक करंज्या तिने खाल्ल्या.आणि ही डिजाइन काय मस्त आहे करंजीची , म्हणून मी या खातेय अस म्हणाली :).खरच मस्त खुसखुशीत पंजाबी पिन्नी करंजी या पुढे आता हमखास करत राहणार!

साहित्य -
खारीक -खोबरे बारीक केलेले-दोन वाटी
गुळ-एक वाटी
सुकामेवा बारीक केलेला-एक वाटी
डिंक तळलेला-अर्धी वाटी
भाजलेले गव्हाचे पीठ -एक वाटी
मेथ्यापूड-अर्धा चमचा

करंजी साठी १:१/२ प्रमाणात बारीक रवा मैदा एक चमचा मोहन टाकून दूधात भिजवून अर्धा तास ठेवला.
अ
कृती-
वरील साहित्य एकत्र करून घेतले .
करंज्या लाटून दोन चमचे सारण भरून कडांना मूरड पाडली.
किंचित लालसर तळल्या.
गरमागरम तयार!
-भक्ती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Jan 2024 - 12:17 pm | कंजूस

हं.

चांगल्या लागतातच. आणि आठ दिवस प्रवासात टिकतातही.

Bhakti's picture

24 Jan 2024 - 1:19 pm | Bhakti

हो ,एकदम मस्त!

कर्नलतपस्वी's picture

24 Jan 2024 - 1:03 pm | कर्नलतपस्वी

लेक कणकेचा लाडू खात नाही म्हणून लाडवाला करंजीचे डिझाईन, ... that's like a clever mother.

आवडलं.

Bhakti's picture

24 Jan 2024 - 1:19 pm | Bhakti

;);)

श्वेता व्यास's picture

25 Jan 2024 - 12:58 pm | श्वेता व्यास

वाह छान आहेत करंज्या!
मुलांसाठी काय काय करावं लागतं नाही, खूप शक्कल लढवावी लागते :)

सरिता बांदेकर's picture

25 Jan 2024 - 4:16 pm | सरिता बांदेकर

सुगरणबाई नेहमीप्रमाणेच प्रयोग यशस्वी.अशीच यशस्वी हो.