राघू
आज झालो भ्रष्ट मी
पसरले माझे दोन हात
पाठीवरती वार करुनि
केला साहेबा कुर्निसात
लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी
मागे वळूनी पाहतो तर
त्याचीही हिरवी शेपटी
कोण खोटा कोण खरा
हिशेब मनी नाही लागला
ज्याला मी साहेब समजलो
तोपण साला राघू निपजला
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर