दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
2 Apr 2013 - 3:28 pm
गाभा: 

मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.

बाकी इतरही बरेच प्रश्न असतात

उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.

५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .

माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)

अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .

आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.

नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .

गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .

आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो

परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .

मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर

आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .

अजून एक

दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .

बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच

धन्यवाद

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

2 Apr 2013 - 7:16 pm | अभ्या..

सुहासदादा,
१०० ते ३५० सीसी च्या सगळ्या वापरुन झाल्या गाड्या. मित्रात कायम फिरत असायच्या. युनीकॉर्न आणि डॅझलर पण चालवल्यात. पण आता डिओच बरी वाटते. मध्ये फूटबोर्डावर काहीही ठेवून आणता येते. चालवायला सोपी जाते. घरात कुणीही चालवू शकते. एवढाच उद्देश आहे म्हणून वेस्पा किंवा मायेस्ट्रो. त्यातल्या त्यात अ‍ॅव्हरेज मिळावे.
हायवेवर चालवायला इतर भरपूर आहेत की ऑप्शन.
एकदा इन्फील्डवरुन मनरावांचा कित्ता पण गिरवायची इच्छा आहे. बघू जमले तर :)

सुहास..'s picture

2 Apr 2013 - 7:19 pm | सुहास..

सुहासदादा >>

हैत्त ! वाश्या म्हण मित्रा :)

म्हणुनच महिन्द्रा वेगो ला जास्त पसंती आहे, फिचर्स मध्ये त्या बाईक ला मोबाईल चार्जर देखील आहे. स्पीड, अ‍ॅव्हरेज पण ओक्के , शिवाय गाडी रस्ता सोडत नाही :)

=)) =)) वाश्या नगं. सुहास ठीक हाय. :)
वेगो बी भारी हाय टीव्हीएसची. पण डिओसारखी देखणी स्कूटर फक्त यामाहाची रे. मोबाईल चार्जर बरोबर एक बारका कीबोर्ड पण मिळेल काय. ;)
आजकाल जास्त पिंग आणि मेसेज मी गाडीवर असतानाच येतेत. ;)

स्पा's picture

3 Apr 2013 - 9:12 am | स्पा

वाश्या दादा ;)

अरे चंदिगढ का कुठे म्हणे आर्मीच्या रेसले च्या गाड्या मिळतात , बुलेट

४०/५० हजारात , ऑक्शन वेग्रे प्रकार नसतो , डायरेक्ट उचलायच्या
फक्त चालवत नाय तर ट्रेन मध्ये टाकून आणावी लागेल

अरे स्पा, फक्त चंदिगढ लाच नाही, बर्‍याचशा आर्मी कँटिन्स मध्ये मिळतात. आपल्या जवळपासची ठिकाणं म्हणजे देवळाली आणि खडकी. मी इंदूरला असताना तिकडून जवळ असलेल्या महू मधल्या कँटिनमध्ये पण पाहिल्या होत्या. पण माझ्या मते त्या गाड्या फक्त आर्मी वालेच तिकडून घेऊ शकतात, रिटायर्ट ऑफिसर्स वगैरे. बाहेर आल्या की सिव्हिलियन्स ना विकता येतात म्हणे.

वेस्पा चा पर्याय असताना मायेस्त्रो? हे म्हणजे फुल्ल फॉर्मातला सचिन उपलब्ध असताना त्याला वगळून रोहित शर्माला खेळवण्यातला प्रकार झाला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2013 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्याकेनिक लोक म्हणतात दहा हजार किमि. अंतर पार करुन झाले की ऑइल चेंज करावे. पण, मी पाचहजारला ऑईल चेंज करतो. ऑईल चेंज, कुलन,ऑइल फिल्टर,डिझेल फिल्टर, हे सर्व बदलावे. इंजिन बेल्ट चेक करावे.

स्टार्ट करतांना कधी कधी गाडी घुम्मा धरल्यासारखी करते म्हणजे घु घु घु करते आणि स्टार्ट होत नाही तेव्हा स्टार्टर (प्लक सारख असतात ते) बदलावे. चारशे रुपये त्याचे आणि म्याकेनिकचे ५० रुपये ( औरंगाबादचे दर आहेत)

चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे अंतर जेव्हा असेल तेव्हा इंजिन गरम होत तर नाही ना ? ते बघावे. सारखी गाडी चालवू नये. सुसाट रस्त्यावरुन सुसाट गाडी चालवण्याचा मोह आवरावा. टायरमधील हवेचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. ट्यूबलेस टायरला माझी पसंती आहे.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

शैलेन्द्र's picture

2 Apr 2013 - 8:18 pm | शैलेन्द्र

चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे अंतर जेव्हा असेल तेव्हा इंजिन गरम होत तर नाही ना ? ते बघावे. सारखी गाडी चालवू नये.

गाडीचा थर्मोस्टॅट कधीतरी उडतो. त्यासाठी रेडीएटर फॅनला डायरेक्ट कनेक्शन देवून, कॉक्पीटात एक बटन लावुन घ्यावे.. आणीबाणीत बर पडत, खोळंबा होत नाही.

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स.

प्रत्येक मोठ्या प्रवासाच्या वेळी इंजीन ऑइल, कुलंट, ब्रेक ऑइल, क्ल्च ऑइल नक्की चेक करावे.
हवेचा दाब साधी हवा असल्यास ३० नायट्रोजन असल्यास ३१/३२ ठेवावा.
उत्तम एवरेज मिळण्यासाठी गाडी ६०-८० या पटटयात चालवावी. एक्स्प्रेस वे वरही शक्यतो १०० क्रॉस करू नये.
टायर दर १०००० किमीला मागे पुढे व आत बाहेर करावे. अलाइंमेंट व व्हील बॅलेंसींगही त्याच वेळी करावे.
बॅटरीत दर महिन्याला पाणी चेक करावे.. त्याच्या टर्मीनलला ग्रीस लावुन ठेवावे.
दर १०००० किमीला एअर फिल्टर बदलावा. दर ३००० किमीला स्वतः साफ करावा.
इंजीन कंपार्टमेंट थंड असताना पाण्याने धुवून स्वच्छ करावे, कुठे काही गळती आहे का ते बघावे.
गाडी हाफ क्लचवर चालवू नये तसेच कमी रोटेशनला वरच्या गेअरमधे ही चालवु नये.
शक्य असेल तितक्या वेळा वजन गाडीच्या मध्यावर ठेवायचा प्रयत्न करावा, मागच्या भागात खूप जास्त वजन ठेवू नये.
गाडी कोरडी पुसू नये, धुळ असताना, न झटकता ओल्या कपड्याने पुसु नये. आधी याने ती कार झटकुन घ्यावी मग कपडा पाण्यात बुडवत धुवावी. शक्यतो वॉशींग मीट वापरावे.
काचा पुसायला हे मस्त
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे.
गाडीत कधीही खावु नये/खायचे पदार्थ ठेवून बंद करु नये. उंदीर त्रास देतात

बरच आहे, काही खास शंका असल्यास अनुभवावर आधारीत सल्ला दिला जाईल :).

उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे.

याचे नेमके काय कारण आहे..?

वाईपर काचेला चिकटून ठेवले असताना काचेवर उन्हाने तापलेल्या रबराचे डाग पडतात की उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते..?

शैलेन्द्र's picture

2 Apr 2013 - 10:41 pm | शैलेन्द्र

उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते, तसच तिथे बसलेली धुळ गरम रबरात अडकते, काचेवर ओरख्डे उठतात

कपिलमुनी's picture

2 Apr 2013 - 6:20 pm | कपिलमुनी

लडाख कॅरीयर बसवून मिळता का ते बघ

मन१'s picture

2 Apr 2013 - 6:21 pm | मन१

दैनंदिन जीवनात कामाला येउ शकेल अशी माहिती असलेला धागा. वांझोट्या मतांच्या पिंका टाकण्यापेक्षा हा धागा वाचणे पसंत करीन.

तुमच्याकडे कोणती दुचाकी/चारचाकी आहे, ती महिन्याला किती पेट्रोल्/डिझेल खाते, देखभालीचा खर्च किती येतो ते लिहा की राव. धाग्याचा वापर याचसाठी होतोय. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Apr 2013 - 6:29 pm | श्री गावसेना प्रमुख

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?
म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे,
जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.

काळा पहाड's picture

3 Apr 2013 - 12:47 am | काळा पहाड

म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे,
जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.

माझं उत्तर चोरलं बरं का तुम्ही. बाकी हवा दिवसातून तीन वेळा चेक करायला हवी. दररोज सर्व्हीसिंग मस्ट.

