मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
प्रतिक्रिया
2 Apr 2013 - 3:54 pm | नानबा
स्पा, नुकताच दिवाळीत महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ असा ३००० किमीचा प्रवास बाईकवरून केला असल्यामुळे मला या धाग्यात टिचभर भर घालता येईल. तुम्हाला लागणार्या २ ब्यागा कोणत्या आकाराच्या आहेत? शक्यतो बॅगपॅक असल्या तर उत्तम. त्यात सुद्धा ५० लिटरच्या असल्या तर सगळ्यात छान, कारण या ब्यागा नीट बांधता येतात. तुमची बाईक कोणती आहे?
या वाक्यावरून युनिकॉर्न, हंक, पल्सर १३५, जीएस १५० आर, शाईन, युवा, एसझी आर किंवा तत्सम बाईक असावी. या बाईक्सना मागे ब्याग बांधण्यासाठी बंजी रोप मिळते. ही अशी -


ही दोरी ताणली जाते आणि प्रचंड मजबूत असते. त्याला दोन्ही टोकांना हुकं असतात, त्यामुळे मागल्या सीटवर किंवा खालच्या बाजूस ब्यागा ठेऊन असल्या २ बंजी दोर्यांनी बांधल्या की झालं तुमचं काम. बंजी रोपप्रमाणेच बंजी नेटसुद्धा असते. ही अशी -
फक्त याने सीटवर ब्याग बांधता येतात. तुम्ही ठाकुर्लीला राहता ना? डोंबिवलीमध्ये मानपाडा रोडवर डॉमिनोज पिझ्झाच्या समोर सुनिल कार डेकोर म्हणून दुकान आहे, त्याच्या कडे या वस्तू मिळतील. किंवा कोणताही ऑटोमोबाईल स्पेअर पार्टवाला सुद्धा देऊ शकेल.
2 Apr 2013 - 3:57 pm | कवितानागेश
यष्टी जातीय की कोकणात. ब्यागा टाकायच्या डोक्यावर...
2 Apr 2013 - 5:08 pm | सूड
जेटमाउलीशी सहमत (सध्या ती संमं वर आहे म्हणून)
2 Apr 2013 - 5:08 pm | मैत्र
धागा मस्त आहे पण माऊचा प्रतिसाद आवड्ला..
उगाच तकलिफ त्या हायवेवर शेकडो किलोमीटर आपली दुचाकी हाकायची.. आपला लाल डबा आहे की ..
2 Apr 2013 - 6:45 pm | चौकटराजा
आपल्या डॉस्क्याव ब्यागा घेऊन येस्टीत बासायाच का काय ????
2 Apr 2013 - 3:58 pm | स्पा
प्रथमा
भेट बाबा तू मला
प्रात्यक्षिक दाखीव :)
माझी यामाहा SZ १५० cc आहे
2 Apr 2013 - 3:59 pm | नानबा
नक्की. :)
2 Apr 2013 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
@माझी यामाहा SZ १५० cc आहे >>> इथेच हिशोब झाला की मग...
मी १०० सिसीच्या गाडिवरुन पूर्ण कोकण पालथ घातलय.७० ते ९० च्या स्पिडला चालवुन साधारणपणे ६० च्या आसपास अॅव्हरेज मिळायचं.१५० सिसीच्या गाडिला इंजिन ट्यून करा नायतर करु नका ६० च्या वर चालवली तरी ४५ अॅव्हरेज मिळेल. आणी अजुन ताणली तर ३५ ते ४० मिळतं. आमचे बरेच (पुण्यात व्यवसायानिमित्त आलेले) कोकणवासी मित्र यापेक्षा वेगळा अनुभव सांगत नाहित.
2 Apr 2013 - 6:14 pm | मालोजीराव
सध्या बुवा पुण्यातल्या रस्त्यांवरून विमान चालवतात असं ऐकून आहे :P
2 Apr 2013 - 7:16 pm | जेनी...
तेपण मांडी घालुन :P :D
2 Apr 2013 - 7:22 pm | प्यारे१
अब्बा, रुख्साना को भी पता चल गया!
-प्यारेस्माईलभाई ;)
2 Apr 2013 - 8:14 pm | बॅटमॅन
=)) =))
3 Apr 2013 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा
बंदूक आत्मा..मालोजि/बालिका खात्मा
@मालोजीराव
- Tue, 02/04/2013 - 18:44
सध्या बुवा पुण्यातल्या रस्त्यांवरून विमान चालवतात असं ऐकून आहे smiley>>> =))
@पूजा पवार.
- Tue, 02/04/2013 - 19:46
तेपण मांडी घालुन smileysmiley>>>=))
2 Apr 2013 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. उघडी ठेवली की इतकी घाण बसते की विचारु नका. मला गाडी पुसायचं जीवावर येतं. फडकं मारल्याने चूलीला पोचारा दिल्यासारखी वाटते. (यु नो पोचारा) ती अजून घाण वाटते. पाणी मारुन शिळ्या दैनिकानं पुसुन काढायची म्हणजे अर्धा तास लागतो. यावर काही उपाय ?
गाडीच्या काचा उघड्या ठेवतो तेव्हाही भरपूर धुळ गाडी येऊन बसते. गाडी धुणार्याकडे गाडी घेऊन घेल्यावर साडेतीनशे रुपये घेतो. आत हवा मारायची (धुळ झटकून काढायची) वेगळे पन्नास रुपये द्यावे लागतात. हजार पाचशेत असं हवा मारायचं इलेक्ट्रीकवर चालणारं काही यंत्रं बिंत्र मिळतं का ?
-दिलीप बिरुटे
2 Apr 2013 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
अहो, एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला. तेवढेच एखाद्याला रोजी-रोटीला लावल्याचे पुण्य मिळेल. परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत' असे वाचनाता आले, म्हणून आपला हा सल्ला.
बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
2 Apr 2013 - 4:32 pm | धन्या
ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना डाव्या बाजूला कुणी बसलेलं असतं का? तसं असेल तर त्यांना ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना मध्यभागी बसवत जा.
2 Apr 2013 - 4:33 pm | विनायक प्रभू
कमाल आहे बॉ. अहो डागदर लाखाच्या गाडीला एवढे ओवर्।एड असाचेच. परा शि सहमत.
@ परा. माझा म्याक्यॅनिक ला पाठ्वु का?
2 Apr 2013 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला.
एकतर मला तर ते शे-पाचशे-हजार. इ. देणं परवडणारं नाही. तेवढ्या पैशात डिझेल गाडीत भरणं होईल त्यामुळे तो विचार बाद. आणि गरीबाच्या भावनेशी सहमत असलो तरी एखाद्या गरजुला माझा मूड असला तर बिनकामाचे शे पाचशे हजार देईन. पण, ड्रायव्हर ठेवणे किंवा अन्य माणसामुळे आपल्या प्रायव्हसीला मर्यादा येतात. आपण बोलतो याचं गाडी चालवायचं सोडून लक्ष आपल्याकडे असतं. काही काही उत्साही आपल्या गप्पात सामील होतात. आपण काही खात असतो तेव्हा त्याला कंपलसरी विचारावं लागतं किंवा द्यावं लागत. माणूसकी म्हणून ठीक आहे, पण मला नै जमत राव. असो, गाडी चालवणारं रोबट बिबट येईन तेव्हा पाहीन. असो. विषयांतर होतंय.
>>>परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत'
वा वा वा. वाचून खूशाल इथे लिहित आहात. त्यांच्या संपादकाला पत्र लिहायचं होतं ना चड्डीत राहा ना भो म्हणून.
