शाळेची वेळ झाली
चला चला बॅग भरा
चला चला डबा भरा
शाळेची वेळ झाली
शाळेची वेळ झाली
एक वही सापडत नाही
गृहपाठाचा पत्ता नाही
पेन्सिल तर तुटकी बाई
पेनामधून गळते शाई
शाळेची वेळ झाली
अंघोळ म्हणजे दोनच तांबे
नुसती बुडबुड जरा न लांबे
बाबांची तर चाले लुडबूड
टॉवेल मिळेतो माझी कुडकूड
शाळेची वेळ झाली
डब्यात काय ? पोळीचा रोल
आणि दोन बिस्किटं गोल
शाळा माझी तिची घाई
कित्ती कामं करते आई
शाळेची वेळ झाली
घाई आमची झाली भारी
तोच व्हॅन आली दारी
पण आई घे ना पापा
नाहीतर करणार नाही टाटा
शाळेची वेळ झाली
प्रतिक्रिया
2 Nov 2025 - 1:14 pm | बिपीन सुरेश सांगळे
दिवाळीची सुटी संपून उद्यापासून सुरु होणाऱ्या शाळांना आणि पोरांना
10 Nov 2025 - 4:52 am | nutanm
पोराना काय मुलाना पोरकी ती पोरे आपण व्यवस्थित आईवडिल परेसा पैसा असल्यावर आपलीच मुले ती . माझ्या आईला कधीच पोरे म्हटलेले आवडायचे नाही कारण आमचे सर्व त्यानी त्यान्चयाकडे असलेल़या साधारण पैशात व्यवसथित केले. असो राग नसावा. माझे विचार सान्गितले.