चौकटराजा's picture

2 Apr 2013 - 6:58 pm | चौकटराजा

आमच्या हापिसातला येक बरेच वर्षापूर्वी एम ८० वरून पुण्याहून रोमला जाउन आला होता. स्पा. तुझी ती माडर्न बाईक ठव तुझ्याकडेच एम ८० वरून फिरून ये. सामान वाहून न्यायला बाप बाईक आहे ती. फक्त डबल सीट जाउ नको.

आपला
२२ वर्षे आटमोबाईलात घालविलेला वात्रट चौरा

शैलेन्द्र's picture

2 Apr 2013 - 8:01 pm | शैलेन्द्र

एम ८० सारखी गाडी नाही.. नुस्ता भुंगा..

मागेपुढे १२० लीटर दूध अडकवून, मी सहज चालवायचो..

तुषार काळभोर's picture

2 Apr 2013 - 8:09 pm | तुषार काळभोर

ऑईल कोनतं वापरतो, त्यावर अन लई डीपेंड करतं.
मी कॅस्ट्रॉलचं ४टी(२२२०-२४० रु) टाकलं तर ३०००किमीला बदलतो अन् शेलचं टाकलं तर ६-७००० किमी चालतं.(६००रु)
शेलमध्ये ३ टाईपचे ऑईल येतात. (६००, ८७०, १६००रु). गाडीच्या वकुबानुसार जे-ते टाकावं. माझी शीडी१०० एसेस ला ६००चं चालतं. ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतो. (जास्तकरून भारत पेट्रोलियम. ईंडियन ऑईल आन् हिंदूस्तान पेट्रोलियमवर भरोसा नाय.). ५-६ वेळा शेलचं महाग पेट्रोल टाकूनपन पाहिलं. आईशप्पथ फायरिंग येकदम स्मूथ!!!
पन शेलचं लागोपाठ वापरलं तर फायदा होतो. म्हणून सारखं सारखं नाय जमत. किंमत जास्त आहे म्ह्नून नाय, तर आमच्या जवळ कुठं शेल भेटत नाय म्हणून. वारज्याला हायवेला एक, अन् जुन्या मुंबई हायवेला अँटिबयोटिक्स जवळ एक असे दोनच माहिती आहेत. हडपसरच्या जवळ असलेले खराडी, मुंढवा अन लोणी-काळभोरचे शेल पंप बंद पडल्यात.

(मायलेजः शीडी १००एसेस=७०+, प्लेजर=५०+, स्प्लेंडर+=६५+)

मोदक's picture

2 Apr 2013 - 10:19 pm | मोदक

ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतो

त्यातही ब्रँड् सांभाळणे जमते का ते बघावे.

१) मी पॅशन प्लसमध्ये "क्लब एचपी" (नक्की हेच नाव कां..?) चे पेट्रोल टाकतो. ते ही पंप ठरलेले.

बाहेर जायचे असेल तर हिंजवडी साईडचा एक पंप, थेऊर आणि सासवड रोडवर प्रत्येकी एक पंप आहे आणि किकवी (पुण्यापासून ४५ किमीवर सातार्‍याच्या दिशेने एक पंप आहे, हा पंप २६/११ च्या एका हुतात्म्याच्या वारसांना मिळालेला आहे!) अशा ठरावीक पंपावर पेट्रोल भरायचे..

२) शक्यतो गाडीचा वेग अचानकपणे वाढवायचा नाही. आणि विनाकारण समोरच्या वाहनाला चिकटून ब्रेक मरायचा नाही (हार्ड स्टॉप)

३) सुरूवातीचे १० / १५ हजार किमी गाडी अत्यंत सांभाळून चालवलेली आहे. (इंजिन सेटल होईपर्यंत)

४) दोन जणांच्या गाडीवर तिघेजण प्रवास करायचा नाही (तुझ्या आग्रहामुळे - तुझ्याच यामाहावर तू, सूड आणि मी असा प्रवास केला होता - तसला प्रकार करायचा नाही! :-D)

माझी पॅशन प्लस पुणे शहरात ६५ ते ६८, कोकणात ५५ ते ६० आणि हायवेला ७५ चे मायलेज देते.

मैत्र's picture

3 Apr 2013 - 10:44 am | मैत्र

१) शेलचा कुठलाही - हिंजवडीमध्ये एक आहे त्यामुळे आयटी वाल्या बर्‍याच लोकांना सोयीचा
२) शेलव्यतिरिक्त सगळ्यात चांगला अनुभव -- कुलकर्णी पेट्रोल पंप - भारत पेट्रोलियम- लक्ष्मी रस्ता जिथे अलकाच्या चौकाला मिळतो तो. पुण्यातला अत्यंत जुना पंप.
३) कर्वे रोडवर आदित्य हॉटेलजवळ एचपीचा एक पंप आहे.

३-४ ठिकाणी न टाकता केवळ १-२ पंपच कायम ठेवल्यास अधिक फायदा होऊ शकेल.
या पंपांवर पेट्रोल टाकून नियमित सर्व्हिसिंग, एकहाती गाडी मध्यम स्पीडला पल्सर १५० पुण्यातल्या गल्लीबोळातही ५५-६० देते. पॅशन प्लस, डिस्कव्हर यासारख्या गाड्या नक्कीच जास्त देतील.

मोदकाचे सल्ले अत्यंत नेमके आहेत..
चांगल्या मेकॅनिक कडे किंवा मोठ्या विश्वासार्ह सर्व्हिस सेंटर मध्ये काही काळाने (४-५००० किमि) केमिकल डिकार्ब केल्याने गाडिचा रिस्पॉन्स आणि मायलेज सुधारते.

पेट्रोल भर उन्हात / दुपारि वगैरे न भरता थोडी हवा थंड असताना भरावे. प्रसरण पावून मायलेजला किंचित फायदा होतो असे ऐकले होते. खरे खोटे / कितपत शक्य ते माहीत नाही..

तुषार काळभोर's picture

4 Apr 2013 - 9:35 am | तुषार काळभोर

टाकी कायम फुल्ल ठेवावी. म्हणजे माझ्या गाडीची १०ली ची आहे. ३-४ ली संपलं, की मी परत फुल्ल करतो. (टॉप-अप). जेव्ह्ढं कमी पेट्रोल, तेवढं जास्त हिंदकाळतं अन् उडून जातं. त्यामुळं जमेल तेव्हढी फुल्ल टाकी ठेवायची.

उपाय उत्तम आहे, पण आमच्या कल्याण डोंबिवलीत शिंचे पेट्रोल चोर फार आहेत. त्यामुळे १० लिटर मधलं ८ लिटर जाण्याच्या दु:खा पेक्षा २ लिटर मधलं १.५ लिटर जाण्याचं दु:ख जरा कमी असतं. :))

शैलेन्द्र's picture

2 Apr 2013 - 8:33 pm | शैलेन्द्र

परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
.

तुझ्या पार्श्वभागाची काळजी वाटतेय म्हणून एक गावठी पण अत्यंत परिणामकारक उपाय सुचवतो. ,
एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल. अर्थात तुमच्या नव्या गाड्यांवर हे कसं जमेल ते बघायला हवं.

मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर

आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .

हा प्रकार स्वतः करायची इच्चा असल्यास गाडी पाच मिनिट चालवुन मग गाडीतले सगळे ऑईल ड्रेन कर, मग परत थोडे ऑइल टाकुन गाडी चालु कर, पुन्हा शेवटच्या थेंबापर्यन्त निपटून काढ. मग पुर्ण ऑइल भर.. नंतर गाडी न्युत्रलला ठेवून फ्युएल स्क्रु नियंत्रीत कर.

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2013 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.

मला बहुतेक ट्रकची, नाहीतर ट्रॅक्टरची, ट्यूब शोधावी लागेल.

शैलेन्द्र's picture

4 Apr 2013 - 10:55 am | शैलेन्द्र

नाही हो काका, उलट तुमच्याकडे इन्बिल्ट मॅकेनिजम असल्याने अशा बाह्य उपायांची तुम्हांला गरजच नाही..

स्पा's picture

4 Apr 2013 - 10:58 am | स्पा

=))

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल.

एक नंबर उपाय शैलेन्द्र भौ. करून बघ्ण्ञात येईल.

आणि इंजिन ऑईल बदलते वेळी एक इंजिन क्लिनिंग ऑईल मिळतं ते वापर. जुनं ऑईल काढलं की क्लिनिंग ऑईल टाकयचं, ३-४ मिनिटं गाडी न्युट्रल वर चालू ठेवायची, मग बंद करून हे क्लिनिंग ऑईल काढून टाकायचं आणि नेहमीचं इंजिन ऑईल भरायचं. इंजिनाच्या कार्यक्षमतेत जाणवण्याइतका फरक पडतो. करून पहा.

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल. अर्थात तुमच्या नव्या गाड्यांवर हे कसं जमेल ते बघायला हवं. >>>

हे लई भारी !

प्रचेतस's picture

2 Apr 2013 - 10:47 pm | प्रचेतस

प्रतिसाद लैच माहितीपूर्ण.

१. प्रवासाला निघायच्या आदल्या दिवशी गाडी सर्विसिंग करुन घेउ नये, ऑइल बदलेलं असेल तर किमान ५० किमी गाडी चालवलेली असावी.

२. डिस्क ब्रेक असेल तर त्याच्या ऑइलचा कॅन,छोटाच असतो घेउन ठेवावा.डिस्क ब्रेक ऑईल ही फार वेगळी भानगड असते, इमर्जन्सी मध्ये दुसरं कुठलं ऑइल घालायचा प्रयत्न जीवावर बेतु शकतो.

३. हेड्लाईटचा बल्ब स्पेअर घेउन जा, गाडीची वॉरंटी संपली असेल तर चारी इंडिकेटरला हझार्ड वायरिंग करुन घ्या, चार चाकीचे जसे चारी इंडिकेटर ' झग्गा मग्गा मल्ला बग्गा' लागतात तसं.

४. ज्या भागात जाणार आहेत तिथले तुमच्या गाडीचे सर्विस सेंटरचे फोन नंबर आणि १८००-०००-००० वाले नंबर लिहुन ठेवा.

५. १०० किमी गाडी चालवली की गाडी रस्त्याला पर्पेंडिक्युलर उभी करुन ठेवा, अर्थात रस्त्याच्या बाजुला.
इंजिन लवकर गार करण्याची ही एक उत्तम आयडिया आहे. गेल्या १०० किमीचा अ‍ॅवरेज स्पिड गुणिले २०, एवढे सेकंड गाडी बंद ठेवा.

६. शक्यतो पिलियन सिट्वरुन डुगडुगेल किंवा हलु शकेल असं सामान नेउ नका. पाठीवर एक सॅक आणि मागं एक चौकोनी बॅग ही उत्तम.पाठीवरची सॅक मागं सिटला टेकेल एवढी सैल ठेवा, गाडी चालवताना वजन तुमच्या खांद्यावर येउ नये यासाठी.

६. साधारण सुर्यास्ताच्या आधी अर्धा तास हेडलाईट लावुन प्रवास सुरु करा, आपल्याकडं संधीप्रकाशात आंधळॅ होणा-याची कमी नाही.

७. जमल्यास हायवेला किंवा बांधकामाच्या ठिकाणी कामगार जे जॅकेट घालतात ना रेडियमच्या पट्ट्याचं ते घाला.

८. इंधन शक्यतो कोको पंपांवर भरा,यांची माहिती बिपिसिएल, एच्पिसिएल वगैरेंच्या वेबसाईटवर असते.

६. शक्यतो जास्तिची कॅश नेउ नका, अगदी इमर्जन्सीमध्ये पेट्रोलपंपावर सुद्धा कार्ड स्वाईप करुन कॅश घेता येते, अर्थात ही पंपांची एक्स्ट्रा सर्विस आहे. बहुतेक २-२.५ % कमिशन घेतात.

७. दोन्ही टायरमध्ये ट्युब सारख्याच असतील तर एक ट्युब स्पेअर ठेवा बरोबर.

८. गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी स्वता दुरुस्त करणार असाल तर असले प्रयोग आधी घरी करुन बघा.विशेषत: ब-याच स्प्रिंगा असतात गाडीत्,लॉकिंग नट असतात, हे एकदा उडाले की हुडकायला युगं लागु शकतात. लढायला जाताना बंदुकीचं मॅन्युअल नेउन उपयोग नसतो.

९.

७. संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा.

८. घरच्यांना तुम्ही कुठं कसं जाणार आहात याची कल्पना देउन ठेवा.( फॉलो मनराव)

संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा.

ब्येष्ट सजेशन, स्वतःच्या रायडींगवर डोळस विश्वास असेल तर ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी, हे करताना फक्त मागे बडबड करणारा मित्र नसावा आणि समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे व्य व स्थी त लक्ष असावे.
समोरचे वाहन आणि आपण यातले अंतर कमीजास्त करण्यासाठी एखादा रेफरन्स पाँईंट पकडावा.

सळ्यांनी भरलेला ट्रक, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांच्या नादाला लागू नये.

मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात.

पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत, अगदीच असे रस्ते ओलांडणे गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत.

वरील सर्व प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर, स्वत:च्या व गाडीच्या तब्बेतीनुसार करावेत!

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 12:56 am | श्रीरंग_जोशी

वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत.

बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नका ;-).

वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत.
काय राव रंगेश.. वाल्लीशेथ संपादक झाले म्हणून "प्रतिसाद लैच माहितीपूर्ण." ही टीप झाली का..? आणि ती पण मौल्यवान..?? ;-)

बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नका

किती वाजलेत हो तिकडे..?? :-D

(संपूर्ण प्रतिसाद हलका घ्यावा!)

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 1:15 am | श्रीरंग_जोशी

५० फक्त यांच्या प्रतिसादाच्यावर वल्ली यांचा प्रतिसाद होता. ५० फक्त यांचा प्रतिसाद लांबलचक असल्याने पेज अप केले व नेमके वल्ली यांचे नाव दिसले अन असा घोटाळा झाला.

बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच ;-).

बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच .

नक्कीच मोलाची आहे.

प्रचेतस's picture

3 Apr 2013 - 8:28 am | प्रचेतस

=)) =)) =))

५० फक्त's picture

3 Apr 2013 - 10:53 am | ५० फक्त

मा.श्री.श्रिरंग काका यांस,
आपली टिप अर्धवट आहे, 'पिउन गाडी चालवु नये म्हंजे काय ?' दारुबद्दल असेल तर योग्य पण, याउलट कोणतीही गाडी चालवताना व्यवस्थित संपुर्णपणे हायड्रेटेड असणं अगदी मस्ट आहे. विशेषतः रात्री चार चाकी चालवताना कमित कमी एक लिटर पाणि पिउन गाडी चालवायला सुरु करावी.

रेडबुल/झिंगाला अशी द्रव्ये इतर वेळी प्यायची सवय असेल तरच गाडी चालवताना प्यावीत, पहिला प्रयोग गाडी चालवताना करु नये.

विशेषतः झोप येउ नये म्हणुन बडीशेप खाणे हा एक अनुभवसिद्धा उपाय आहे,

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 6:04 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या प्रतिसादामधले 'पिऊन' = 'नशा करून' असे होते.

मी सुद्धा अनेकदा कॉफी पित पित तासनतास एकट्याने चारचाकी चालवली आहे. त्यामुळे झोप येणे हा किती मोठा धोका असू शकतो हे मी जाणून आहे. च्युइंगम किंवा मिंटच्या गोळ्या चघळत राहणे हाही असाच एक उपाय.

काळा पहाड's picture

3 Apr 2013 - 12:57 am | काळा पहाड

ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी

अतिशय धोकादायक सूचना. याने थोडासे मायलेज वाढते इतकेच. पण रिस्क बघता हे सर्वथा टाळावे हे उत्तम. समोरच्या गाडीमागे व्यवस्थीत अंतर ठेवावे. रात्री जास्त ठेवावे.

अतिशय धोकादायक सूचना - मान्य आहे म्हणूनच काही गोष्टी क्लियर केल्या आहेत,

१) बडबड्या मित्र
२) टेललँप
३) रेफरन्स पॉईंट
४) गाडीची आणि आपली तब्बेत व काळजी!

माझा मुद्दा मोदकने कॅरी केला तो तांत्रिकतेतुन, मी मांडला होता सुरक्षेच्या बाजुने, शक्यतो एका जथ्त्यात जाणारे ट्रकवाल्यांना त्यांच्या युनिटिमुळे हायवेला अडवणे, लुटणे असे प्रकार होत नाहीत. आणि ही शब्दशः प्रचंड लोड घेउन जाणारी (३०-४०-६० टन )वाहनं, सुरुवातीच्या पिकपला उचलायला अवघड असतात पण एकदा मोसम पकडला की यांच्यासारखे हेच. आणि या ड्रायव्हर्सची मॅच्युरिटि जास्त असते, हायवेला नाटकं करतात ते एस्टि,लक्झरी आणि ४०७ लेवलचे लोकं, १६२० + ची लोकं कधीच नाट्कं करत नाहीत, रेसिंग, कट मारणे इत्यादी उद्योगात हे फार कमी दिसतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2013 - 2:48 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. रात्री गाडी चालवताना देखील जर समोरून येणार्‍या वाहनासाठी आपण अपर बंद करून डीपर लावला तर ट्रकवाला समोर असेल तर तो लगेच डीपर लावतो. लक्सरीवाले आणि कारवाले मात्र माजुरडेपणाने अपर लावूनच जातात असा माझाही अनुभव आहे.