>>>>माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
धागा दुचाकी चारचाकी या संबंधात आहे. ह्यालीकॉप्टरसाठी नवा धागा काढावा. पण, आता इथे विचारलं आहे तर सांगतो. उजव्या बाजूला एक सिमेंटची गोणी ठेवा त्यामुळे ब्यालेन्स व्यवस्थित राहून ह्यालीकॉप्टर ल्यांड व्यवस्थित होईल.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2013 - 4:52 pm | इरसाल
एक घरगुति उपाय सांगतो.
गाडी नाही झाकलीत तरी चालेल.
शक्यतो जुना टर्किशचा टॉवेलचे दोन तुकडे (अर्धे अर्धे करुन) रात्री भिजवुन आणी पिळुन जास्त हवा न लागतील अशा टिकाणी रात्रभर एक्मेकांवर घडीघालुन ठेवायचे. सकाळी त्या तुकड्यांनी गाडी पुसायची.
पोचारा होणार नाही किंवा पाण्याच्या थेंबांचे डाग दिसतात (कपडा जास्त ओला राहिल्यास) तेही दिसणार नाहीत कागद वापरायची गरज नाही.आणी पाण्याचिही बचत. रविवारी निवांतपणे शाम्पु किंवा तत्सम झाग बनविणार्या पदार्थाने गाडी धुवुन टाकावी.
2 Apr 2013 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार
मला देखील आधी तिच शंका आली होती. त्यामुळे एकदा फक्त पायलटला बसवून आणि एकदा ऑटो पायलट (रिमोट वापरुन) ह्यालिक्राप्टर ल्यांड करून पाहिले, पण दोन्ही वेळेला तोच फेस केला. त्यामुळे तोंडाला फेस आला.
नको. तो अंमळ जास्तीच ट्यून करून जातो गाडी.
बाकी, टैम मिळाला की जरा फोन करा. तुमच्या त्या इंन्स्टिट्यूटवाल्यानी डोक्याला शॉट लावलाय माझ्या.
हे प्राध्यापक लोक ना..
अहो प्रा. डॉ. मी फक्त गाडी धुण्यासाठी माणूस ठेवायला सांगतोय. हे म्हणजे कामाला बाई ठेवली की सगळ्याच कामाची अपेक्षा धरल्यासारखे करताय तुम्ही. येवढ्यात माने साहेबांचे कुठले पुस्तक वैग्रे वाचले होतेत का काय ?
त्यांच्या वर्तमानपत्रालाच लंगोटी-पत्र म्हणले जाते. ;) आता ह्यावर मी त्यांना काय सुचवणार ?
सिमेंटचे वस्तुमान, ब्रँड, किंमत ह्याविषयी डिटेल्स मिळतील काय ?
3 Apr 2013 - 9:41 am | इरसाल
बजाजचे तर नाही नां ? याची खात्री करुन घ्या.
(बजाज सकुटर आधी थोडी आडवी करुन चालु करायला लागायची म्हणुन आपल हे सजेशन)
3 Apr 2013 - 10:35 am | श्री गावसेना प्रमुख
त्यांच हेलीकॉप्टर एका डोळ्याने तिरप असाव म्हणुन असे होत असावे.
2 Apr 2013 - 6:50 pm | चौकटराजा
मालक तिरका असेल तर त्ये ह्येलीकापटर कसं सरळ टेकायचं जमीनीला ...?
2 Apr 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी, ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
हा धागा "दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा" असा आहे, म्हणून तुमच्या ह्यालीक्राप्टरला दोन चाके आहेत की चार हे सांगीतल्याशिवाय उत्तर दिले जाणार नाही.
3 Apr 2013 - 9:06 am | ऋषिकेश
+१
आम्ही अशाच एका विद्यार्थ्याला महिना रु.२०० + वर्षभर लागतील तशी अभ्यासाची पुस्तके, गाईड या डीलवर गाड्या (१ चारचाकी आणि दोन्ही दुचाक्या) पुसायचे काम दिले आहे. तोही आनंदाने करतो.
2 Apr 2013 - 4:22 pm | धन्या
हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात. गुगलवर car vacuum cleaner असं शोधा.
2 Apr 2013 - 5:21 pm | ५० फक्त
असल्या १०००- १२०० च्या यंत्रांच्या नादाला लागु नका, त्यापेक्षा जोपासु चे कार क्लिंनिग किट घ्या, त्यात एक काळ्या रंगाची तंतुमय झटकणी मिळते, आख्खी व्हिस्टा आतुन बाहेरुन पुसायला ७-१० मिनिट पुरेसे होतात, त्याच किट मध्ये एक निळ्या रंगाचे ग्लास नॅपकिन असतो, ओल्या न करता काचा आणि हेडलाईटस लख्ख होतात एकदम, फक्त हा निळा कपडा सहा महिन्यात एकदाच धुवावा.
2 Apr 2013 - 5:24 pm | स्पा
ते कितीला मिळत ?
3 Apr 2013 - 1:45 am | विश्वनाथ मेहेंदळे
ते तुला काय करायचे आहे रे ?? तुझ्याकडे कार आहे का मुद्द्लातली ?? :-)
3 Apr 2013 - 9:20 am | स्पा
विमे, हल्लीच ना हो तुम्ही इतरांची खिल्ली उडवू नये वगैरे लेख लिहिलात? ते तुम्हांला स्वतःला लागू होत नाही का?
--स्पाशो
4 Apr 2013 - 8:56 am | यशोधरा
विमेबाबांनी मी तसे म्हटलेच नाही असे म्हटले आहे. त्यांचे ते दुकान अहे म्हणे, पुराव्यानिशी साबित करु शकते :D
4 Apr 2013 - 2:37 pm | कवितानागेश
विमे आजोबा आहेत.
खुलासा संपला. :)
4 Apr 2013 - 3:31 pm | स्पा
पण त्यांना वाद घालायची हौस ती किती
इच्छा काही केल्या सुटत नाहीत
4 Apr 2013 - 4:17 pm | ५० फक्त
आजोबांनी वाद घालु नये, असं कुठल्या बुद्धसंहितेत लिहिलेलं आहे, जरा फेसबुकावर सर्च करुन सांगाल का श्री. मिस्पाजी.
4 Apr 2013 - 4:20 pm | स्पा
ब्वोर्र
4 Apr 2013 - 6:16 pm | बॅटमॅन
बुद्धसंहितेत की बुढ्ढासंहितेत ;)
4 Apr 2013 - 4:21 pm | यशोधरा
आता ते मला लेकी बोले असं म्हणाले, म्हणजे बाबा नाय का झाले? च्यॅ! तू पण ना माऊ! :D
4 Apr 2013 - 4:24 pm | स्पा
खवचट बोलूनिया 'बाबा' गेला :D
5 Apr 2013 - 3:15 pm | कवितानागेश
हे मीटरमध्ये बसत नाही.
'खवचट लेकीसाठी बोलुनिया बाबा गेला' हे बसतय. :P
5 Apr 2013 - 3:18 pm | स्पा
कित्ती चान
- लीस्पाऊजेट
5 Apr 2013 - 3:23 pm | सूड
हे बसतंय 'कुच्कटसे कन्येलागीं बोलुनिया बाबा गेला' ;)
5 Apr 2013 - 3:49 pm | यशोधरा
कुचकटसे कन्येलागी जे लागण्या सुनेलागी, बोलूनिया बाबा गेला! हे अधिक पर्फेक्ट आहे! :D
5 Apr 2013 - 9:57 am | अमोल खरे
वैयक्तिक प्रश्न विचारुन माननीय विमेंनी दुसरे माननीय श्री स्पा ह्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
6 Apr 2013 - 4:02 am | विश्वनाथ मेहेंदळे
तो वैयक्तिक प्रश्न नव्हता.
