दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
2 Apr 2013 - 3:28 pm
गाभा: 

मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.

बाकी इतरही बरेच प्रश्न असतात

उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.

५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .

माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)

अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .

आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.

नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .

गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .

आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो

परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .

मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर

आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .

अजून एक

दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .

बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच

धन्यवाद

प्रतिक्रिया

अॅक्टीवा भिकार गाडी आहे, असे माझे एक वर्ष ती गाडी चालवुन झालेले प्रामाणिक मत आहे

अॅक्टीवा भिकार गाडी आहे, असे माझे एक वर्ष ती गाडी चालवुन झालेले प्रामाणिक मत आहे

चिप्लुन्कर's picture

18 Dec 2013 - 10:06 am | चिप्लुन्कर

+१

----------------------

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Dec 2013 - 11:08 am | लॉरी टांगटूंगकर

+११
टाकतो फुंकुन.

अद्द्या's picture

18 Dec 2013 - 2:15 pm | अद्द्या

३०० :D

पॅशन प्लसचे चेनकीट ४०००० ला एक्स्पायर होते तसे झाले आहे आणि ते बदलण्याचा सल्ला मेकॅनीककडून मिळाला आहे.

तर मग,

१) गाडी तशीही कामाला सोडायची आहेच तर ४०००० किमी च्या दरम्यान एक्पायर होणारे बाकीचे महत्वाचे पार्ट्स उदा. क्लचप्लेट आणि बॅटरी बदलावेत की "चालेल तो पर्यंत" चालवावेत? त्यांचे आयुष्य संपत आले आहे हे गाडी चालवताना जाणवत आहे.

२) (टचवूड!!!) गाडी ४०००० किमीमध्ये एकदाही पंक्चर झाली नाहीये. ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन किती असतो..?

३) क्लच केबल ७ / ८ महिने आणि अ‍ॅक्सेलरेटर केबल ४ वर्षे बदलली नाहीये. एका मोठ्या प्रवासाला निघायचे असल्यास हे पण बदलून निघावे की सेट झालेल्या मेकॅनीक्समध्ये बदल करू नये..?

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 3:34 pm | टवाळ कार्टा

सगळे बदला....बराच वापर झालाय

मोदक's picture

18 Dec 2013 - 3:50 pm | मोदक

ट्युब आणि टायर पण..?

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2013 - 4:29 pm | टवाळ कार्टा

होय...४०००० खुपच जास्त झाले...२००००-२५००० लाच बदलायला हवे होते

मोदक's picture

18 Dec 2013 - 11:45 pm | मोदक

अर्रर्र..

वल्लीशेठ - तुम्ही किती हजार किमी नंतर बदलले..?

प्रचेतस's picture

19 Dec 2013 - 8:49 am | प्रचेतस

४५००० किमी नंतर.

मोदक's picture

19 Dec 2013 - 12:19 pm | मोदक

ओक्के.. धन्स!! :)

ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन किती असतो..?>>>
३०-३५ हजार ला बदलावी म्हणतात. आपण फक्त शहरात चालवत असेल तर नक्कीच अजुन काही किमी चालते.

अर्थात, ४० हजार म्हणजे टायर बरेच गोटा झाले असतील / होण्याच्या मार्गावर असतील.
बदलुन घ्या.

क्लच केबल ७ / ८ महिने आणि अ‍ॅक्सेलरेटर केबल ४ वर्षे बदलली नाहीये. एका मोठ्या प्रवासाला निघायचे असल्यास हे पण बदलून निघावे की सेट झालेल्या मेकॅनीक्समध्ये बदल करू नये..?>> क्लच केबल चालेल अजुन.
पण अ‍ॅक्सलरेटर केबल घ्या बदलुन.

बॅटरी साधारण तीन वर्षे चालते. हळुहळु त्याच लाइफ कमी झाल्याच लक्षात येतच.
सेल्फ स्टार्ट असेल तर बसत नाही. गाडी बंद असताना आणि गाडीची चावी लावलेली असताना इन्डिकेटर वै न लागणे अशी लक्षण दिसतील.
बदलली तर चांगलच आहे.