हे सारे सल्ले ब्येष्ट. फार फायदा होतो यातल्या बर्‍याच गोष्टींचा..

(हे सल्ले पाळून प्रचंड फायदा झालेला) प्रथम.

५०, शैलेंद्र, मोदक वाचनीय प्रतिसाद .

jaypal's picture

3 Apr 2013 - 10:41 am | jaypal

प्रथमोपचार पेटी जवळ असु द्या.
अवांतर = सायकल अथवा कोणतीही ट्युब एयर कुशनिंग साठी वापरा/ नवापरा पण कैलासजिवन ट्युब मात्र जरुर वापरा.
कोकण दौ-यास शुभेच्छा. व्रुतांत व फोटो ची वाट बघतोय.

स्पा's picture

3 Apr 2013 - 11:14 am | स्पा

५०, मोदक रावांनी रात्री ड्राईव करणे बाबत मार्गदर्शन केले

पण भयानक उन्हात तापलेल्या रस्त्याने तितकेच त्रासदायक असते
लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा .

१. पहाटे 3/४ वाजताच प्रवास सुरु करणे श्रेयस्कर , कारण उजाडे पर्यंत आपण आपल्या शहरातल्याच ओळखीच्या रस्त्याने जात असतो ,सो अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो. उन्ह तापाय्च्या आत आपण बराच अंतर कापलेल असत.
२.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे.
3. डबल सीट जात असाल तर दर २ तासाने आलटून पालटून गाडी चालवणे श्रेयस्कर.
४. एक रुमाल ओला करून डोक्याला बांधून मग त्यावर हेल्मेट घालणे .
५. जमल्यास तोंडाला रुमाल बांधणे.
६. हेल्मेट ची काच हायवेला खालीच करून ठेवणे, कारण हायवेला छोटे छोटे खडे उडून , माती उडून डोळ्यात जाण्याचे चान्सेस असतात .
७. गळ्यात एक छोटा टॉवेल ओला करून गुंडाळणे.
८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक.

आता कोणी म्हणेल कि एवढे पालथे धंदे करण्यापेक्षा , चान ट्रेन , एस टी किना गारेगार येशी कार ने जाणं काय वाईट

पण .. बाईक ने जाण्यात जे थ्रील असत ,त्याची सर कशालाच येणार नाही :)

५० फक्त's picture

3 Apr 2013 - 11:37 am | ५० फक्त

काही चुकीचे समज आहेत

१. पहाटे ३-४ वाजता प्रवासाची सुरुवात किमान बाईकवर तरी अजिबात करु नये. विशेषतः हायवेला ट्रक व इतर हेव्ही वाहनांचा हा पिक टाइम असतो, ब-याच शहरांत अशा मोठ्या गाडयांना सकाळी ७ नंतर प्रवेश नसतो, म्हणुन ही लोकं पुढचं शहर पास करण्यासाठी जिवाचं रान करतात नाहीतर तो आख्खा दिवस बसुन काढावा लागतो. आणि जेवढा उन्हाचा त्रास दुचाकीवर होतो त्यापेक्षा जास्त त्रास मोठ्या गाडीला होत असतो,

पहाटे आणि संध्याकाळच्या संधिप्रकाशात गाडी चालवणं ही एक कसरत असते, अगदी मधली एक पाच दहा मिनिटं तर संधीप्रकाश आणि गाड्यांचे प्रकाश एक्मेकांना क्रॉस होउन काहीच दिसत नाही अशी अवस्था होउ शकते. अशावेळी ट्रकवाले गाडी अप्परवर टाकतात, आणि दुचाकीस्वार अगदी परफेक्ट त्या लाईट बिमच्या सेंटरला येत असल्याने त्याला समोरचंच काय पण बाजुचं देखील *ट काही दिसत नाही. समोर हेलमेट्ची काच असेल ती सुद्धा स्क्रॅच पडलेली मग तर अजुन आनंद आहे.

हायवेला हेलमेटच्या काचा खाली घेणं यापेक्षा संपुर्ण डोळे झाकणारा क्लिअर गॉगल, इलॅस्क्टिकवाला हा जास्त चांगला उपाय आहे, याच्या काचेच्या फ्रेमला फोमची लेअर असते त्यामुळं डोळ्यात धुळ अजिबात जात नाही. हा साधारण स्किइंग करताना घालतात तसला असतो.

ओला रुमाल डोक्यावर किंवा गळ्याला बांधण्यानं सर्दीचा त्रास होउ शकतो हे लक्षात घ्या. त्या पेक्षा आजकाल ज्या मेंथॉल पावडर मिळतात त्या वापरा, गारवा राहतो.

शक्य असल्यास सेफ्टी शुज वापरा, यांची बॉटम ग्रिप उत्तम असते, बाईकिंगचे वेगळे शुज मिळतात पण ते प्रचंड महाग असतात, फुल सॉक्सच्या ऐवजई अँकलेट वापरा, सॉक्सचं इलॅस्टिक पिंड-यांवर घट्ट बसल्यानं पायाला मुंगा आल्यासारखा त्रास होउ शकतो,

पँटी शक्यतो जिन्स टाळा, बॅगी टाईपच्या पण बेल बॉटम नसलेल्या वापरा, बेल बॉटमचा मोठा बॉटम गिअर लिव्हर किंवा ब्रेक पॅडलमध्ये अडकतो. पँट बँड्वाल्यांसारखी सॉक्स किंवा बुटात खुपसुन ठेवणं सग़ळ्यात भारी, बेसिक म्हंजे एक एक व्हेरिएबल क्मई करत आणा.

प्रचेतस's picture

3 Apr 2013 - 12:13 pm | प्रचेतस

आपण तर साला ५० रावांच्या प्रतिसादांचे फ्यान झालोत.

स्पा's picture

3 Apr 2013 - 12:22 pm | स्पा

पन्नास राव झिंदाबाद

एक बाईक ट्रेक होऊन जौंदेत

प्रचेतस's picture

3 Apr 2013 - 12:33 pm | प्रचेतस

चलो ताम्हिणी घाट 'दगडांच्या देशा...' प्रोजेक्ट करायला.

मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची यामा घेउन आमच्या रेड मर्क्युरीच्या भेटीला येणार होता, काय झालं त्याचं ?

सिसि - १५० विरुद्ध २२०
गाडीचं वजन - १०० विरुद्ध १६०
कुलिंग सिस्टिअम - नॅचरल विरुद्ध ऑईल
स्टार्टिंग मेथड - किक + बटन विरुद्ध फक्त बटन.(म्हंजे बायकोपेक्षा गाडीची अन गाडीपेक्षा इंजिनची आणि इंजिनपेक्षा बॅटरीची काळजी जास्त)
सगळ्यात महत्वाचे - बाइकस्वाराचे वजन - यामाहा ४* ते ५* किलो - रेड मर्क्युरी - ९२ किलो.

कधी येताय बोला, फ्लेक्स छापुन घेतो अभ्याकडुन.

स्पा's picture

3 Apr 2013 - 2:35 pm | स्पा

=))

एनि टाईम

हम तैय्यार हे
बस वक्त और जगा बता दो

सौरभ उप्स's picture

3 Apr 2013 - 2:52 pm | सौरभ उप्स

हम भी तय्यार है, विथ टि.वि.एस. अपाची आर.टि.आर. १६० (नुकतीच रेपैर केलीये तरी दगा देणार नाही अशी खात्री आहे).....

५० राव, त्यापेक्षा तुम्हीच या की इकडं तुमची रेड मर्क्युरी घेऊन. :)

अभ्या..'s picture

3 Apr 2013 - 2:41 pm | अभ्या..

पण या डावात मी पण आलो तर पन्नासदादा? ;)
माझी कॉलेजच्या वेळची आरेक्स १३५ ओव्हरड्राइव्ह (५गिअर) घेऊन. जरा इंजिनकाम करावे लागेल बाकी काही नाही.
१३५ सीसी. ३५ मायलेज, एअरकुल्ड, कीकस्टार्ट आणि रायडर वेट फक्त ६८ केजी. ;)
हाय का तयार मग फ्लेक्स फुकटात छापतो.

यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या दोन्हीकडुन लोकं येणार म्हंजे पुण्यातच जमायला पाहिजे, चला लवासात जाउ फिरायला, पण पावसात नाही. पावसात तिथले घाट दुचाकी चालवत नेण्याच्या लायकीचे नाहीत.

मोदक's picture

3 Apr 2013 - 9:33 pm | मोदक

मा मिस्पाजी..

अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो

असे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात.

बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी!

२.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे.
८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक.

भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-)

सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स!

माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते..

याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते.

त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Apr 2013 - 12:47 am | विश्वनाथ मेहेंदळे

लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा .

खोपोलीच्या आजूबाजूचे रस्ते टाळावेत, हे विसरलास काय रे ?? ;-)

सुमीत भातखंडे's picture

3 Apr 2013 - 11:27 am | सुमीत भातखंडे

आपण साले बस किंवा एसटी वाले...पण धागा मस्त आहे. सगळेच प्रतिसाद महितीपूर्ण

योगी९००'s picture

3 Apr 2013 - 1:18 pm | योगी९००

मस्त सल्ले दिले आहेत.....

डिझायर पेट्रोल विषयी काय मत आहे? कशी आहे ही गाडी?

कपिलमुनी's picture

3 Apr 2013 - 1:57 pm | कपिलमुनी

हेल्मेटला आणि बॅग ला रेडियम च्या पट्ट्या लावून घ्या ..
सामान २ बाजुला समान वजना मधे विभागून लावा ..
वेगामधे वळणावर जर सामान एका बाजुला लावले असेल तर पडण्याची शक्यता असते..
प्रवास मोठा असेल तर कॅरीयर बसवणे सर्वात उत्तम ..
१००० किमि पेक्षा मोठा प्रवास असेल तर डबल सीट करू नका ..

माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे. दोन वर्ष झाली जवळ जवळ १२५०० किमी झाले आहे चेन्नई शहरा मध्ये मस्त ४५-४७ आव्र्रेज देते आहे , फक्त इंडिअन ऑंईल कंपनी चे पेट्रोल टाकतो (५०० रु चे पेट्रोल टाकले तर नित्रोजन ऐअर फ्री भरून देतात )
मस्का चालते आणि डिस्क ब्रेअक पण मस्त आहे (डिस्क ब्रेंक आणि रेअर ब्रेअक चा एकत्र वापर करतो )
एकटे जाणार असाल तर मस्त आहे

नितिन थत्ते's picture

3 Apr 2013 - 2:08 pm | नितिन थत्ते

सोप्पा उपाय म्हणजे नेहमी अधिकृत सर्विस सेंटरमध्ये सर्विसिंग करावे. इंजिन आणि कार्ब्युरेटरची कामे अधिकृत सर्विस सेंटरमधून करावीत. बाकीची कामे रोडसाईड मेकॅनिककडून करून घ्यावीत.

वामन देशमुख's picture

3 Apr 2013 - 3:01 pm | वामन देशमुख

सर्विस सेंटर मध्ये/ मेकानिक लोक बाईकची सर्विसिंग करतात म्हणजे नेमके कायकाय करतात?
कुणी स्टेप-बाइ-स्टेप मार्गदर्शन करू शकेल काय?

मोदक's picture

4 Apr 2013 - 2:27 am | मोदक

दुचाकीसंदर्भात..

१) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात.
२) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते
३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी.

गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!)

४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे
५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप.
६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण
७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे
८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे
९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग
१०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे
११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे
१२) बॅटरी चेक करणे
१३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते.
१४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे.

यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात,

उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे
मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे.
गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे....

मुद्दा २ व ३ प्रमाणे पुन्हा डीट्टेल चेकींग.

(काही विसरले असल्यास कृपया भर घालावी!)

वामन देशमुख's picture

4 Apr 2013 - 9:56 am | वामन देशमुख

धन्यवाद हो मोदक साहेब, अजूनही काही सांगण्यासारखे असेल तर सांगा.

तुम्ही लिहिली आहे ती आदर्श कृति जी केली पाहिजे ती आहे
सगळे सेर्विस सेंटर्स , बहुतेक कायमच एवढेच करतात

१) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात. -- हे शेवटी करतात
२) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते -- हे करतात पण गाडीचे काही खरे नाही असे भासवतात
३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी. -- हे नक्कीच करतात
गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!)

४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे -- हे जर तक्रार केली तरच करतात
५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप. -- हे मात्र गरज नसली तरी करतात
६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण -- पास
७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात
८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे -- मला तरी अजून कुणी हे केले आहे म्हणून सागितले नाही
९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग -- ह्याबद्दल कल्पना नाही
१०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात
११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं
१२) बॅटरी चेक करणे -- हे करतात स्टेप ३ मध्ये हे होवून जाते
१३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते.
१४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे. -- हे फक्त पुढचे हेंड लाईट चे टवळ हलत असेल तर करतात
यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात, -- हे मात्र नक्की करतात आणि तुमचे गाडी मारायला टेकली होती ती आम्ही वाचवली आसे दाखवतात
उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे
मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे.
गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे....

मी दर दोन महिन्यांनी सर्विसिंग करून घेतो दर वेळी इंजिन ओइल आणि ब्रेअक ओइल संपल आहे म्हणून सागतात आणि नवीन घातलं म्हणून सागतात, आणि दर वेळी नवीन काहीतरी शोधून काढतात आणि जुनी सर्विसिंग जर दुसरीकडे केली असेल तरी त्याने फसवले आणि त्यांच्याकडे केली असेल तर काहीतरी चूक झाली असेल म्हणून सांगतात

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2013 - 2:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं

:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O

च्यायला माझ्या गाडीच्या ३ वर्षाच्या ट्युनिंग चा खर्च पण येवढा येणार नाही. अहो आयडलिंग आणि ट्युनिंग तुम्ही घरी करु शकता. कार्ब्युरेटर ला सेट स्क्रु दिलेला असतो त्याच्यावरती ह्या अ‍ॅडजस्ट्मेंट करता येतात. असल्या भुरट्या मेक्यानिक पासुन गाडीला लांबच ठेवा.

स्पंदना's picture

3 Apr 2013 - 4:06 pm | स्पंदना

चला अजरामर झाला हा धागा.
आणि वर स्पाची झैरातपण झाली मॅचो म्हणुन.
काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.

काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.

बायकांना "नो वेण्त्री" चा बोर्ड लावलेला नव्हता ;)
आणि चर्चा फक्त दुचाकीची नाहीये, चारचाकी वर पण आहे
असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? ;)

सौरभ उप्स's picture

3 Apr 2013 - 4:58 pm | सौरभ उप्स

>>>>असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ?
ख्या ख्या ख्या...

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? >>> येस ..येस ... परिपूर्ण सहमत ;)

बॅटमॅन's picture

3 Apr 2013 - 5:57 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११११११.

या बायकांना बाकी किरकिर केल्याशिवाय चैन कशी ती पडत नै बॉ =))

(मरतंय आता-बॅटमोबील घेऊन सूट बघू लौक्कर)

बॅटमॅन's picture

3 Apr 2013 - 5:58 pm | बॅटमॅन

आणि हो, फेसप्याकबद्दल स्पांडूशी प्रचंड सहमत!!!

यशोधरा's picture

4 Apr 2013 - 4:25 pm | यशोधरा

तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ?

तुम्ही कशापायी बोलाल? तुम्ही चूपचाप तो धागा वाचून ते प्याक तुमच्या चेहर्‍यावर चोपडले असणार! :P

नन्दादीप's picture

3 Apr 2013 - 5:50 pm | नन्दादीप

गाडीच्या चाकात नायट्रोजन भर....
१. रोड वर ग्रीप मस्त मिळते.
२. लाँग रूट ला टायर थंड रहातात (जर नुसतीच हवा भरली असेल तर लवकर हवा गरम होऊन तायर फुटतात).
३. टायर झीज कमी होते.

झकासराव's picture

4 Apr 2013 - 8:38 am | झकासराव

मपल्याकडे पल्सर १५० आहे.
एव्हरेज मिळत्ट ५०-५२ च्या रेन्ज मध्ये.
अर्थात शहरात चालवत असल्याने स्पीड ४०-६० मध्येच असतो.
हायवे ला अ‍ॅव्हरेज कमी होतं. कारण स्पीड आपोआपच ७०-८०-९० ह्या रेन्ज मध्ये असतो.

रेग्युलर सर्व्हिसिन्ग (साधारण ३ ते साडेतीन हजार किमी रनिन्ग) करुन घेतो. नेहमी एकाच सर्व्हिस सेन्तर मध्ये.
म्हणजे ओळख राहते. उगाच पैशे उकळत नाहीत.

ऑइल चेन्ज साधारण ३५०० ते ४००० च्या रेन्ज मध्येच. (कंपनीने चक्क १०००० किमी दिलय?? पण माझा विश्वास नाही)

नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो)
त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?

नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो)
त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?

असेच बोलतो.
पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय

पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय - नाही,त्या हवेतला नायट्रोजन काढुन वेगळ्या टाकित साठवुन वेगळा विकतात.

असो,

आजकालच्या दुचाकी किंवा चारचाकी, सगळ्याच गाड्यांचा कोणता ना कोणता भाग हा एकत्र सैन्यदलांसाठीचे किंवा रेसिंगच्या क्षेत्रात होणारे आर अँड डि चे देणे आहेत. नायट्रोजन भरणं हा त्यापैकीच एक, अमेरिकेत होणा-या नासकार सारख्या काँक्रिट सरफेस वर होणा-या स्पिड कम ड्रॅग रेस मध्ये याची सुरुवात झाली.

अर्थात सामान्य गाड्यांना याने फार फरक पडत नाही, नियमित समजुतीच्या विरुद्ध आश्चर्यकारकरीत्या टायर फुटणे याचा संबंध हवा कमी भरण्याशी जास्त आहे, हवा जास्त भरण्याशी नाही. याबद्दल परत लिहिन,

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Apr 2013 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

या सगळ्या चर्चे मधे आमच्या आवडत्या स्प्लेंडर बद्दल कोणीच काही बोलु नये?
१५ वर्षां झाली गाडीला दर तीन महिन्यांनी सर्व्हीसिंग करुन घेतो बाकि कोणताही खर्च नाही गाडीला.
२०,००० कि.मी नंतर बळेच टायर बदलले होते. शहरात अ‍ॅव्हरेज ५० पर्यंत. पण शहरा बाहेर ५५-५८ पर्यंत सहज जातो.
लाँग ड्राइव्हला पण काही त्रास देत नाही.
त्या मुळे दुसरी पण सुपर स्प्लेंडरच घेतली आहे. वो भी मक्खन जैसे चलती है.
आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही.

५० फक्त's picture

4 Apr 2013 - 10:38 am | ५० फक्त

आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही. - एक दोन वर्षात दिसतील फरक, पहिला पडला तो, बजाज डिस्कव्हर फॅमिलीने हिरो पॅशन फॅमिलिला ओव्हरटेक केले, सगळ्यात जास्त विकल्या जाणा-या गाडीच्या रेसमध्ये.

प्रचेतस's picture

5 Apr 2013 - 9:15 am | प्रचेतस

५० राव,
या निमित्ताने भारतातल्या दुचाकींच्या सुरुवातीपासून आताच्या अत्याधुनिक बाईकपर्यंत नेणारी एखादी लेखमाला सुरु करा.

स्पा's picture

5 Apr 2013 - 9:17 am | स्पा

सुभान अल्ला

प्लीजे धागा क्र २ काढता का? इथे प्रतिसाद सोधायला त्रास होत आहे. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

4 Apr 2013 - 11:20 pm | मुक्त विहारि

मस्त लेख...

तुषार काळभोर's picture

5 Apr 2013 - 3:19 pm | तुषार काळभोर

दुचाक्यांविषयी भरभरून बोलले (ऊप्स.. बोलल्या) गेले आहे. चारचाकीवर बोला कुनीतरी.
पेट्रोल अन् डीझेल च्या मोडेल मध्ये दीड-दोन लाखाचा फरक असतो. तर इंधनावर खरंच तेव्हढी बचत होते का?
पुन्यात डीझेल=५२ रुप्रलि अंदाजे
अन् पेट्रोल = ७४ रुप्रलि अंदाजे
स्विफ्टसारखी गाडी: डीझेल=२०किमी प्रलि= २० किमी प्रती ५२ रु= २.६ रु प्रति किमी
पेट्रोलः १७ किमी प्रलि=१७ किमी प्रती ७४ रु= ४.३५ रु प्रति किमी
प्रती किमी १.७५ रु ची बचत.
तेसुद्धा सरकार अनुदान देतंय म्हणुन. रोज ५०किमी चालवणारा माणुस ९०रु वाचवाणार. म्हणजे २५०० प्रती महिना. दीड लाख अतिरिक्त खर्चून महिना २५०० वाचवायचे? तेपण रोज ५० किमी चालवणे होत असेल तर.
शिवाय डीझेल कारचा देखभाल खर्च पेट्रोल कार पेक्षा अधिक असतो, असे ऐकले आहे. डीझेल गाडी प्रदूषण जास्त करते, ते वेगळेच.

एकुणात.. डीझेल कार पेट्रोल कारच्या तुलनेत परवडते काय?

एका वेगळ्या धाग्याचा विषय,

सध्या एवढेच,

सध्या सर्वात स्वस्त सिएनजी,त्यानंतर डिझेल, त्यानंतर पेट्रोल.

आणि हो हल्ली मेंटेनन्स्चा खर्च पेट्रोल डिझेलचा सारखाच येतो, फार फरक नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2013 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति कि.मि. :)

गवी काका या धाग्यापासून काही कारणाने लांब राहिले आहेत
नाहीतर त्यांनी मदत केली असती असो

आपले ५०, आणि शैलेंद्र काका आहेत :)

इतका वेळ बाईकवर बसून बसून प्रवास करणार म्हटल्यावर मला मायलेज आणि इंजिनात घालण्याच्या विविध वंगणांपेक्षाही "कैलास जीवन", "हडेन्सा", आदिंचा विचार मनात येतो आहे.

A
A

सिग्नल ग्रीन होण्याची वाट पहात असताना गाडी बंद करावी का..? कधी करू नये..?

काळा पहाड's picture

6 Apr 2013 - 1:41 am | काळा पहाड

चालू करताना सारखी किका मारायला लागत असेल तर बंद करू नये. मागचे फार बोंबलतात.

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Apr 2013 - 10:26 am | लॉरी टांगटूंगकर

जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे.
जवळ असल्यास आणि १०-१२ सेकंदाच्यापेक्षा जास्त वाट बघायची असल्यास बंद करण्यास हरकत नसावी.

५० फक्त's picture

6 Apr 2013 - 4:11 pm | ५० फक्त

दुचाकीला १० सेकंद आणि चारचाकीला १५ सेकंद ह्याच्यापेक्षा कमी वेळ असेल तर गाडी बंद करुन किंवा न करुन किमान इंधनबचत तरी होत नाही,

कारण बंद असलेले इंजिन सुरु होताना लागणारे जास्तित जास्त इंधन हे या वेळेत शांतपणे चालणा-या इंजिनात जळणा-या इंधनाएवढे किंवा त्यापेक्षा कमी असते. अर्थात गाडीचे स्पार्क प्लग हा या मधला सर्वात मोठा फॅक्टर आहे. स्पार्क प्लगचे क्लिअरन्स हा एक पार्ट वर सर्विसिंगच्या प्रतिसादात राहुन गेला आहे, ज्यांनी जानदार सवारी लुना वापरली आहे त्यांना ह्याचे महत्व माहित असेलच.

बाकी, लुना हा शब्द टाइपताना देखील हात थरथरत आहेत, टिएफार प्लस ही निदान माझ्या पिढितल्या कित्येंकांची पहिली गाडी असेल.

काळा पहाड's picture

6 Apr 2013 - 1:39 am | काळा पहाड

ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स बसवतात ते कोथरूड साइड ला किंवा पुण्यात कुठे मिळेल? लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.

लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.

सॅकचे स्ट्रॅप्स अ‍ॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत.

(तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)

काळा पहाड's picture

6 Apr 2013 - 11:12 am | काळा पहाड

पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल बॅग/बॉक्स मधे घालून नेला तर जास्त चांगलं नाही का?

तसा विचार करायचा तर रोज कॅब हायर करून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास केला तर सर्वात चांगले. धूळ, धूर, वाढते प्रदूषण वगैरे शहराच्या भूषणांशी सामना होत नाही. आपण आपली आवडती गाणी ऐकत आरामात मागे बसून राहू शकतो. आणि सर्वात महत्वाचे लॅपटॉप सॅक बाजूच्या सीटवर आरामात पहूडलेली असते! ;-) (संपूर्ण सल्ला हलका घ्यावा!)