"तुझा पगार किती?? तू बोलतोस किती???" हा वैयक्तिक प्रश्न असता ;-)
2 Apr 2013 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात.
माझ्याकडे आहे पण ते काही कामाचं नाही. किरकोळ कारको़ळ काम करतं. पण,फर्र फर्र करत फूल हवा मारणारं यंत्र पाहिजे. एक अॅटोमोबाईल्सवाला तसं आहे म्हणत होता. काय आहे ते बघतो आणि इथे त्याबद्दल लिहितो.
-दिलीप बिरुट
5 Apr 2013 - 9:48 am | llपुण्याचे पेशवेll
आहे ना Bosch कंपनीचे आहे.
2 Apr 2013 - 5:50 pm | कवितानागेश
चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. >>
हा पूर्णपणे नवीन काथ्याकूटाचा विषय आहे! :P
2 Apr 2013 - 7:48 pm | जेनी...
माझा पूतन्या त्याच्या चारचाक्या पॉलिथिनच्या पिशवित भरुन / टाकुन ठेवतो ... सुरक्षित राहतात म्हणे
गाडीला वरुन बिरुन कव्हर घालाय्/टाकायची झंजट नसते .... घेतली कि कोंबली पिशवीत ... :D :P
3 Apr 2013 - 10:22 am | खबो जाप
आईडिया एक नंबर, प्रा.डॉ.दि. बि. तुम्ही एक मोठी पॉलिथिनची पिशवी घ्याच आणि गाडी त्यात घालायला / टाकायला एक क्रेन पण घेवून टाका :-)
6 Apr 2013 - 2:39 pm | आदूबाळ
म्हणजे पूतनामावशीचा मुलगा का? ;)
6 Apr 2013 - 8:44 pm | प्यारे१
मरतंय आता आदूबाळ!
;)
7 Apr 2013 - 10:24 am | श्री गावसेना प्रमुख
पुजा बै आता दुरलकश कराया शिकल्या वाटते
7 Apr 2013 - 10:57 am | आदूबाळ
त्यांना ब्रूणहत्त्या करायची नसेल बहुतेक!
7 Apr 2013 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यांना ब्रूणहत्त्या करायची नसेल बहुतेक!>>>
3 Apr 2013 - 12:51 am | मोदक
सांभाळून हो प्राडॉ.. कव्हर टाकलेत आणि बोका येवून बसला तर..? :-))
3 Apr 2013 - 1:20 am | बॅटमॅन
=)) =))
3 Apr 2013 - 9:04 am | स्पा
=)) =))
3 Apr 2013 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा
कहर आहे त्या कव्हरचा
26 Apr 2013 - 2:05 pm | कोमल
:)) :)) :))
3 Apr 2013 - 2:05 pm | नितिन थत्ते
दुचाकी - चारचाकी (कोणतीही रंग लावलेली पत्र्याची वस्तू-उदा फ्रीज, वॉशिंग मशीन ) झाकून ठेवल्यास लवकर गंजते असा आणभव आहे.
उघडीच ठेवावी. पराने सांगितल्याप्रमाणे साफ करून घ्यावी
2 Apr 2013 - 4:07 pm | अद्द्या
माहिती नाहीये
काही पण प्रश्न आहेत
डिस्कवर टी घ्यायच्या प्ल्यान मध्ये आहे .
नेट वर वाचलं बरच .
पण तरी . अजून काही माहिती मिळाली तर चांगलं
आयुष्यातली पहिलीच बाइक आहे .
सो त्यातली माहिती जवळपास शून्य .
2 Apr 2013 - 4:13 pm | स्पा
अस ऐकलेलं आहे
बजाज ची स्कूटर सोडली तर इतर या नवीन बाईक एखाद वर्षात भरपूर मेंटेनंस देतात असे बर्याच ठिकाणी वाचलेले आहे.
होंडा , यामाहा , तिवीएस चांगले पर्याय आहेत
2 Apr 2013 - 4:29 pm | अद्द्या
ऐकलंय तर खरं .
पण मित्राने घेतलीये .
७ ० च्या आसपास मायलेज देते म्हणतो .
आणि जुनी डिस्कवर ४ - ५ वर्षे काही प्रोब्लेम नसताना चालवणारे पण लोक आहेतच
आणि त्या किमतीत आणि १०० सीसी च्या रेंज मध्ये मस्त गाडी वाटते ती
2 Apr 2013 - 5:07 pm | पैसा
माझ्या नवर्याची अगदी सुरुवातीच्या मॉडेलची डिस्कव्हर आहे. ७-८ वर्षे झाली. उत्तम मायलेज आहे आणि १० रुपयांची पण दुरुस्ती नाही.
2 Apr 2013 - 5:28 pm | ५० फक्त
घ्या बिनधास्त डिस्कवर १२५, मस्त गाडी आहे, इंजिन पल्सार १५० च्या इंजिन जवळपास जाणारं आहे, वॉरंटी संपल्यावर रिट्युन करुन घ्या, ५००००/- रुपयात ८००००/- ची पावर नक्की. पण हे बजाज सर्विसवाले करुन देत नाहीत, बाहेरुन करुन घ्यावे लागेल.
आणि बजाज सुरुवातीच्या काळात असेल थोडी खराब वगैरे पण हल्ली होंडानं वेगळा घरोबा केल्यापासुन हिरोला पळती भुई थोडी केलेली आहे.
2 Apr 2013 - 5:33 pm | अद्द्या
डिस्कवर "टी " १०० सीसी आहे हो
हा . . फक्त फ्री सर्विसिंग बजाज कडून .
नंतर बाहेरच . . .
साठ हजार ऑन रोड मिळतीया . .
प्याशन , शाइन आणि स्प्लेंडर चा पर्याय होता . .आय मीन आहे
ते एक कन्फ्युजन आहेच अजुनी
4 Apr 2013 - 3:19 pm | सूनिल
t 100cc ahe ani st 125 donhi madhali kuthalihi ghya bakiche je option dile ahet tyapeksha lakha patine chagali ahe....
2 Apr 2013 - 11:03 pm | पिवळा डांबिस
आयला, डिस्कवर दुचाकी मिळते हे वाचून भारतीय आयटी उद्योगाबद्दल आदर अतोनात वाढला होता!!!
पण ते 'डिस्कव्हर' आहे असं कळल्यावर आमचा भ्रमाचा फुगा फुटला!!!
:)
बाकी ते तुमचं गाड्यांचं मेंटेनंस चालू द्या, आपल्याला काही कळत नाही त्यात!!!
3 Apr 2013 - 1:46 am | विश्वनाथ मेहेंदळे
बोल्लो अस्तो, पण जौ दे :-)
2 Apr 2013 - 8:23 pm | नानबा
डिस्कवर घेताय? बजाजच्या बाईक्स घेताना फार विचार करायचा नाह. भारतात सगळ्यात चांगल्या (सर्व बाबतीत) दुचाकी आहेत बजाजच्या. एक तर किंमत कमी. त्यात स्पेअर पार्ट तर कुठल्याही गल्लीबोळातल्या मेक्यानिककडे पण मिळतात. आणि लहानशा गावतसुद्धा एखादं बजाज सर्व्हिस सेंटर असतं त्यामुळे गाडी घेऊन कुठे बाहेर गेलात काही लफडा झालाच तर दुरूस्तीचा पण फार त्रास नाही.