क्लच प्लेट इतक्यातच खराब व्हायची नाही. तरिही शंका असल्यास भरवश्याच्या मॅकॅनिकला राइड घेवुन काय वाटते ते विचारायच.
स्वतच जजमेन्ट चढावर येतच.
गाडी चढावर जास्त कुथणे, इनिशियल पिक अप कमी वाटणे ह्यातुन जजमेन्ट घ्या.

टायर चालतील अजून ५ / १० किमी.

क्लच केबल चालेल अजुन. पण अ‍ॅक्सलरेटर केबल घ्या बदलुन

दोन्ही केबल बदलून घेईन.

बॅटरी साधारण तीन वर्षे चालते. हळुहळु त्याच लाइफ कमी झाल्याच लक्षात येतच.

डॉ खरेंनी सुचवलेला पर्याय जास्त सोपा वाटत आहे.

क्लच प्लेट ओके आहे.. बघू..

धन्यवाद!!

टायर चालतील अजून ५ / १० हजार किमी. टकाटक आहेत.

मिनेश's picture

19 Dec 2013 - 10:05 am | मिनेश

माझ्याकडे आता पल्सर १५० आहे. ती विकुन एखादी हाय एन्ड बाइक घ्यावी असा विचार आहे..काही options असे आहेत.
१)करिझ्मा ZMR
2)YAMAHA R15
3)PULSAR 220
4)HONDA CBR 250

याबाबतीत कोणी मार्गदर्शन करु शकेल का??

टवाळ कार्टा's picture

19 Dec 2013 - 11:36 am | टवाळ कार्टा

HONDA CBR 250 हि एकच हाय एंड आहे यात :)

स्पा's picture

19 Dec 2013 - 10:25 am | स्पा

भरपूर रनिंग आणि लॉंग ड्राईव होत असेल तर नवीण बुलेट GT चा विचार करू शकता

http://royalenfield.com/continentalgt/the-bike

मिनेश's picture

19 Dec 2013 - 10:55 am | मिनेश

आपल्या तब्येतीला सुट होइल अशी गाडी पहिजे हो साहेब...आहे ती पल्सरच लहान दिसतेय. बहुतेक करिझ्माच चांगला option आहे... :) continental GT खुपच लहान वाटतेय....

मग रॉयल एन्फिल्ड क्लासिक घ्या

मिनेश's picture

19 Dec 2013 - 11:16 am | मिनेश

जुनी बुलेट वापरुन झालीय.....नॉट अ बुलेट फॅन.. :) बाइक्स च चांगल्या वाटतायेत आता....

सुबोध खरे's picture

19 Dec 2013 - 10:27 am | सुबोध खरे

मी माझ्या हीरो होंडाचा टायर सव्वा लाख किमी चालवला होता.त्यानंतर तो बदलला. (गाडी दीड लाख किमीच्या वर चालवून भावाच्या फॅक्टरीत कामगाराना वापरायला दिली आहे) आपण जर टायर मध्ये १० % हवा कमी ठेवाल तर आपला पेट्रोलचा खर्च १० टक्क्याने वाढतो आणि टायरचे आयुष्य २५ टक्क्याने कमी होते.(सोर्स PCRA) तयार चे खवले(ट्रेड्स)दोन मिमी असेपर्यंत आपण ते वापरू शकता. त्यानंतर सुद्धा आपण जर टायरमध्ये हवा कमी भरून चालवू शकता पण आपल्या दुचाकीची रस्त्यावर पकड किती आहे हे आपल्याला समजण्यासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तयरमधील हवा दहा ते पंधरा टक्के कमी ठेवा म्हणजे रस्त्यावर पकड सुधारेल.
मी हीरो होंडाची कोणतीही केबल तुटेपर्यंत बदलली नाही. सध्या माझ्याकडे होंडा युनिकॉर्न आहे तिची एकही केबल बदललेली नाही तिची बॅटरी सुद्धा अजून व्यवस्थित चालू आहे.(साडेसहा वर्षानंतर).तिचे टायर उत्तम स्थितीत आहेत ३२००० किमी नंतर. सरासरी ४५ देते. पहिल्या बटणात(किक मारत नाही) चालू होते. मी स्पार्क प्लग खराब होईपर्यंत बदलत नाही. नवीन स्पार्क प्लग ने फारसा फरक पडत नाही.
अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायर मधील ट्युब चांगल्या कंपनीचीच घ्यावी कारण गाडी वेगात चालवल्यावर टायर आणि ट्युब मध्ये घर्षण होऊन ट्युब गरम होते आणि फुटते आणि हमरस्त्यावर अपघात होतो. आपल्या ब्रेक चे लायनर मात्र दर दहा हजार किमी नंतर तपासून घ्यावेत. वेळेत ब्रेक न लागल्याने जेवढे अपघात होतात त्याच्या मानाने केबल तुटून किंवा इंजिन गरम होऊन होत नाहीत.
जाता जाता -- माझी हीरो होंडा शेवटची पाच वर्षे (गाडीची तेरा ते अठरा वर्षे) बिना बॅटरी चालवीत असे. तिला १००० मायक्रो फेरॅड चा कॅपॅसिटर बॅटरीच्या जागी बसविला होता. त्यामुळे इंजिन चालू केले की हॉर्न वाजत असे आणि साईड इंडीकेटर चालत असत. (इंजिन बंद असताना हॉर्न वाजत नसे). बॅटरीचा खर्च त्यात पाणि घालणे बॅटरीची चोरी होणे इ त्रास पुर्ण नव्हता. आता नवी युनिकॉर्न मूळ बॅटरी सकट आली त्यामुळे सध्या तरी प्रश्न नाही. विद्युत अभियन्त्यानी हा पर्याय तपासून पहावा (उत्तम काम करतो.हे डोके माझे नसून माझा भाउ जो विद्युत अभियंता आहे त्याचे आहे)