---तुम्ही सॅक वापरता आहातच तर त्यातल्या त्यात सोयीची कशी पडेल या विचाराने स्ट्रॅपचा सल्ला दिला होता हो, मला व्यक्तीशः गाडीला आणखी काही जोडलेले (अगदी हेल्मेट लॉक होल्डर सुद्धा!) आवडत नाही. सॅडल बॅग/बॉक्स लै लांबची गोष्ट आहे. (हे माझे व्यक्तीगत मत आहे)

बाईकच्या बाजुला साईड बॉक्स किंवा सॅडल बॅग बसवतात त्यांचा विचार लॅपटॉप ठेवण्यासाठी अजिबात करु नका. सुरक्षेच्या कारणास्तव बाकी काही नाही. त्यापेक्षा मोदकने लिहिलंय तसं स्ट्रॅप अ‍ॅडजस्ट करुन बॅग मागं टेकवा सिटाला म्हंजे तुमच्या खांद्यावर किंवा पाठीवर लोड येत नाही. माझ्या रेड मर्क्युरीचं सिट यासाठी एकदम परफेक्ट आहे, समोरचं खाली गेलेलं आणि मागचं वर, बजाजांनी सांगितल्याप्रमाणे 'feel like god' लई भारी.

स्पावड्या, झाली का गाडी झ्याक?

स्पा's picture

26 Apr 2013 - 1:04 pm | स्पा

सर्विसिंग झाली

३६ वर घसरलेला मायलेज आता ४५ पर्यंत आलाय :)

म्या जाम खुश है

गवि's picture

26 Apr 2013 - 2:23 pm | गवि

काहीसे अवांतर. नुकत्याच ठाण्यात झालेल्या एका डिस्प्लेमधे पाहिलेल्या या हार्ले डेव्हिडसन आणि अकिला कशा वाटताहेत ? यांची देखभाल कशी पडत असेल ??

A

B

C

स्पा's picture

26 Apr 2013 - 2:26 pm | स्पा

फटू दिसत नाहीयेत :(

दिसले...
कडक बाइक्स हैत राव

कोमल's picture

26 Apr 2013 - 3:09 pm | कोमल

पूण्यात हापिसाच्या रस्त्यालगत दिसली होती.. हारलेल्या डेविड्सन इतकी भन्नाट नाहीये पण आवडेश झाली.
st71

st72

मालोजीराव's picture

11 Dec 2013 - 12:41 pm | मालोजीराव

ह्योसंग आहे ती

अनिरुद्ध प's picture

26 Apr 2013 - 6:05 pm | अनिरुद्ध प

आपल्या दुचाकी वाहना बाबत तज्ञा कडुन सल्ला हवा आहे. Activa Honda & Access 125 या मध्ये वापरण्यास उत्तम पर्याय कोणता या बाबत तज्ञाचे मार्गदर्शन हवे आहे.

शैलेन्द्र's picture

27 Apr 2013 - 4:37 pm | शैलेन्द्र

तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत असलेली माहिती देतो,

  • दोन्ही गाड्या छान आहेत
  • जर तुमची उंची चांगली असेल तर होंडा अ‍ॅव्हीएटरचा विचार करा, या गाडीला होंडा अ‍ॅक्टीवाचेच इंजीन आहे पण सिटींग थोडे वरती आहे, शिवाय पुढचे चाक मोठे आहे त्यामुळे गाडी स्टेबल राहते
    • अ‍ॅक्सेस १२५चे इंजीन आधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे पिकप चांगला मिळतो.
  • स्पेअरपार्ट व सर्विसींग्चे जाळे होंडाचे चांगले आहे
  • थोडक्यात दोन्हीही चांगल्या गाड्या आहेत, चालवून बघा, तुम्हाला आवडेल ती घ्या
अनिरुद्ध प's picture

29 Apr 2013 - 12:54 pm | अनिरुद्ध प

शैलेन्द्र,
आपले मनह पुर्वक आभार्,तसेच आपलि विनम्रता स्प्रुहणीय्,माहिती आवड्ली.

शैलेन्द्र's picture

29 Apr 2013 - 10:03 pm | शैलेन्द्र

क्स्च कस्च.. :)

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 7:40 pm | अनिरुद्ध प

बापरे लाजणे तर अप्रतिम.

अलबेला सजन's picture

6 May 2013 - 11:07 am | अलबेला सजन

दुचाकिचा कार्बोरेटर किती दिवसातून साफ करावा? त्याचे फायदे काय? आमचा मेक्यानिक कार्बोरेटर साफ करायला नेहमी नकार देतो व साफ केल्यास सरासरी कमी येइल अस म्हणतो. हे खर आहे का??

प्रचेतस's picture

7 May 2013 - 11:20 am | प्रचेतस

बाईकचे जुने टायर्स खराब झाल्यामुळे ट्युबलेस टायर्स बसवायचा विचार आहे. पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स आहेत.

एक दोन ठिकाणी चौकशी केली कुणी म्हणे फक्त मागच्या चाकालाच ट्युबलेस टायर बसवावा, पुढच्या चाकाचे फिटींग नीट होत नाही, टिकतही नाही. तर कुणी म्हणे दोन्ही टायर्स उत्तम रिझल्ट देतात.

कुणी योग्य मार्गदर्शन करेल काय?

स्पा's picture

7 May 2013 - 11:32 am | स्पा

माश्री फोडणीस काका यावर उत्तम मार्गदर्शन करू शकतील

परवाच त्यांच्याकडून कोकण दौर्यासाठी जबराट बंजी कॉड आणल्या आहेत.
आता त्यावर ब्यागाच काय अक्खा हत्ती सुद्धा बांधून घेऊन जाऊ शकतो :)

प्रचेतस's picture

7 May 2013 - 11:34 am | प्रचेतस

धन्यु.
कॉलिंग फडणीस काका.

वल्ली नमस्कार. तुमची गाडी कोणती आहे? आणि मुख्य म्हणजे तिला स्पोक व्हिल्स आहेत की अ‍ॅलॉय?

पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स आहेत.

अ‍ॅलॉय व्हील्स आहेत ना? मग फार काऴजी नाही. १७ इंचाचे कुठलेही ट्युबलेस टायर बसतील. पुढच्या चाकासाठी MRF ZFS Tubeless किंवा Michelin PILOT SPORTY Tubeless तर मागच्या चाकासाठी CEAT Vertigo RAGE किंवा SPORT, MRF Zapper C अथवा Zapper VYDE मिळतील. पुढच्या टायरला ट्रेड पॅटर्न फारसा बदलत नाही, त्यामुळे वरील पैकी कोणताही चालेल. (शक्यतो MRF च घ्या.)

हा MRF ZFS Tubeless -
a

आणि हा Michelin PILOT SPORTY Tubeless -
s

मागील टायरसाठी मात्र ट्रेड पॅटर्न बघून घ्या. तुमच्या चालवण्याची स्टाईल, रस्ते यावर ट्रेड पॅटर्न निवडा.

हा CEAT Vertigo SPORT आणि RAGE -
a

MRF Zapper C -
w

MRF Zapper VYDE -
q

आपल्या कडचे रस्ते आणि इतर स्थितींमध्ये भारतीय बनावटीचे टायर्स जास्त उत्तम चालतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे उगाच Michelin, Bridgestone, Pireli असल्या निष्कारण महागड्या ब्रँड्स कडे जाण्यापेक्षा CEAT किंवा MRF कधीही उत्तम.

प्रचेतस's picture

8 May 2013 - 3:29 pm | प्रचेतस

धन्स रे प्रथम.

आता हा ट्रेड पॅटर्न कसा निवडायचा?
म्हणजे कुठले रस्ते / चालवण्याची स्टाईल यावर कुठला पॅटर्न वापरणे जास्त योग्य ठरेल?

आता माझा हापिसचा रोजचा रस्ता बर्‍यापैकी चांगला आहे तर काही वेळा भटकायला जाताना खडबडीत रस्त्यांनी जावे लागते. आणि चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.

चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत रस्त्यांना Zapper पॅटर्न चांगला असतो. एक तर हा पॅटर्न गाडी चालवण्याच्या दिशेनुसार बनवलेला असल्यामुळे त्याला ग्रीप तर उत्तम मिळतेच, शिवाय त्यात काही लहानसहान गोष्टी (छोटे दगड, खिळे इ.) अडकल्यास गाडीच्या वेगामुळे आपोआप निघून जाण्यास मदत होते. आणि तुम्ही शार्प टर्न्स घेत नसलात तर हा पॅटर्न व्यवस्थित आहे. माझ्या पल्सर २२० ला स्टॉक मध्ये MRF Zapper आहेत. गाडी १६००० किमी च्या आसपास चालूनसुद्धा अजून झिजणे किंवा बदलण्याची वेळ आलेली नाही. म्हणूनच मी MRF टाका असं म्हटलं.
काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या बाईकला Michelin M45 टाकला. पण त्याला Wet Grip जवळपास शून्य आहे. पावसाळ्यात प्रचंड घसरण्याचे प्रताप झाल्या नंतर पुन्हा MRF वरच आला. त्यामुळे सर्वार्थाने MRF चे टायर्स उत्तम आहेत.

प्रचेतस's picture

8 May 2013 - 4:24 pm | प्रचेतस

धन्स रे.