बाईक घेण्या अगोदर www.xbhp.com ही साईट पहा. थोडी किचकट आहे, पण होमपेज वर Talkies टॅबवर क्लिकून आत जा, आणि What Bike? या भागातले ब्लॉग्स वाचा. वेळखाऊ काम आहे, पण या साईटवर प्रचंड बाईकसॅव्ही पब्लिक आहे त्यामुळे त्यांच्या लिखाणावर बिंधास भरवसा ठेवा.
2 Apr 2013 - 4:25 pm | सुहास..
सर्वात आधी सूरक्षा म्हणुन ( अगदी पॉवर मशीन नसली तरी ) ड्रायव्हिंग सेफ्टी किट घेवुन ये !! बाईक पेक्षा स्वताची काळजी महत्वाची ..
गडबडीत असल्याने तुर्तास ईतकेच.
पुणे-औ.बाद, पुणे कोल्हापुर, पुणे-नाशीक-सूरत, सहसा सर्वत्र बाईकवर फिरणारा.
2 Apr 2013 - 5:14 pm | प्यारे१
>>>>पुणे-औ.बाद, पुणे कोल्हापुर, पुणे-नाशीक-सूरत
परत येताना कसा येतोस? ;)
2 Apr 2013 - 5:35 pm | घाशीराम कोतवाल १.२
गाडी ट्रकात टाकुन हे टपाव बसुन येत्यात हाय ना वाश्या ?
3 Apr 2013 - 10:27 am | खबो जाप
माझा एक मित्र होता सायकल वरून नांदेड ते दिल्ली पर्यंत गेला, आणि तिथून घरी फोन केला पैसे संपलेत आणि आता पुढे चालवत नाही तेव्हा येवून घेवून जाने काम खल्लास :-)
2 Apr 2013 - 5:52 pm | सुहास..
परत येताना कसा येतोस? >>
सेम वे ;)
कधी कधी हुक्की आली की रूट बदलतो ...उगा एखाद्या खेड्या-पाड्यात जाऊन काहीतरी शोधत बसायचे. ;)
http://misalpav.com/node/23264 , http://misalpav.com/node/20637
असो ...अभी टैम मिलाच है तो .....
स्पा , सर्वात पहिले बाईक , अर्थात ..पॉवर बाईक्स .शहरात थोड्या स्टाईल मारायाला बर्या असल्या तरी अॅव्हरेज च्या बाबतीत, सामान ( खरोखरचे) सोबत देण्याच्या बाबतीत जरा " ढ " आहेत. त्यातल्या त्यात होन्डा ची युनिकॉर्न ओक्के-टोक्के आहे .तु म्हणशील आता बाईक बदलू का ? नाही ...दोस्तीत येक्स्जेंच होत असेल तर काय हरकत नाही ..यामाहा ला बॅग्ज बसणात नाहीत.. उजव्या बाजुला आधी जाळी ( काय म्हणतात त्याला तेच आठवेना, यामाहा च्या शो रूम मध्ये मिळते ) बसवावी लागेल मग त्यावर त्या वर सांगतीलेले हुक्स बसतात ( एका एम.आर. ला पाहिला आहे मी तस्सा )
शिवाय अॅव्हरेज हा फकत बाईकच्या जडण-घडणीत नसतो..तो आपण चालविण्यावर पण असतो. शिवाय आपण बाईक ला मेन्टेन कसे करतो त्यावर ही...या माझ्या काही हाय वे ड्रायव्हींग च्या टिप्स..
१ ) दर दिड तासाला किमान १५ मिनीटाचा ब्रेक...जरा ईंजिन गार होईपर्यंत
२ ) बाईक, मग ती कुठली का असेना , बेस्ट अॅव्हरेज, कुठल्या स्पीड ला मिळतो हे सांगीतलेले असते, तु कोकण च्या सिंगल रोड वर अॅव्हरेज स्पीड ३०-३५ ने गेलास तर कसा काय पेट्रोल अॅव्हरेज मिळणार, अश्या बर्याच श्या बाबींवरती डिपेन्ड असते.
३ ) दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे, अर्थात बाईक टु बाईक वेगळे, मी तीन वर्षे जुनी युनिकॉर्न घेवुन गेलो की चारशे ला बदलतो, माझी जुनी १९९८ ची स्प्लेंडर नेली की मग ३०० लाच बदलतो.
४) निघताना सर्व्हिसिंग मस्ट
पुन्हा तुर्तास ईतकेच.
अवांतर पण समांतर : मुळात, पुरूषाला बाईक रायडिंग सारखे डांगडिंग प्लेजरबेल दुसरे काहीच नाही, अन्यथा बायकी बाईक्स ची जाहिरात " व्हाय बॉयज शुड हॅव ऑल द प्लेजर " अशी करावी लागली नसती ;)
2 Apr 2013 - 5:57 pm | स्पा
पोइन्त नोटेड
३०-३५ कुठे मेल्या .. फार कमी वेळा त्या स्पीड वर असतो
७०-८० वर जास्त वेळ चालवत होतो
येस मला ओईल बदलायला हवे, पण बाईक मन्युअल वर ३००० किमी लिहलय
नोटेड
जियो __/\__
2 Apr 2013 - 8:26 pm | नानबा
स्पा , अरे साधारण २०००-२५०० किमी नंतर ऑईल बदललं तरी चालतं. त्यात पण ऑईल जर वॅल्वोलिन किंवा शेलचं असेल तर ३००० पर्यंत व्यवस्थित सर्व्हिस देतं.
3 Apr 2013 - 10:27 am | मैत्र
सिटी रायडिंग मध्ये २रा ३रा गिअर आणि ४० च्या पेक्षा कमी स्पीड मध्ये अॅव्हरेज मिळत नाही.
तसंच ७०-८० मध्ये नेहमीच चांगलं अॅव्हरेज मिळतं असं नाही विशेषतः गाडी १०० सीसी असेल तर.
टॉप मायलेज हे मध्यम स्पीड ला मिळतं ४०-४५ ते ६०-६५ पर्यंत मॉडेल प्रमाणे ही रेंज थोडी कमी जास्त होते.
नवीन गाड्यांमध्ये स्पीडोवर एक हिरवा पट्टा दर्शवलेला असतो. तिथे चांगली इंधन बचत होते.
८० ने गाडी पळवायची आहे आणि मायलेजही सर्वोत्तम पाहिजे असं होणार नाही..
3 Apr 2013 - 10:31 am | स्पा
ह्म्म्म
2 Apr 2013 - 6:02 pm | अद्द्या
अवांतर पण समांतर : मुळात, पुरूषाला बाईक रायडिंग सारखे डांगडिंग प्लेजरबेल दुसरे काहीच नाही, अन्यथा बायकी बाईक्स ची जाहिरात " व्हाय बॉयज शुड हॅव ऑल द प्लेजर " अशी करावी लागली नसती >>>>>>>
ह्ये बेष्ट
पल्सार ची जाहिरात आठवली
"डेफिनेटली मेल " :D
2 Apr 2013 - 6:08 pm | सुहास..
ह्ये बेष्ट
पल्सार ची जाहिरात आठवली
"डेफिनेटली मेल " >>>
बरोब्बर , पण तरीही पल्सर नकोच, हाय - वे ला तर अजीबात ...ह्याच पल्सर चा पाच सहा वर्षात ( अगदी लग्न झालेल्या प्रुरुषासारखा ) खुळखुळा होतो , कदाचित म्हणुनच तिची जाहीरात डेफिनेटली मेल अशी करत असावेत. ;)
2 Apr 2013 - 6:16 pm | अद्द्या
पल्सर >>
तेवढं बजेट नाही
नंतर पेट्रोल पण लागतं ना राव
________
( अगदी लग्न झालेल्या प्रुरुषासारखा ) खुळखुळा होतो , कदाचित म्हणुनच तिची जाहीरात डेफिनेटली मेल अशी करत असावेत. >>>>
=)) =))
या बद्दल अनुभव नसल्याने
आणि तो येण्याचा येत्या १ - २ वर्षात काही चान्स नसल्याने … आपला पास
3 Apr 2013 - 9:30 am | सुकामेवा
मी ७ वर्षे पल्सर वापरतो आहे, पण मला कधिही असा प्रोब्लेम आला नाही. माझी गाडी मी कोणालाही वापरायला देत नाही त्या मुळे असेल कदाचीत.
3 Apr 2013 - 9:34 am | नानबा
मी गेली १.५ वर्षे झाली २२० पल्सर वापरतोय. १७५०० किमी झालेत, पण एकदाही काही मोठा सिरीयस आणि खर्चिक त्रास दिलेला नाही. उलट गाडी नवीन असतानाच माझ्या चुकीने धडपडल्यानंतर इंजिन वगळता बरेचसे पार्टस नवीन टाकले होते, आणि तरीही खर्च फक्त ४५०० आला होता.
3 Apr 2013 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll
पल्सर २२० कितना देती है?
4 Apr 2013 - 3:51 pm | नानबा
गावात ३५ देती आन बाहेर काढली नि पळवली की ४५ देती. :)
5 Apr 2013 - 9:51 am | llपुण्याचे पेशवेll
भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड ३५० पण इतकंच देते म्हणे. मग पल्सर नक्कीच चांगला पर्याय आहे.
5 Apr 2013 - 10:00 am | मोदक
एनफिल्ड आणि पल्सर..????
जॉनी वॉकर आणि जॉनी लिव्हर..???
5 Apr 2013 - 10:13 am | स्पा
=))
5 Apr 2013 - 1:11 pm | ५० फक्त
बुलेट विरुद्ध इतर हा पुरातन वाद आहे, असेच अजुन काही वाद जगाच्या अंतापर्यंत चालु राहतील या वादच नाही.
अर्थात बुलेट ही बुलेट असली तरी, हल्ली जरा जास्त झाल्यात रस्त्यावर, आणि बटन स्टार्ट, अॅल्यु. इ़ंजिन, डाविकडे गिअर, नावाला जागुन खरोखरच आवाज कमी करणारा सायलेन्सर अशी तथाकथित मार्केट डिमांडच्या नावाखाली केलेल्या बदलांनी बुलेटची शान कमी झालेली आहे.
पुर्वी बुलेट २०० फुट मागं असली तरी कळायची,आता १० फुट मागं आल्यावर आवाज येतो.
इंजिन शक्तीशाली आहे,पण शहरात चालवायला एकदम बेक्कार, ज्या स्पिडनं पेट्रोल भरताना पंपावर आकडे पुढं पळतात त्याच्या दुप्पट स्पिडनं फ्युअल मिटरचा काटा घसरत जातो. हां, मनराव सारखं लेह वगैरे असेल तर ठिक आहे. नाहीतर अवघड आहे, दुसरा प्रश्न व्हायब्रेशनचा, हल्लीच्या आणि एक लेवल मागच्या पिढिला म्हंजे मला देखील,खालच्या गिअरवर आणि कमी स्पिडला एवढं व्हायब्रेट होणारी गाडी चालवणं फार अवघड होतं असा अनुभव आहे.
पल्सार तर बुलेट्पेक्षा स्वस्त आणि लवकर येंतेच पण बुलेटच्या किमतीत, अजुन थोडे पैसे घालुन निंजा २५० किंवा सिबिआर २५० येईल. त्या सुद्धा तेवढ्याच जबरदस्त गाड्या आहेत.
27 Sep 2014 - 12:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
दोन्ही चा क्लास वेगळा बुलेट हायवे क्रुझर अन बाकी रॅट स्पोर्ट्स बाइक्स (हे खिल्ली म्हणुन नाही तर खरेच तेच नाव आहे असे ऐकले आहे)ज्याला थंप आवडतो त्याने आर ई घ्यावी, स्लिक काऊल्स आवडत अस्ल्यास स्पोर्ट्स बाइक , उरता उरला जुन्या रॉयल एन्फिल्ड्स चा प्रश्न तर कितीतरी टाईप चे सायलेंसर आजकाल मिळतात, हॉलो, ग्लास वुल, इन्दौरी, पंजाबी इत्यादी ,डावीकडे गेअर नाहीत हे मान्य पण थंप आणता येतो (तेवढीच दुधाची तहान ताकावर) :)
5 Apr 2013 - 12:41 pm | शैलेन्द्र
यार.. तुने चलाईही नही :(
तम्माम्म एन्फिल्डवाल्यांच्या भावना दुखावल्याबद्दल आपला जाहीर निषेध..
5 Apr 2013 - 1:06 pm | नानबा
बुलेट म्हणजे उगा ती चालवणार्यांनी केलेला वरचढपणा आहे. उगं ढबाढबा आवाज आणि जगभरातली कंपनं असतात त्यात. वरून ३.५ लिटर इंजिन ऑईल ओता ते वगळंच.
ता. क. - माझा निषेध बुलेटला नसून ती चालवणार्या आणि फुकटचा "आम्ही बुलेटवाले" चा टेंभा मिरवणार्या चालकांना आहे.
5 Apr 2013 - 2:29 pm | कपिलमुनी
यात यात टेंभा मिरवणार्याबद्दल काहीच लिहिला नाहीये ? बुलेट्ला नावे ठेवली आहेत .. ते ३५० सीसीचा , २०० किलो चा धूड १२५ च्या स्पीड ने पळवून पहा ...
कुठल्याही घाटात कोणत्याही कारच्या बरोबरीने एन्फिल्ड चालवून पहा .. मग बुलेटची मजा कळेल
डोंगर दर्या आणि लेह लडाख सारखे राईडस पाठीमागे ३०-३० किलो च्या बॅगा लावून सहज करता येतात ते एन्फिल्ड् वरच !!
बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नावे ठेवावी !!
5 Apr 2013 - 2:48 pm | अभ्या..
मुनीवर तुम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आजपासून. :)
झेपेल यामध्ये सगळ्या प्रकारे आले. ;)
6 Apr 2013 - 12:16 am | नानबा
खरंय. बुलेट झेपायला तसलाच अस्ताव्यस्त प्रशस्त देह हवा. आमच्याकडे (सुदैवाने) तो नसल्यामुळे आम्ही असल्या फंदात पडत नाही.
हाच तो, बुलेट चालकांचा "आम्ही बुलेटवाले" चा टेंभा.
तुमचा व्यवसाय काय हो?
6 Apr 2013 - 12:23 am | अभ्या..
बीअर बार आणि पार्टटाइम रिकव्हरीची कामे.
=)) =)) =)) =))
6 Apr 2013 - 12:25 am | बॅटमॅन
पार्टटाईम रिकव्हरीची कामे....मायला अभ्या हसवून मारतंयस आता =)) =))
6 Apr 2013 - 12:30 am | अभ्या..
मग नायतर काय बे बॅट्या :(
आता हाय आमचा टेंभा, मशाल, पलिता, चूड सगळं हाय.
म्हणून काय वातींचं कौतुक ऐकत बसावं काय? ;)
6 Apr 2013 - 1:00 am | दादा कोंडके
:)) :))
6 Apr 2013 - 8:12 am | नानबा
हम्म्म्म्म... मग बुलेट झेपायला काही हरकत नाही.. :)) :)) :)) :))
27 Sep 2014 - 12:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
////////////बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नाव/////////////////
ब्येस्ट!!! मी पण एन्फिल्डर!! मला बी पक्ष प्रवेश द्या!! (क्लासिक ३५० आम्ची)
6 Apr 2013 - 11:27 am | अर्धवट
बुलेट दलींदर आहे असं म्हणा हवं तर.. कित्येक जण म्हणतात.. चालवणार्यांना शष्प फरक पडत नाही.
पण बुलेट आणि पल्सरची तुलना.. पुप्या भाड्या.. आपल्या मैत्रीत खो घालशील हां असलं काही बोलून...
अवांतर - मे महिन्यात भूतानला येणार आहे का कुणी.. ८ + १ दिवसाचा ट्रॅक आहे.
6 Apr 2013 - 6:44 pm | अमोल खरे
बुलेटचा आवाज खुप येतो. गेल्याच आठवड्यात एक बुलेटवाला माझ्या बाईकच्या मागे होता. इतका त्रास व्हायला लागला आवाजाचा की मी सरळ बाजुला होऊन त्याला पुढे जाऊन दिलं, वर मी स्वतः एकदम हळु बाईक चालवत होतो, तो माणुस दिसेनासा झाला तरी कितीतरी वेळ मला तो "फाटफाटफाटफाट" असा आवाज येत होता. नंतर ऑफिसात जाऊन एकाला (ज्याची बुलेट आहे) त्याला म्हणालो की काय आवाज येतो यार, तर तो म्हणतो की "तीच तर मजा आहे". मी चुपचाप डेस्कवर परत आलो. :)
6 Apr 2013 - 7:12 pm | दादा कोंडके
त्यातही मी एकवेळ आवाज सहन करेन पण सिग्नलवर बुलेटच्या मागं फर्लांगभर जाणवणारे सायलेन्सर मधून येणार्या एक्झोस्ट ग्यासचे वायब्रेशन असह्य होतात.
27 Sep 2014 - 12:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
यु ट्युब ला एक विडो पाहिलेला, बुलेट वाला पठ्ठा बेसमेंट पार्किंग मधे बुलेट स्टार्ट करुन इंजिन रेस करतो फक्त अन आजुबाजुच्या आर १५ , मर्सिडीज अन तत्सम ललना घाबरुन आपापली सेंट्रल लॉकिंग रडगाणी गायला लागतात प्यां प्या करुन!!!! *lol*
16 Dec 2013 - 5:29 pm | टवाळ कार्टा
तपशिल मिळेल का??
2 Apr 2013 - 6:43 pm | मनराव
दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे
परवडत नाय राव..... आम्हि तर ३००० किमी झाल्याशिवाय तेचा कडे डुंकुन पन बघत नाय... :) हे झालं रोजच्या वापरा बाबत..... लांब कुठे हिंडायला जायचं असल तर मग २००० किमी....नंतर आईलचेंज...
(शाईन नंतर बुलेट चालवणारा) - मनराव.
2 Apr 2013 - 11:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी स्वतः युनिकॉर्न वापरतोय ३ वर्ष. ४०० कि.मी. ला ऑईल बदलायची काहीच गरज नाही. साधं ऑईल (SAE 10W30 MA हे स्पेसिफिकेशन असलेलं)साधारण ३००० ते ३२०० कि.मी. पर्यंत बदला. दर ५०० ते ७०० कि.मी. नंतर ऑईल लेव्हल चेक करायची. कमी झालं असेल तर थोडसं टॉप अप करुन घ्यायच मिनी पाऊच मधुन.
सिंथेटीक ऑईल असेल तर काही काही ऑईल ४५०० ते ५००० की.मी. पर्यंत बदलायची गरज नसते. पण माझा सल्ला असा आहे की साधचं ऑईल वापरा. जास्त सुट होतं युनिकॉर्न च्या ईंजिन ला.
2 Apr 2013 - 11:38 pm | ५० फक्त
+१००, आजकालच्या नविन गाड्यांना ४००-५०० किमीला ऑईल बदलायची गरज नसते, कारण बहुतेक इंजिन्स अॅल्युनिमियमची असतात हे असावं, नक्की माहित नाही.
3 Apr 2013 - 9:06 am | स्पा
ह्येच बोल्तो
6 Apr 2013 - 12:52 pm | सुबोध खरे
मी होंडा चा पंखा आहे. हिरो होंडा c d १०० (१९८८) दीड लाख (१,५०,०००) कि मी चालवून भावाच्या कारखान्यात कामगारांना चालवायला दिलेली आहेआजही ५०-५५किमी/लि देते . कायनेटिक होंडा ८०,००० (ऐंशी हजार) कि मी चालवून फुकून टाकली. आणि आता गेली साडेपाच वर्षे होंडा युनिकोर्न वापरीत आहे.४५ किमी मुंबई शहरात देते. ( आश्चर्य म्हणजे त्याची पहिली बैटरी अजून चालू आहे).आजतागायत देखभालीचा खर्च (एकूण साडेपाच वर्षातील) १५०० च्या वर नाही.
माझ्या भावाने पण एक जपानी होंडा ९० cc, दोन हिरो होंडा आणि दोन होंडा ऐक्तिव्हा(activa) वापरल्या आहेत. होंडा ची इंजिने बेजोड आहेत.पण त्यांची सर्व्हिसिंग भिकार आहे.भारत भराचा अनुभव गाठीशी आहे (लष्करात असल्याने) पण मी त्या गाड्यानचे सर्विसिंग लोकल मेकानिक कडेच करतो फार तर वर्षात एकदा.fill it shut it and forget it.
6 Apr 2013 - 1:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. सर्विसिंगला ऑईल नं बदलणं, पेट्रोल काढुन घेणं ईत्यादी प्रकार अनुभवलेले आहेत. एकदा तर चक्क गाडीचा ईंडीकेटर तोडुन दिला होता. त्यांच्या डोक्यावर बसुन बदलुन घेतला होता. त्याच्यानंतर परत तिथे गाडी दिली नाही. मी सुद्धा बाहेरच्या गॅरेज मधेचं देतो युनिकॉर्न ला. माझी सुद्धा पहीलीच बॅटरी आहे अजुन. गाडीचं ईंजिन "मक्खन" आहे. सिटी मधे ४७~५० हायवे ला ५५~५८ पर्यंत आरामात मिळतं अॅव्हरेज. होंडाच्या गाड्या थोड्या महाग असतात, पण क्वालिटीवाईज पहायला गेला तर पैसे वसुल होतात.
(होंडाचा पंखा, ए.सी., कुलर) अनिरुद्ध.
8 Apr 2013 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२
+१
माझी पण हॉन्डा युनिकॉर्ण आहे मजा येते गाडी चालवायला
2 Apr 2013 - 5:34 pm | सौरभ उप्स
आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर आहे,
मागच्या महिन्यात बाईक अचानक सुरूच होत नवती, सुरु झाली कि लगेच बंद पडायची, कार्बोरेटर गेलाय म्हणाला मेक्यानिक ३००० रुपडे खर्च येईल म्हणे..
म्हणून महिनाभर बंदच ठेवली, परवा असच वेळ मिळाला म्हणून दुसर्या मेक्यानिक ला दाखवली तर त्याने एक पोवर सर्किट चेंज केल आणि कार्बोरेटर ची सेट्टीइंग केली काहीतरी, पेट्रोल भेसळीच आहे बदलून बघ म्हणे १०० रुपयात काम झालं खर पण गाडीतलं ३लिटर पेट्रोल काढायला जीवावर आल हो..
आता गाडी सुरु तर झालीये पण अजूनही खात्री वाटत नाहीये...... कार्बोरेटर चेक करायला परत खर्च येईल म्हणे...