स्पा's picture

19 Dec 2013 - 10:32 am | स्पा

येथे मला नक्की मदत मिळेल अशी आशा असल्याने हा धागा वर काढत आहे ..
आमच्या चारचाकीच्या बोनेट मध्ये मोठ मोठे उंदीर ,घुशी जाउन बसतात .वायर्स कुरतुडून ठेवतात .खूप घाण हि करतात ..२ दिवसांपूर्वी वायर्स कुरतडल्यामुळे ..गाडी सर्विस ला द्यावी लागली ..मागे हि एकवेळेस हा त्रास झाल होता ..त्यावेळी anti -roat coating लावून घेतले होते पण याचा उपयोग काही दिवस च होतो ..त्यानंतर पुन्हा जैसे थे ..आणि आता तर ते कोटिंग हि बंद झाले आहे ..यावर कुणाकडे काही उपाय असल्यास सांगावे ..कालच गाडी परत आणली आणि आज मी बोनेट उघडून पाहिले तर २ मोठमोठ्या घुशी तेथे न ठाण मांडून बसल्या होत्या ...बर गाडी दुसरीकडे लावायची हि सोय नाही सगळीकडे घुशी आहेतच ....

तंबाखुच्या तीव्र वासाने उंदीर आणि घुशी आत जात नाहीत..

हां! पण नंतर पुडया सोडु मात्र नका....कृ.ह.घ्या.

हा उपाय हि कुणीतरी सांगितला आहे पण यामुळे आग वैगेरे लागण्याची काही भीती नाहीये ना ???आणि जर mortine rat killer च्या वड्या ठेवल्या तर काही फरक पडेल काय ???

शैलेन्द्र's picture

22 Apr 2014 - 6:41 pm | शैलेन्द्र

दोन गोष्टी करा..
१) पूर्वी घरातल्या गॅसच्या नळ्यांना घालायला स्टीलचे कव्हर मिळायचे ते घेवुन या, बॅटरी टर्मीनलपासून इंजीनकडे जाणार्‍या सगळ्या मोठ्या वायरवर ते कव्हर लावा(वायर त्या कव्हरमधुन ओवा).. किंवा हल्ली ज्या मेटल कोटींगच्या गॅस वायर मिळतात त्याही वापरल्या तरी चालतील..
२) इंजीन कंपार्टमेंटमधे जिथे शक्य होईल तिथे काटेरी ब्रश बांधा.. हे ब्रश पुर्ण मेटलचे असतील याची खबरदारी घ्या..याने घुशींना फिरता येत नाही व त्या जागा सोडतात.

गाडीच्या आसपासचा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवा व इंजीन कंपार्टमेंटमधे ऑइल वगैरे शक्यतो सांडु देवु नका..

माझ्याकडे एक केमिकल पावडर आहे.
त्याने हा प्रॉब्लेम जाईल. व्य. नि करावा.

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 8:49 pm | टवाळ कार्टा

हा धागा परत वर उचलत आहे कारण...

मला सेकंडहँड अ‍ॅव्हेंजर २२० घ्यायची आहे (शक्यतो २०११ नंतरची)...पण गाडीची तपासणी कशी करायची ते नीटसे माहित नाही
कोणाच्या ओळखीत भरोशाचा मेकॅनिक असेल (ठाण्याजवळ) तर मला व्यनी करा

स्पा's picture

26 Sep 2014 - 12:10 pm | स्पा

१.बाईक ला पेंट करायचा साधारण किती खर्च येतो ?
२. माझी बाईक किक स्टार्ट आहे, मला बटन स्टार्ट करायची आहे तर करता येईल काय?

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 2:25 pm | टवाळ कार्टा

सोताचा धागा सोताच वर काधन्याला काय म्हंतात ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2014 - 5:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठली आहे बाईक?

स्पा's picture

26 Sep 2014 - 5:57 pm | स्पा

यामाहा SZ

स्पा's picture

26 Sep 2014 - 5:58 pm | स्पा

fgf

प्रचेतस's picture

26 Sep 2014 - 8:51 pm | प्रचेतस

ते बुवाला विचार.
लाल अक्तिवा पांढरी करून घेतली. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2014 - 9:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पेंट च्या खर्चा विषयी अंदाज नाही.

सेल्फ स्टार्ट साठी जास्तीत जास्त ४५०० रुपये लागतील. शक्यतो यामाहा चं किंवा अ‍ॅरोहेड चं सेल्फ स्टार्ट किट (क्रँक मोटर, लाईन फ्युज बॉक्स, स्टार्टर बॉक्स, आणि केबल) घ्या. (बॅटरी बदलायला लागली नाही तर, नाहीतर बॅटरीचे पैसे वाढतील).

सुबोध खरे's picture

26 Sep 2014 - 7:06 pm | सुबोध खरे

प्रश्न १ आणी २ चे उत्तर एकच
आहे हि विकून टाका आणी दुसरी घ्या.
ताजमहाल दुरुस्त होत नाही( झाला तरी बेंगरूळ दिसेल)

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 7:53 pm | टवाळ कार्टा

अ‍ॅक्च्युली गरज नाही त्याची ... कंपनी सर्विस सेंटरला विचारले तरी ते करुन देतील

शैलेन्द्र's picture

27 Sep 2014 - 1:23 am | शैलेन्द्र

पुण्यात मिळेल भट्टी पेंट करुन, अंदाजे खर्च ५०००

स्पा's picture

27 Sep 2014 - 10:33 am | स्पा

यामाहा service center च्या अनुभवांसाठी वेगळा धागा काढावा लागेल, बेक्कार लुटतात. सो आपले नेहमीचे मॅकेनिकच बरे.

गाडी विकणे शक्यच नाही. जेमतेम 3 वर्षच झालीयेत. आणि मी ती कधिच विकायची वेळ येउ नये म्हणुन मेन्टेन करतोय

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2014 - 11:22 am | टवाळ कार्टा

३ वर्षांत नविन कलर???

हम्म.. काही काही भाग गंजलेत.. शाईन पण कमी झालीये

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2014 - 11:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्याच अधिकृत सर्व्हिस सेंटर मधे चांगली सर्व्हीस मिळत नाही. कॅस्ट्रॉल सर्व्हिस स्टेशन मधे गाड्या खुप छान सर्व्हिसिंग करुन मिळतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2014 - 12:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॅस्ट्रॉल बाईक झोन आहे, पुण्याला इंजिनियरींग कॉलेज समोर ठुबे कॅस्ट्रॉल, तो अति उत्तम आहे, ह्या आगोदर माझ्याकडे माझी सीबीझी- एक्स होती तेव्हा तिथेच सर्विस करुन घ्यायचो, उत्तम स्टाफ मस्त सर्विस!!! , तेच वनाज जवळचे कॅस्ट्रॉल अतिशय भिकारडी सर्विस देतो!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2014 - 8:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

निगडी ला बजाज ऑटो समोर कॅस्ट्रॉल बाईक पॉईंट आहे. त्याच्याकडे गाडी दिली की एकदम मक्खन करुन देतो. पुढे ३-४ महिने अजिबात त्रास नाही. बाकी गाडी दर ३ महिन्यानी सर्व्हिसिंग करुन घेत असल्यानी झक्कास आहे. युनिकॉर्न....

