माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - अंतिम

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
8 Feb 2012 - 2:36 pm

http://www.misalpav.com/node/20570
http://www.misalpav.com/node/20588

.

तळ्याकाठुन चालत-चालत वर निघालो आणि या एका खोक्यासारख्या दिसणार्‍या खोलीने आम्हा सर्वांचे लक्ष वेधले, हळु-हळु तिथवर चालत गेलो, तर पायर्‍या दिसल्या , पायर्‍याने वर चढुन गेलो तर वर घुमट होते, आणि घुमटाला एक छोटे छिद्र , त्यातुन आत पाहिले तर संपुर्ण अंधार दिसला, म्हणुन खाली उतरून मागच्या बाजुने जावुन पाहिले...तर ...

.

.

.

.

.

फ्लॅश मारून फोटो काढला आणि आत मध्ये शिरणार तेव्हढ्यात, " हुण्ण, हुण्ण " करत आगीनमाश्या घोंघावयाला लागल्या. आत मध्ये शिरण्याच्या काय प्रश्न च नव्हता ! तिथुन सरळ पळुन आलो...खोटं कशाला बोलु !! (मागच्या वेळेस एका आगीन माशीने माझ्या डोक्यावर काटा रूतवला तेव्हा आमचे कलिगंडा सम भासणारे थोबाड पपई सम दिसत होते. तीन दिवस अ‍ॅडमीट होतो. )

.

तिथुन निघुन आलो आणि डोक्याला शॉट लागला, ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो, त्या रस्यावर एक ही चढ नव्हता. आणि समोर बघतो आहे तर मला संपुर्ण ' चाळीस गाव ' दिसत होते, मान ९० अंशात फिरविली आणि दिसणारी धरणे मोजुन काढली . दहा होती. मी ईतक्या उंचावर कधी आलो तेच कळत नव्हते .

.

.

.

.

.

.

पण वरून दिसणारा नजारा ईथेच संपत नव्हता , तिथुन जरा अजुन डाव्या बाजुला पाहिले तर गौताळ्याची पर्वतराजी दिसत होती. टेहेळणी बुरूजावर दोन क्षण निवांत बसुन काढले.

.

.

.

.

सरते शेवटी किल्ल्या च्या पहिल्या बुरुजाच्या डाव्या बाजुला शिरलो, तळं मध्यवर्ती धरल तर !! वर एक दर्गाह आहे, एक तोफ पडलेली आहे, भयाण वाढलेली झुडपे आहेत !!

.

.

.

.

.

.

.

.

तिथुन तळ्यावर परतलो, बुरुजाच्या ऊजव्या बाजुला अजुन काही गुहा आहेत, थोडं रेस्ट करून मग खाली जावु असे ठरले. तळ्यावर बसलो होतो, अचानक माकडांचा कळप आला. आधी त्यांनी पानी पिवुन घेतले, मग मोर्चा आमच्या कडे वळला, हल्ला च तो. चहु-बाजुने माकडे आणि मध्ये आम्ही !! मशाल पेटवु की फोटो काढु या विवंचनेत असताना, मामा (स्वेटर मधे आहेत ते ! ) म्हणाले चिंचा फेक एका बाजुला, मी तसे केले मग ती माकडे चिंचा फेकल्या त्या दिशेला पळाली आणि आम्ही माकडे उलट दिशेला पळालो. पळताना एक फोटो काढायचा मात्र विसरलो नाही. तिथुन खाली आलो, घड्याळ्यात वेळ पाहिली. चार वाजत आले होते, मामा म्हणाले ' निघुयात आता, तळ्यावर पाणी प्यायला यायचा सर्व जनावरांचा एक टाईम असतो, आणि सर्वात पहिले येतात ती माकडे " तिथुन कलटलो ...आणि त्या तळ्यावर येवुन थबकलो जिथे आधी वाघाने बकरू मारल होते, हात पाय धुतले आणि परतीचा प्रवास सूरू केला.

.

.

जाता-जाता : इतिहास पेटवितो, या मताचा मी आहे, अर्थात हे माझं वैयक्तीक मत असले तरी, धर्म, जात, पात, पंथ, वर्ण, वंश आणि त्या अनुषंगाने येणारा गर्व, अहंकार, अभिमान हे सर्व बाजुला सारून जेव्हा मी एखादी अशी वास्तु पहातो, त्याची जडण-घडण पहातो. नैसर्गीक आपत्ती ला तोंड देत वर्षा-नु-वर्षे उभ्या असलेल्या या वास्तु माझ्या धकाधकीच्या दैंनदिन आयुष्यात जगण्याच बळ देतात हे नक्की !!

पुन्हा कधीतरी , माझा मराठवाडा मध्ये ...

१ ) काळदरी : एक मोठी दरी, त्या दरी मध्ये एक घळ !! त्या घळीत वसलेले एक गाव, जिथे सुर्यकिरणांचे अस्तित्व केवळ सकाळी ९ ते ४ असते ( अर्धा तास हिकडे तिकडे !! )

२ ) कायगांव टोक्याची हेमाडपंथी मंदिरे ( ती तिथे काय करताहेत ? ) आणि ' कहार समाजाचे चित्रण

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

8 Feb 2012 - 2:48 pm | वपाडाव

मस्त... सुरेख वर्णन... आवड्या रे...
-सच्चा मराठवाडी (वपाडाव)

रानी १३'s picture

8 Feb 2012 - 3:11 pm | रानी १३

मराठवाड्या बद्दल वाचुन बर वाटले.......

प्यारे१'s picture

8 Feb 2012 - 3:28 pm | प्यारे१

>>>>पुन्हा कधीतरी

असं 'एकदा या घरी' सारखं नको आहे. कन्फर्म आणि लवकर लिहा.
साला आच्चा लिख्ता बोला तो भावच खाता जास्ती.... :|

मी-सौरभ's picture

8 Feb 2012 - 8:01 pm | मी-सौरभ

सहमत

मस्त फोटू अन झक्कास वर्णन :)
एक शन्का : आगीन माशी म्हण्जे नेमकी कुठली माशी ,गान्धीन माशी काय ?

वपाडाव's picture

8 Feb 2012 - 7:57 pm | वपाडाव

आगीन माशी म्हण्जे नेमकी कुठली माशी ?

गांधीन माशीच असेल... कारण ती चावल्यावर लै आग होते ना... म्हणुन तिला आगीन माशी असेही म्हणत असतील...

मी-सौरभ's picture

8 Feb 2012 - 8:02 pm | मी-सौरभ

दोस्ता

हॅप्पी क्लब काढल्याबद्दल हाबिणंदन ;)

बेस्टच हो ...

अवशेषांचे फोटो जास्त आवडले..

काळदरी च्या प्रतिक्षेत ..

मोदक's picture

8 Feb 2012 - 4:07 pm | मोदक

ओघवते वर्णन

पुलेशु. :-)

मनराव's picture

8 Feb 2012 - 4:08 pm | मनराव

मस्त......... झाला प्रवास....

पुढ्च्या लेखाच्या प्रतिक्षेत........

कपिलमुनी's picture

8 Feb 2012 - 4:38 pm | कपिलमुनी

लै आवडला ...

पैसा's picture

8 Feb 2012 - 5:31 pm | पैसा

फोटो आणि वर्णन सुरेख! त्या भग्न वास्तू बघताना डोक्यात काहीबाही विचार येत रहातात. या वास्तूने काय काय पाहिलं असेल, केवढं वैभव इथे असेल आणि आता हे असे अवशेष!

कोकण आणि मावळातल्या किल्ल्यांचा इतिहास काही प्रमाणात सुसूत्र असा माहिती आहे. पण हे दूरवर राहिलेले किल्ले, यांचं अस्तित्वसुद्धा आम्हाला माहिती नाही. काही डॉक्युमेंटेशन करून ठेवलं तर काळापासून तेवढंच बचावलं म्हणायचं.

पुढचा भाग "जमेल तेव्हा" म्हणू नको. वाट बघत आहे.

उत्तम माहिती, काही फोटोमधली भव्यता डोळ्यात भरते.
बाकिचे लवकर टाका.

सुहास झेले's picture

8 Feb 2012 - 5:42 pm | सुहास झेले

मस्त रे भावा.... आता पुढची भटकंती कधी? :) :)

प्रचेतस's picture

8 Feb 2012 - 6:31 pm | प्रचेतस

सुंदर फोटो आणि वर्णन रे.
किल्ल्याची फारच सुरेख माहिती करून दिलीस.
रच्याकने कळप माकडांचा होता का वानरांचा? फोटूत एक हनुमान लंगूर दिसतोय. :)

काळदरी आणि कायगावच्या मंदिरांबद्दल पण लवकर येऊ दे.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2012 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते

सु रे ख ! ! !

खुद के साथ बातां: असा सुहास नेहमी का नाही बघायला मिळत!

अन्या दातार's picture

8 Feb 2012 - 7:15 pm | अन्या दातार

क ह र अनुभव.

सानिकास्वप्निल's picture

8 Feb 2012 - 10:46 pm | सानिकास्वप्निल

सुरेख वर्णन खुपचं आवडले :)
काळदरी व कायगांवच्या लेखाच्या प्रतिक्षेत :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

लिही...लिही...मित्रा,,,मराठवाड्याविषयी लिही...आंम्हाला तिकडचे खरच काहीही माहित नाही,तुझ्या मुळे ओळख तरी होइल... :-)

५० फक्त's picture

9 Feb 2012 - 6:08 am | ५० फक्त

मस्त लेखन, आवडलं.

sneharani's picture

9 Feb 2012 - 9:54 am | sneharani

झकास!! पुढचा लेख येऊ दे लवकर!
:)

उदय के'सागर's picture

9 Feb 2012 - 10:45 am | उदय के'सागर

खुप सुरेख फोटोज..... हे फोटो पाहुन असं वाटतं अत्ता उठावं आणि जावं कुठे तरी गड किल्ल्यावर भटकायला... (च्यायला ...काय तेच तेच रोज ऑफिसात पाट्या टाकायच्या.... "It sucks")

इन्दुसुता's picture

28 Feb 2012 - 7:07 am | इन्दुसुता

सर्व भाग वाचले... फार आवडले... तुमचा थोडासा हेवाही वाटला ( खोटं कशाला बोलू?)