आधार घेते
रेंगाळलेली सांज होतांना
नभीधुंद जरा माघार घेते,
चांदण्याची रात होतांना
तुझ्या मिठीचा आधार घेते||१||
दवांत भिजलेला गुलाब
पहाटे खुडण्याचा अपराध करते,
नको थांबवू तुझ्यासाठी
काट्याचाही घाव एकवार घेते||२||
नाजूक वात तेवतांना
देवाला कधी प्रश्न विचारते?
उमलू दे तुझे नेत्रदीपक
उरला जरी मी अंधार घेते||३||
बांधून रहस्य गाठोडे
पाऊलवाट प्रवासाला निघते,
विसावशील मन गाभारी
तुझा अनमोल व्यापार घेते||४||