सध्याचा MRF Zapper च आहे. ५०,००० किमी आणि जेमतेम ३/४ पंक्चर्स झाली बेट्याला. आता अतीव म्हातारपणामुळे निवृत्त करून टाकतो आणि त्याचीच नवीन पिढी घेईन म्हणतो.

नानबा's picture

8 May 2013 - 4:38 pm | नानबा

Zapper जब्राटच आहेत. आणि ट्यूबलेस Zapper तर एकदम ब्येष्ट. पहिले १५००० किमी पर्यंत तर पंक्चरसुद्धा होत नाहीत. फक्त हवेच्या ऐवजी त्यात नायट्रोजन भरा. भन्नाट परफॉरमन्स देतात टायर्स.

' चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.'

अर्थात पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.

पैसा's picture

17 May 2013 - 8:44 am | पैसा

पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.

वल्ली पण? एक अगदी बालिश शंका आहे. गिअर्स आणि ब्रेक कसे काय वापरतो ब्वॉ तो?

प्रचेतस's picture

17 May 2013 - 9:06 am | प्रचेतस

मी नाय हो.
मी आपला व्यवस्थित गाडी चालवतो. सर्व नियम पाळून.

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 3:13 pm | बॅटमॅन

माश्री फोडणीस काका

ख्याक :D :D

अद्द्या's picture

17 May 2013 - 9:02 am | अद्द्या

डिस्कव्हर १०० टी . आज बरोब्बर एक महिना झाला गाडी घेऊन .
आयुष्यातली पहिलीच गाडी . त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीये ( विना सर्विसिंग ) . .

आज सर्विसिंग ला टाकेन .

एक मित्र म्हणाला पहिली सर्विसिंग झाल्यावर मायलेज वाढतो आणि इंजिन पण अजून चांगलं चालायला लागतं . खरंय का ?

झकासराव's picture

17 May 2013 - 10:13 am | झकासराव

खरय रावसाहेब.
तुम्हाला चालवताना फरक जाणवेलच..
ऑइल चेन्ज करा पहिल्या सर्व्हिसिन्गला.
अधिकृत ठिकाणीच सर्व्हिसीन्ग करुन घ्या.
कमीत कमी सगळे फ्री सर्व्हिसीन्ग तरी.
मला वेळ नसतो, मी गाडी सोडुन नाही जाउ शकत अशा सबबी सांगौन गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.

त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीये

लयच भारी

गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.

झकासराव .

माझा मित्र आहे बजाज सर्विस सेंटर मध्ये .
त्यामुळे बाकी चिंता नाही .
(आणि ते हापिस च्या बाजूलाच आहे . त्यामुळे तर अजूनच चिंता मिटली )

ओइल चेंज ते नको म्हणलं तरी करतातच

लयच भारी

:D

रविवारी आंबोली ला गेलो होतो . फकस्त ७० किलो मीटर .
पण गाडीची घाटात पहिलीच ट्रीप होती एवढी .

गाडी १०० सीसी असून पण पल्सर १५० च्या जोडीने आरामात जात होती .
जवळपास तेवढाच पिकप .
गाडी वजनदार असल्यामुळे स्टेबल होती . (माझं वजन नगण्यच म्हणायला हवं )
मुख्य म्हणजे . गाडी उंच आहे . त्यामुळे पाठ दुखी थोडी कमी असते आणि सस्पेन्शन मस्तच .

ड्रीम युगा / प्याशन इत्यादी गाड्यांच्या मागे न लागता बजाज डिस्कव्हर घेतलेली लैच फायद्यात पडतीये

बाय दि वे .

नवीन डिस्कव्हर tachometer ला नाहीये . तो बसवून मिळू शकतो का बजाज वाल्यांकडून . सध्या तरी फक्त इंजिनचा आवाज आणि बुडाला / मांडीला जाणवणारे वायब्रेशन यावरच गियर बदलतोय . RPM वर लक्ष असेल तर ते बरं पडेल असं वाटतंय .मित्रांची पल्सर / करीज्मा / अपाचे इत्यादी मुळे लागलेली सवय. कोणी बसवून घेतलाय का ?

मागच्या सीट वर . "ऐकणेबल" आवाज असला कि इंजिन चा आवाजाकडे थोडं लक्ष कमी होतं :P

बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ?

नानबा's picture

21 Oct 2013 - 12:17 pm | नानबा

पल्सर १३५ चा विचार करत असलात तर डोळे बंद करून घ्या. जब्र्या गाडी आहे. 4 valve engine असल्यामुळे भन्नाट पिकअप, पळायलासुद्धा उत्तम, आणि बजाज असल्याने मेंटेनन्स खर्च कमी. एक नंबर गाडी.. :)

नानबा's picture

21 Oct 2013 - 12:18 pm | नानबा

या सगळ्यात पल्सरचं DTSi इंजिन असल्याने मायलेजसुद्धा चांगलं मिळतं.

कपिलमुनी's picture

21 Oct 2013 - 3:35 pm | कपिलमुनी

बुलेट / थंडर बर्ड किंवा इतर दुचाकीला कोणी k&N Filter आणि iridium spark plug बसवला आहे का
?

अनुभव / माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे ..

नानबा's picture

21 Oct 2013 - 3:39 pm | नानबा

मारता काय हो लोकांना आवाजाने?? O_O @=

मालोजीराव's picture

11 Dec 2013 - 12:43 pm | मालोजीराव

कार ला कुणी k&N Filter बसवला आहे काय ?

पिकअप , मायलेज वाढते असे ऐकून आहे…किती फरक पडतो ?

खादाड_बोका's picture

13 Dec 2013 - 12:09 am | खादाड_बोका

k&N Filter माझ्या होंडा अकॉर्ड वर बसवीला आहे. आत्ता पर्यंत ३३५००० किलोमीटर धावली आहे. तीनदा फिल्टर साफ केला....परफॉरमन्स वर खुप फरक पडला आहे. मायलेजही वाढले आहे.

नानासाहेब नेफळे's picture

27 Sep 2014 - 11:43 am | नानासाहेब नेफळे

दुचाकींचे मायलेज वाढवण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे पिस्टन रिंग्ज दर दोन वर्षांनी बदलने

नविन ट्युबलेस टायर घ्यायचा आहे, रिम सकट, कितिला मिळेल?

मी ६/७ महिन्यांपूर्वी पल्सरचे दोन्ही टायर्स बदलले होते.
मागचा १८०० आणि पुढचा १५०० ला मिळाला. अ‍ॅलॉय व्हील्स असल्याने रिम बदलायचा प्रश्नच आला नाही.
सीएटचे टाकले होते. एमारेफ थोडे महाग आहेत.

दोन्ही टायर्स उत्तम रिजल्ट्स देताहेत.

चिप्लुन्कर's picture

16 Dec 2013 - 1:14 pm | चिप्लुन्कर

माझ्या अवेन्जरला मागे आणि पुढे टूबलेस टायर्स बसून घ्यायचे आहेत अलॉय व्हीलसकट . कोणत्या कंपनीचे घ्यावे .

(गाडी साधारण ५ ० ० किमि दर महिना आणि ६ महिन्यातून १ दा ठाणे ते चिपळूण असा दौरा आणि २ महिन्यातून १ दा सासवणे इतकीच फिरते .

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2013 - 4:11 pm | टवाळ कार्टा

किती देते?? मला घ्यायची आहे

चिप्लुन्कर's picture

17 Dec 2013 - 9:46 am | चिप्लुन्कर

ठाणे शहरात निदान ४ ० आणि जेंव्हा मी बाहेर फिरतो त्यावेळी ४ ५ ते ५ ० आरामात मला तरी मिळाले आहे

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2013 - 12:06 pm | टवाळ कार्टा

किती शीशी आहे १८०/२००/२२०?? आणि किती वर्षे झालीत?

चिप्लुन्कर's picture

17 Dec 2013 - 4:59 pm | चिप्लुन्कर

२ २ ० शी शी आहे आणि २.५ वर्ष झाली आहेत .

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Dec 2013 - 8:53 am | लॉरी टांगटूंगकर

ऐला!

२२० शिशिला ४५-५० लै जास्त वाटतय,
मला अ‍ॅक्टीवावर याहून कमी मिळत. एकदा हिंम्मत करुन मोजल. प्रचंड लाजीरवाणे रिझल्ट होते.

चिप्लुन्कर's picture

18 Dec 2013 - 10:08 am | चिप्लुन्कर

मी गाडीची प्रचंड देखभाल करतो आणि एक हाती आहे , असो पण सध्या मला ती ४ ५ + देते आहे ठाण्यात .

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 10:56 am | टवाळ कार्टा

डिट्टेल????