नक्की कळत नाहीये कार्बोरेटर चेक घेऊ कि गाडी परत बंद पडायची वाट बघु.... कि अजून काही वेगळाच प्रोब्लेम आहे ?
2 Apr 2013 - 8:29 pm | नानबा
कार्बोरेटर घरच्या घरी साफ करून बघ ना एकदा. नाहीतर एखाद्या चांगल्या मेक्यानिकला दाखवून व्यवस्थित ट्यून करून घे. पण मेक्यानिक मात्र चांगला माहितगार बघा, कारण नाहीतर कार्बोरेटर ट्यून करायच्या नावावर काहीतरी भलतंच करतात आणि मायलेजची पार वाट लागते.
3 Apr 2013 - 10:58 am | सौरभ उप्स
धन्स प्रथम,
पण कर्बोरेटर घरच्याघरी कस साफ करू? कारण त्यातल काही कळत नाही... सध्या एका मेक्यानिक ने ट्युन करून दिली आहे कर्बोरेटर ची सेटिंग, आता गाडी व्यवस्थित चालू आहे सध्यातरी (पण पिक अप कमी झाला आहे आधी पेक्षा) पण समजा लांब न्यायची झाली गाडी तर ती सेटिंग बिघडू शकते का ? परत काही बिघाड झाला तर याच टेन्शन आहे ?
3 Apr 2013 - 12:04 pm | नानबा
घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा करावा हे http://www.instructables.com/id/Cleaning-a-Carburetor-in-8-Easy-Steps/ या लिंकवर वाचता येईल. अगदी फोटोंसह दिलं आहे, ते पाहून कर. कार्बोरेटर चा मुख्य प्रॉब्लेम काढताना आणि पुन्हा जोडताना होतो. एकदा निघाला की आतमध्ये नंतर जोडताना जमणार नाही इतकी गुंतागुंतीची रचना अजिबात नाही. फक्त काढताना कोणता स्क्रू कुठून काढला, आणि आतली रचना नीट लक्षात ठेव. (पहिल्यांदा मी इथेच घोळ घातला होता.) सोबत एका वाटीत थोडं पेट्रोल घे, आणि कार्ब उघडल्यावर आतला फ्लोट बाहेर काढून तो पेट्रोल मध्ये टाकून ठेव. एखाद्या जुन्या टूथब्रश किंवा कोणत्याही लहान ब्रश पेट्रोलमध्ये बुडवून या ब्रशने कार्बोरेटर नीट साफ कर. नंतर पुन्हा फ्लोट, स्प्रींग इ. अंतर्गत भाग नीट लावून पुन्हा कार्बोरेटर जुळव आणि लावून टाक. वर दिलेली लिंक वाचून हे सहज करता येईल. पहिल्यांदा करताना अर्धा तास लागेल.
आणि हो, कार्बोरेटर लावून गाडी चालू करून त्याचा आयडल १००० आर.पी.एम. वर सेट कर. झाला कार्बोरेटर साफ आणि ट्यून. :)
3 Apr 2013 - 12:11 pm | स्पा
प्रथम ,
घरच्या घरी एयर फिल्टर साफ करता येतो का, बाईक मध्ये हा पार्ट नक्की कुठे असतो?
3 Apr 2013 - 12:46 pm | नानबा
हो, अगदी सहज करता येतो. आपल्या बाईक्स मध्ये एयर फिल्टर रायडर सीटच्या खालच्या बाजूला असतो.
एयर फिल्टर साफ करण्यासाठी लागणारी टूल्स आणि इतर सामान -
१. ८ मिमि चा स्पॅनर.
२. एयर ब्लोअर (नसला तरी हरकत नाही.)
३. रॉकेल
४. पेट्रोल
५. WD40 (एक प्रकारचं ऑईल आहे. कुठल्याही हार्डवेअर दुकानात सहज मिळतं. घेऊन ठेव, प्रचंड कामाची गोष्ट आहे.)
एयर फिल्टर साफ करण्याची कृती (फोटो पल्सर चे आहेत, पण कृती सारखीच) -

१. बाईक मेन स्टँडला लाव आणि सीटच्या खालचे दोन्ही पॅनल्स काढ. (तुझ्या बाईकला कोणत्या बाजूला फिल्टर आहे बघावा लागेल. बर्याच बाइक्समध्ये ज्या बाजूला बॅटरी आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एयर फिल्टर असतो.)
२.खालच्या फोटोतल्यासारखा एक पार्ट दिसेल, त्याचे बोल्ट्स काढ आणि झाकण उघड.

३. आतमध्ये असे स्पंज असतील. हा आपला एयर फिल्टर. ते स्पंज बाहेर काढ.



४. पांढर्या आणि पिवळ्या स्पंजच्या मध्ये आधारासाठी प्लॅस्टिकची जाळी असते ती बाहेर काढ.


याशिवाय गाडीमध्ये इंजिनाच्या बाजूला एक बारीक जाळी असेल, तीसुद्धा बाहेर काढ.
५. रॉकेल आणि पेट्रोल वापरून दोन्ही स्पंज स्वच्छ करून घे.





भरपूर रॉकेल आणि पेट्रोल मार, किंवा सरळ त्यात बुडवून ठेव. आणि ते फाटणार नाहीत इतपत दाब देऊन नीट पिळून त्यातलं रॉकेल आणि पेट्रोल काढून घे.
६. स्पंज व्यवस्थित साफ झाल्यानंतर स्पंजच्या मधली आणि इंजिनाकडची अशा दोन्ही जाळ्यासुद्धा साफ कर.


७. आता दोन्ही स्पंजवर इंजिन ऑईलचे काही थेंब टाकून ते नीट अख्ख्या स्पंजवर पसरून घे. तसं कोणतंही तेल चालतं, पण शक्यो इंजिन ऑईल उत्तम कारण एक तर त्याचा चिकटपणा जास्त असल्यामुळे धूळ चिकटण्यास मदत होते, आणि हे ऑईल जास्त तापमानावर जळत नाही.


८. आता दोन्ही जाळ्या आपापल्या जागी बसव, आणि असेंब्ली पुन्हा जुळव.


झाला तुझा एयर फिल्टर साफ. जास्तीत जास्त १० मिनीटं लागतील. :)
3 Apr 2013 - 12:54 pm | स्पा
फुल पाककृती सारखी डिटेल मध्ये कृती दिलीस कि :)
५० चा भाचा शोभतोस
गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया :)
3 Apr 2013 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा
@गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया >>>
=)) .... =)) .... =))
फिल्टर साफ करायचा रेट डोक्यात ठेऊन जा हो फडणीस...आपलं प्रथम सांगितलेलं बरं ;)
3 Apr 2013 - 2:54 pm | नानबा
:)) :)) :))
डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट काम करून मिळेल... :)
3 Apr 2013 - 3:00 pm | स्पा
फडणीस साहेब, काम आम्ही करू
तुम्ही फकस्त उभं राहून मार्गदर्शन करा
3 Apr 2013 - 3:03 pm | नानबा
आवं दोगं मिळून काम करून टाकू. झटक्यात हुईल. कसं??
3 Apr 2013 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा
@तुम्ही फकस्त उभं राहून मार्गदर्शन करा >>> =)) वाचलात हो वाचलात फडणीस,तरी तुंम्हाला द्यायला लागणार्या उभ्या फोडणीचे पैसे घ्याच...! =)) ज्ञान तर अजिबात फुकट देऊ नये,असे म्हणतात. :-p
3 Apr 2013 - 3:17 pm | नानबा
हे मात्र नक्की वसूल केलं जाईल. :))
3 Apr 2013 - 3:26 pm | स्पा
=))
3 Apr 2013 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा
म्हणजे ठाकुर्लीला पैसे-पडणार... =))
3 Apr 2013 - 3:02 pm | सूड
५० चा भाचा शोभतोस
तुझ्यामुळे कळलं हो स्पा की हा ५० चा भाचा आहे. बाकी चालू द्या.
3 Apr 2013 - 6:35 pm | ५० फक्त
@ सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा कळलं होतं, तसे फार मदतीचे आहेत मिस्पाजी.
4 Apr 2013 - 5:17 pm | सूड
>>सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा कळलं होतं,
कोण नातेवाईक हो ते? आठवत नाहीय मला.
4 Apr 2013 - 5:18 pm | स्पा
मला पण आठवत नाहीये
3 Apr 2013 - 1:56 pm | श्री गावसेना प्रमुख
तुमचे खुप पैसे वाचत असतील ना हो फडणीस साहेब
3 Apr 2013 - 2:01 pm | नानबा
:))
खरंय. गाडी आणि तिच्या कामात रस असल्यामुळे बर्याचशा गोष्टी घरीच करतो.
3 Apr 2013 - 6:32 pm | श्री गावसेना प्रमुख
मग आमच पण एक काम करा की राव,माझी होंडा ड्रिम युगा मायलेज द्यायच नाही म्हनते,काय करु सांगा ना.
कंपनीच्या शोरुम मध्ये प्रॉब्लेम सांगीतला तर त्यांनी ८० च मायलेज काढल् आता बोला, कंपनीने ७२ च ड्रिम मायलेज सांगीतलय ह्यांनी तर त्यापुढे उडी मारलीये
http://www.honda2wheelersindia.com/dreamyuga/about.html
4 Apr 2013 - 8:57 am | यशोधरा
नखे कापा!
4 Apr 2013 - 9:06 am | श्री गावसेना प्रमुख
तो फोटो त्यांचा स्वताचा नाहीये त्यांनी फक्त फोटो काढले आहेत,फोटोतली व्यक्ती दुसरी आहे.
हो की नाही हो फडणीस साहेब
4 Apr 2013 - 9:07 am | यशोधरा
दुसर्या व्यक्तीला नखे कापायला सांगा अथवा दुसर्या व्यक्तीची नखे कापा :D
3 Apr 2013 - 1:03 pm | सौरभ उप्स
प्रथमा: मान गये बॉस... अतिशय माहितीपूर्ण आहे हे सगळ, एअर फिल्टर साफ करायची कृती पण जबर्या.....
3 Apr 2013 - 10:32 am | मैत्र
भेसळीचा त्रास झाला असेल तर काही दिवस थोडी रपेट मारून शेलचा पंप शोधून तिथे पेट्रोल भरा.
बाजारभावापेक्षा किंचित जास्त असते किंमत पण ती वसुल करून पैसे वाचतील आणि गाडीचा मेंटेनन्स कमी होईल इतके चांगले मायलेज आणि इंजिन परफॉर्मन्स मिळतो. चारचाकीला हा अनुभव आहे पण दुचाकीला कित्येक जणांनी हा दुजोरा दिलेला आहे.
सध्या भेसळीचा त्रास झाला असेल तर एखाद वेळेला शेलचे प्रिमियम पेट्रोल जवळजवळ टाकी फुल होईल इतके टाकून थोडी गाडी पळवा. बरेचदा चांगले इंधन, नवे इंजिन व गियरबॉक्स ऑइल आणि मध्यम ५०-६५ स्पीडची थोडी रपेट यामुळे मशीन चांगले रूळते.. मग रेग्युलर वापरात गाडी चांगली चालते.
पण शेलचे पेट्रोल नक्कि वापरून बघा..
3 Apr 2013 - 11:06 am | सौरभ उप्स
धन्स मित्र, जून पेट्रोल काढून टाकल आणि नेहमीच्या ठिकाणून भरतो तिथलं एच. पी. वाल्यांच पेट्रोल टाकलय सध्या थोडस,
सध्यातरी गाडी व्यवस्थित चालतेय... आता तुम्ही म्हणता तस शेलच पेट्रोल टाकून बघतो नक्की..
5 Apr 2013 - 9:59 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. शेलच्या पेट्रोलमुळे चारचाकीला देखील मायलेज मधे २ किमी वाढ आढळून आली आहे. परंतु शेलचे पंप सर्वत्र नसल्याने पुण्यातून टाकी फुल्ल करून निघतो आणि येताना मग भारत पेट्रोलियम चा पंप बघून तिथे भरतो. पुरते तितके पेट्रोल.
2 Apr 2013 - 5:57 pm | सस्नेह
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?
2 Apr 2013 - 6:25 pm | अभ्या..
आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम(जुनी लाल शेपूटवाली), डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर गाड्याचे कलेक्शन आहे. आणि घरातील कोणीही कुठलीही नेतो, त्यामुळे प्लास्टीकच्या बाटल्याचे पण कलेक्शन आहे. मेंटेनन्सचे गुत्ते एका मेक्यानिकला कायमचे दिलेले आहे. (तो बिचारा वर्षाचे १००० च्या आसपास पैसे मागतो. स्पेअरपार्टचे वेगळे)
कणकवली सावंतवाडी आणि गोवा मी २००३ च्या स्प्लेंडरवर केलेले आहे. ६५ ते ७० मायलेज मिळाले. :)
माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. :)
2 Apr 2013 - 6:33 pm | अद्द्या
माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा.
>>>>
नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस
४० - ४५ मायलेज देते .
आणि ८५ च्या स्पीड ला हि अतिशय आरामात असते . . मस्त गाडी आहे
2 Apr 2013 - 7:16 pm | सुहास..
नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस >>>
नॉन गियर मध्ये माझी पसंती महिन्द्रा वेगो !!
2 Apr 2013 - 7:19 pm | अभ्या..
वेगो टीवीएस ची.
महिन्द्रा (जुनी कायनेटीक) ची ड्युरो, फ्लाईट आणि रोडीओ.
19 Dec 2013 - 9:31 am | मिनेश
अगदी बरोबर.....पळायला भारी आहे अॅक्सेस. फक्त थोडी छोटी आहे. :)
2 Apr 2013 - 6:38 pm | सुहास..
माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. >>>>
होन्डाच्या युनीकॉर्न च्या मॉडेल च मॅन्युयल पण बघुन घ्या मालक एकदा, बाईक हाय वे ला एकदम मस्का आहे.
डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर >>
ईन्फिल्ड आणि बुलेट या " बडबड्या " गर्लफ्रेन्ड ला घेवून फिरण्यासाठी परफेक्ट बाईक्स आहेत ;)
असो ...बुलेट वरून आठवल .
नगरला ऑक्शन मध्ये " डिझेल बुलेट " होती. १९८२ चा मेक, सौजन्य : नगरचा लष्करी तळ , १७,००० कोटेड किमंत ! , मी खिशात ( काही ही झाले तरी घ्यायचीच ) म्हणुन दुप्पट रक्कम घेवुन गेलो होतो...स्साला बाईक असली झक्कास मेन्टेन केलेली की आपण फुल्ल टु फिदा... (ती दोन्ही बाजुला असलेली डिक्की असलेली मिलीटरी ग्रीन कलरची बाईक ! अहाहा !! ) पण पहिल्या ऑक्शच्या फेरीत च बाद झालो ...बाईक दिड लाखाला उचलली एका जालन्याच्या माणसाने, स्साल ऑडीत आलत, जाताना त्या बाईक वर गेल .........