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2014 - 10:31 pm | टवाळ कार्टा

पुढे ३-४ महिने अजिबात त्रास नाही.

जर गाडी दर ३-४ महिन्यांनदर्त्रास महिन्यांनी त्रास देत असेल तर गडबड है

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Sep 2014 - 8:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जर गाडी दर ३-४ महिन्यांनदर्त्रास महिन्यांनी त्रास देत असेल तर गडबड है

गाडी त्रास देत नाही. पण यंत्र आहे शेवटी ते, नीट देखभाल केली तर व्यवस्थित चालत पण आणि त्याचं आयुष्य सुद्धा वाढतं.

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2014 - 11:26 am | टवाळ कार्टा

मी युनिकॉर्न आहे म्हणुन लिहिले...युनिकॉर्न सारखी स्मूथ ईंजिन असणारी बाईक आणखी कोणतीच नाही/नव्हती...कदाचित नसेलही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Sep 2014 - 11:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

यग्गझॅक्टली!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2014 - 12:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्याकडे आधी टीव्हीएस विक्टर जीएल होती (व्हिली साठी भारतातली सर्वोत्तम बाईक), मग सीबीझेड एक्स्ट्रीम, सद्ध्या रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०, एकुण फिरायचा अनुभव, ७०,००० किमी विक्टर, १,३१,००० किमी सीबीझेड अन १५०० किमी रॉयल एन्फिल्ड, मला फार काही टेक्निकल नॉलेज नाही पण फिर फिर फिरुन थोडे बहुत संकलित केले आहे, मला इथे अजुन काही शिकायला मिळेल अशी आशा, अन माझा अनुभव कोणाला कामी आला तर आनंद होईल :)

रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० च्या एकंदर अनुभवावरती एक वेगळा धागा काढा.

३५० का घेतली?
Classic vrs Thunderbird
गाडी घेताना व नंतर काय माहिती जमा केली?
गाडी घेताना काय काळजी घ्यावी?

शक्य तितके विस्तृत लिहा.

अद्द्या's picture

29 Nov 2014 - 5:03 pm | अद्द्या

डिसकव्हर टी (१०० सीसी) हाये माझी . गेल्या वर्षभरात साधारण १८००० किमी फिरलीये . . पिकप मध्ये बाप सेग्मेंट मध्ये . . असो . प्रश्न हा . कि आतापर्यंत प्रत्येक सर्विसिंग च्या वेळेस बजाज DTS 100 engine oil टाकतोय . एक मित्र म्हणाला. ते बदलून दुसरं कुठलं घातलं तर इंजून अजून चांगलं चालेल . . कुठलं वापरावं ?

स्पोर्ट्स बाइक नाहीये . पण तरीही . बाइक तर आहे .

तुषार काळभोर's picture

29 Nov 2014 - 5:33 pm | तुषार काळभोर

शेलचं ऑईल (३) अन् शेलचं पेट्रोल...

(नाय मिळालं तर कॅस्ट्रॉल ४टी)

कपिलमुनी's picture

1 Dec 2014 - 10:49 am | कपिलमुनी

motul वापरा

प्रसाद१९७१'s picture

1 Dec 2014 - 6:19 pm | प्रसाद१९७१

एक मित्र म्हणाला. ते बदलून दुसरं कुठलं घातलं तर इंजून अजून चांगलं चालेल . .>>>>>> जो मित्र हा सल्ला देतोय त्याला तर दुसर्‍या ऑइल चे नाव माहीती असणार ना. अशी अर्धवट माहीती का देतोय?

पूर्ण मित्र असते तर इथे कशाला विचारलं असतं .
=))

अद्द्या's picture

3 Dec 2014 - 3:12 pm | अद्द्या

पूर्ण माहिती देणारे मित्र असते तर इथे कशाला विचारलं असतं .

नवीन डिस्कवर १५० बद्दल काय रिव्यू आहेत?