माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - २

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
2 Feb 2012 - 1:38 pm

http://www.misalpav.com/node/20570

किल्ल्याचा दुसर्‍या अंधारलेल्या दरवाजातुन आत शिरलो. वटवाघळांच्या चित्काराने आणि त्या आवाजाचा घुमटाकार दरवाजाच्यामुळे झालेल्या ईको मुळे परिसर दणाणुन गेला, साहजिकच हातात काठ्या घेण्यात आल्या. रॉकेल ची क्वार्टर-साईज बाटली बेल्टच्या लुप मध्ये अडकवली आणि पुढचा प्रवास सुरू केला, त्या आधी घोडे-बांधणी ची जागा, तत्सम आत येणार्‍या पाहुण्यांची नोंद वा चेकिंग करणारे, खालपर्यंत नजर ठेवणारे दरवाजे आणि काही ठिकाणी कडेबंद करणारी वाट दिसत होती, त्यावरून अंदाज येत होता की हा किल्ला नुसता रहाण्याची सोय नसुन दसरे ही काही आहे..पण का ??? ते मात्र मला शेवटपर्यंत कळाले नाही. अर्थात वर असलेले एक बंदीगृह पाहुन ही मला आश्चर्य वाटले. ( हे माझे काही अंदाज आहेत, नीटसं किंवा त्याला दुजोरा देणारे माझ्याकडे काहीच नाही. )

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

वटवाघळांच्या चित्काराने दुम-दुमणारे हेच ते गेट (दरवाजा क्रंमाक दोन !! हा दरवाजा मी आलेल्या वाटेतुन...सॉरी पांदीतुन...म्हणजे एका बाजुला दरी आणि वर बूरूज अश्या वाटेतुन ९० अंशातुन !! ) आणि बाहेर येताना.

.

.

.

.

पुन्हा नव्वद अंशात वळालो, आणि समोर वर पुन्हा पाटी दिसली. आणि पुन्हा नेमकी कुठली भाषा कळेना.

.

पाटी शिवाय ३०-३५ एकर पसरलेल्या किल्ल्यावर असलेल्या काही दगडांवरच्या खाणा-खुणा, काही अचानक दिसणारी गुहा कम वाट , कुठे थेट जमीनीत घुसणार खंदक, एक छान स तळ ,काही घुमटाकार खोल्या !!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

क्रमश .....

( फोटोच जास्त आहेत म्हणुन टप्प्या-टप्याने लिहीत आहे. )

प्रतिक्रिया

जबराट.. एकदम गूढ किल्ला आहे

+१ अगदी..

कायकाय कथा असेल प्रत्येक दगडाने पाहिलेली कोण जाणे...

टक्कू's picture

9 Sep 2013 - 11:31 pm | टक्कू

रियली!
सहीच.

मस्त फोटो रे.
चाकोरीबाहेरच्या किल्ल्याची ओळख आवडली.

पैसा's picture

2 Feb 2012 - 1:46 pm | पैसा

"आहे मनोहर तरी गमते उदास" म्हणण्यासारखं सगळं वातावरण दिसतंय. ते नक्षीकाम वगैरे शिवकालाच्या पूर्वीचं असणार नक्कीच. या किल्ल्यावर कोणी चिटपाखरूही फिरकत नसावं बहुधा. कोणीतरी शोधाशोध करून या किल्ल्याची जास्त माहिती काढा रे!

http://fortsinmaharashtras.blogspot.in/2009/08/antur-fort.html

इथल्या माहितीप्रमाणे तो किल्ला १५ या शतकात बांधला. मग निझामशहाच्या ताब्यात असताना मलिक अंबरने काही बांधकामे केली. पण या किल्ल्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळत नाहीये.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2012 - 4:42 pm | बिपिन कार्यकर्ते

"आहे मनोहर तरी गमते उदास" म्हणण्यासारखं सगळं वातावरण दिसतंय. ते नक्षीकाम वगैरे शिवकालाच्या पूर्वीचं असणार नक्कीच. या किल्ल्यावर कोणी चिटपाखरूही फिरकत नसावं बहुधा. कोणीतरी शोधाशोध करून या किल्ल्याची जास्त माहिती काढा रे!

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2012 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>पण या किल्ल्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळत नाहीये.

आमच्या एका इतिहासप्रेमी मित्राचं म्हणनं आहे की, हा किल्ला नव्हेच. गढ्या अशाच असायच्या तेव्हा किल्ला म्हणू नये, किल्ल्याची वैशिष्ट्ये तपासून याला किल्ला घोषित केले पाहिजे. माझ्या
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठवाड्याच्या इतिहासाबद्दल जुजबी माहिती असलेलं पुस्तक आहे, कालपासून या किल्ल्याचा कुठे उल्लेख येतोय का ते पाहतोय पण त्यात काही यश अजुन मिळेना. मराठवाड्याचे शिलालेख नावाचे पुस्तक आहे त्यात काही शिलालेख सापडतात का त्यावरही वाचन सुरु आहेच. काही हाती लागलं तर सविस्तर प्रतिक्रिया या गढी-किल्ल्याच्या निमित्ताने लेखमालेत डकवेन म्हणतो... तो पर्यंत वाचत राहु या.......!

आम्ही मराठवाड्यातील काही मिपाकर मंडळी 'आमचा मराठवाडा' असा विषय घेऊन मिपावर लिहिणार आहोत. (कधी ते माहित नाही. वर्ष सहा महिन्यापूर्वी प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. करिता माहितीस्तव. ) :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

2 Feb 2012 - 7:52 pm | पैसा

शीघ्रम. वेळ काढाच लवकर!

अन्या दातार's picture

2 Feb 2012 - 1:55 pm | अन्या दातार

खत्तरनाक!!!

किल्ला आणि त्याचे फोटो एकदम जबराट सुहास!
स्पांडू म्हणतो तसे गूढ..
वल्लीशेठना विनंती की किल्ल्याबद्दल/किल्ल्याच्या वापराबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी.

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 2:02 pm | वपाडाव

तळ्याचा फटू सोलो घेउन त्याचा दुसरा एंड दाखवला असता तर भारी दिसले असते...
बाकी, फटु जब्रा...
शिलालेख अन नक्षीकामाच्या फटूंचा एक व्यनि वल्लीला धाडाच म्हणजे वल्लीशेट त्यावर अधिक प्रकाश टाकतील....

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 2:08 pm | प्रचेतस

अबे ते फारसी शिलालेख आहेत. मला नाही त्याची माहिती. :(

प्यारे१'s picture

2 Feb 2012 - 2:48 pm | प्यारे१

म्हणजे तुला फारसं नाही तरी थोडंदेखील फारसी येत नाही?
( क्षीणकोटीप्रयत्नकर्ता) प्यारे

वाश्या माकडं कुठं भेटलेली तुला?
( उत्सुक) प्यारे

मस्त लिहीलंय बरं
(प्रोत्साहन देणारा) प्यारे

गूढ वाटतो किल्ला.
(सहमत) प्यारे

हे सगळं अवघड आहे..
(कबूल) प्यारे ;)

सुहास..'s picture

2 Feb 2012 - 5:34 pm | सुहास..

वप्या !! हे अजुन दोन अ‍ॅन्गल्स

पेर्‍या !!

माकंडाची, माकडांशी झालेली मस्ती शेवटच्या भागात लिहितो आहेच ;)

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 5:39 pm | वपाडाव

व्वाह... व्वाह... मज्जा आली की रे हे बघुन....

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 2:02 pm | सुहास झेले

मस्त... ह्या किल्ल्याबद्दल कधीच काही ऐकले नव्हते. धन्स रे :) :)

पुढचा भाग लवकर टाक !!

sneharani's picture

2 Feb 2012 - 2:39 pm | sneharani

जबरदस्त दिसतोय किल्ला!मस्त फोटो!!
:)

मनराव's picture

2 Feb 2012 - 2:47 pm | मनराव

फोटो मस्तच............

बाकी इतका वेळ ओसाड वाटण्यार्‍या गडावर एक पाण्याचा तलाव बघुन बरं वाटलं.......

अप्रतिम पुन्हा !
फोटो आवडलेच .. पण अश्या वेगळ्या किल्ल्याच्या भटकंती बद्दल लिहिल्याने जास्त आवडले..

प्रास's picture

2 Feb 2012 - 6:55 pm | प्रास

फोटो आवडलेच ..

गणेशाला फोटो दिसले? ते ही पहिल्या झटक्यात?

आयला, किल्ला खरंच गूढ आहे ;-)

मी-सौरभ's picture

2 Feb 2012 - 8:05 pm | मी-सौरभ

गणेशाला फोटो दिसले? ते ही पहिल्या झटक्यात?

धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड :)

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 12:00 am | वपाडाव

त्याने हा धागा एकतर नव्या कंपनीतुन पाहिला असावा, अथवा घरुन पाहिला असावा....
प्रासभौ, समजुन घ्या हो... त्याला किती अ‍ॅडजस्ट करावे लागते ते.... उगाच काहीबाही बोलत असता बिचार्‍याबद्दल....

प्रास's picture

3 Feb 2012 - 10:32 am | प्रास

त्याला किती अ‍ॅडजस्ट करावे लागते ते

खरं आहे वपाभौ, गणेशारावांच्या अ‍ॅडजस्टमेन्टचे दिवस नुकतेच कुठे सुरू झालेत..... ;-)

उगाच काहीबाही बोलत असता बिचार्‍याबद्दल

म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट दुसर्‍या कुणाला मिळालंय होय आता.... ;-)

५० फक्त's picture

2 Feb 2012 - 5:13 pm | ५० फक्त

मस्त रे मस्त लिहिलं आहेस, मजा आली वाचुन.

इरसाल's picture

2 Feb 2012 - 5:51 pm | इरसाल

माहिती आणि फोटो दोन्ही आवडले.

इतका लांबवर आणि घनदाट जंगलात असल्याकारणाने आणि त्यातच पाणी जवळ असल्याने तिथे वाघ असतीलच.म्हणजे किल्ल्याच्या आसपास.

अवांतर: मिपाच्या मुख्यपानसंक्षिप्तमाहितीपट्टीकेवर " पर्यटन " असा एखादा निशाण/पट्ट द्यावा असे वाटत आहे.

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 6:02 pm | वपाडाव

अवांतर: मिपाच्या मुख्यपानसंक्षिप्तमाहितीपट्टीकेवर " पर्यटन " असा एखादा निशाण/पट्ट द्यावा असे वाटत आहे.

मालक, भटकंती नावाचे नविन सदर त्यासाठीच सुरु करण्यात आले आहे.... जरा स्क्रॉल करुन वर पहा, लक्षात येइल...

वक्के मालक.
चुकनिर्दालन मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.

"भटकंतीच्या " मांडीला मांडी लावून "गड-किल्ले " पट्ट फासावा काय ?

वाहीदा's picture

2 Feb 2012 - 6:22 pm | वाहीदा

मला खरंच वेळ नाही पण सुहास , खास तुझ्यासाठी मिपावर लॉगीन केले ...

आधीच्या धाग्यात जे pillar वर लिहीले आहे ते अन या धाग्यात , समोर वर जी पाटी दिसली तिथेही जी भाषा आहे ती फारसी / पर्शियन च आहे. (अब्बूजान असते तर त्यांनी तुला अर्थ समजावून सांगीतला असता कारण त्यांनी एम ए पर्शियन भाषेत केले होते ) पण... असो ,

A square stone pillar two miles south of Antur contains an inscription mentioning the direction of Nagapur and Jalna on the east, Mehawar and Chalisgaon on the west, Antur and Burhanpur on the north, and Daulatabad and Ahmadnagar on the south. It records the Hijri date 1000 (A.D. 1583), and states that it was erected during the reign of Murtaza Nizam Shah. A small masjid within the fort has a Persian inscription which mentions that it was built by Ismail Husain in Hijri 1025 (A.D. 1608). Another Persian and Arabic inscription on one of the fort bastions is as follows:- " This lower wall was constructed during the reign and under the auspices of Burhan Nizam Shah, the fountain head of wisdom, by Malik Ambar, the wisest of the wise and benefactor of the world, in the year 1007 Hijri" (A.D. 1590). A later inscription upon a small arch within the second gateway is dated 1035 Hijri (A.D. 1618), and mentions that the arch was built by order of Malik Ambar

रेवती's picture

2 Feb 2012 - 6:37 pm | रेवती

छान.

मालोजीराव's picture

2 Feb 2012 - 7:51 pm | मालोजीराव

मस्त किल्ला आहे आणि वर्णन सुद्धा !
बराच काळ निजामशाहीत आणि नंतर मोगल,निजाम यांच्याकडे राहिलेला किल्ला.....त्यामुळे मराठ्यांच्या फारश्या खाणाखुणा दिसत नसाव्यात !

- मालोजीराव

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 11:29 pm | प्रचेतस

अंतुर हा यादवकालीन किल्ला.कदाचित १२/१३ व्या शतकातला. पितळखोरा लेणी, शृंगारचौरीची लेणी याला तशी जवळ त्यामुळे तो यादवांच्याही आधीचा असावा पण त्याला पुरातत्वीय पुरावा नाही. १५५४ च्या सुमारास दनय्या रूईरायाकडे ह्या किल्ल्याचा ताबा होता. त्यावेळी अहमदनगरच्या निजामाने स्वारी करून तोफांच्या मार्‍याने तटाला भगदाड पाडले व किल्ला घेतला. पुढे निजामाकडून मोंगलाकडे व परत १७ व्या शतकात तो निजामाकडे आला. शेवटी हाही किल्ला नंतर इंग्रजांच्या ताब्यात जाउन वैराण झाला.

खालून पाचव्या फोटोत जे कमलदलचिन्ह आहे ते यादवांचे.

वाहीदा's picture

2 Feb 2012 - 11:54 pm | वाहीदा

Dakhan History : Musalman And Maratha, A.D. 1300 To 1818
Author : Loch W.W. Loch Esquire

त्यात या किल्याचा उल्लेख नक्कीच आहे

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 12:02 am | वपाडाव

वाहिदा, या आधीच्या प्रतिसादातील माहिती खुप छान... वल्ली महाराज शोध घेतीलच या पुस्तकाचा...

रम्या's picture

3 Feb 2012 - 2:07 pm | रम्या

अतिशय सुंदर सफर घडवलीत सुहास!
पण गड किल्ल्याचे फोटोग्राफ्स पाहताना त्यांच्या दुर्दशे बद्दल खूप वाईट वाटतं, त्याच बरोबर भयंकर चीड सुद्धा येते.
इतर वेळी आमचे शिवाजी महाराज-शिवाजी महाराज, राकट देशा-दगडांच्या देशा, आम्ही ह्यांव सैनिक आणि आम्ही त्यांव सैनिक असे बोंबलत हिंडणारे राजकारणी कुठे झोपलेत कुणास ठाऊक? त्यांना या गडकिल्यांची दुर्दशा दिसत नाही का?

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2012 - 2:44 pm | सानिकास्वप्निल

मस्त वर्णन आणी फोटो :)
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2013 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन गेलो होतो. किल्ल्यापर्यंत पोहचता पोहचता थकुन गेलो. गौताळ्याचा घाट ओलांडून ( ही आमची पहिली चूक) नागद मार्गे जाणे मला वाटतं जाण्यात चूक झाली. विद्यार्थी भर दुपारी चारेक किलोमिटर डोंगर चढणे तसं कठीण होतं. नागदवरुन परत गौताळ्याचा घाट चढून नागापूर फाट्याच्या रस्त्याला लागलो. दुसरी चूक होती व्हाल्वो टाईपच्या बसेस घेऊन जाऊ नये. (होत काही नाही, काही वळणावर देवाचा धावा करायची वेळ येते) आणि मग नागापूरहुन सहाएक किलोमिटरचा वळणावळणाच्या रस्त्याने बस पुढे जाऊ शकत नाही, अशा थांब्याला बस उभी करुन आंतुर किल्ल्याचा मार्ग धरला. आंतुर किल्ला तसा केवळ अवशेषापुरता उरला आहे. दाट झाडी. जागोजागी वाहते पाण्याचे झरे, जंगली पानं फुलं. रस्त्यात मोठमोठे पडलेले दगड बाकी, सुहासने वर्णन केलेच आहे. इति.

काल सुहासची आठ्वण झाली होती.

-दिलीप बिरुटे

रुमानी's picture

8 Sep 2013 - 11:46 am | रुमानी

अरे वा...@ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल.... :)

मस्त किल्ला आणि वर्णन दोन्ही ..!

arunjoshi123's picture

9 Sep 2013 - 2:45 pm | arunjoshi123

सबब लिखाण पश्चिम महाराष्ट्रातल्या, खासकरून पुण्यातल्या, मंडळींनी हलक्याने घ्यावे अशी विनंती करून -

१९९४ ची गोष्ट. मित्रांसोबत सिंहगडला जाणे सुखद वाटत होते. कारण आतापर्यंत न केलेला 'गड चढणे' नावाचा आंनंददायक प्रकार इथे अनुभवाला येत होता. गप्पा, टप्पा, मौज, मस्ती मधे ३-४ तास गेले. शेवटी मी विचारले, "किल्ला कुठे आहे? आपण टाइमपासच जास्त करत आहोत." मी किती खोल मूर्ख आहे याची कल्पना असल्याने, जी साधारणतः मराठवाडाकरांबद्दल पुणेकरांची मनातल्या मनात असते, माझ्या पुणेकर मित्रांनी तो प्रश्न मनावर घेतला नाही. पण जगातल्या प्रत्येक आत्मश्रेष्ठत्ववादी समूहामधे (इतरांच्या) सुदैवाने एक ना एक अरुंधती रॉय असतेच. आमच्यातही एक होती. तिने सांगीतले, "जोश्या, आपण मघाच्या १-२ तासांपासून किल्ल्याच्या आत आहोत. किल्ला म्हणजे तुला नक्की काय अपेक्षित होतं?".
"दोन दरवाजे आणि थोडंसं भितांड किल्ला म्हणवून घ्यायला पुरेसं नाही. औस्याचा किल्ला, उदगीरचा किल्ला, नळदुर्गचा किल्ला, परांड्याचा किल्ला, औरंगाबादचा किल्ला असे गडश्रेष्ठ पाहिलेल्या मला आपण केवळ एका डोंगरावर आलो आहोत असे वाटतंय. आमच्याकडच्या किल्ल्यांत एकटे जाल आणि जास्त लूडबूड कराल तर हरवून जायची फार शक्यता आहे. इथे तर हरवून जायला ओपनली ऑफर केलं तरी ते शक्य नाही."
मग मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असे तुळुंब युद्ध झाले, त्यात मराठवाड्याचे दणकट किल्ले पुण्याच्या गनिमी काव्यात सहजी बळी पडले हे सु़ज्ञास वेगळे सांगणे न लगे.

बॅटमॅन's picture

9 Sep 2013 - 3:25 pm | बॅटमॅन

हाहाहा..मस्त किस्सा. पण पश्चिम महाराष्ट्रातले किल्ले तसे का राहिले, त्यांची पडझड अन्य ठिकाणच्या किल्ल्यांपेक्षा जास्त का झाली याचा जर्रासा इतिहास पाहिल्यास ते लगेच लक्षात येतं. असो.

बाकी गडराज म्हणायचा तर रायगड पाहिला असेलच. :)