भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.
रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या. त्या युद्धनौका आणि पाणबुड्यांचे रशियन फेडरेशनचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी यांच्यासाठी नेमलेल्या रशियन नौदलातील विशेष छोट्या नौकेतून निरीक्षण केले.
या संपूर्ण सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या कक्षात भारताचे नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह हेसुद्धा उपस्थित होते. ‘तबर’वर तैनात असलेल्या बँडपथकाने संध्याकाळी झालेल्या सिटी परेडमध्ये भाग घेतला.
22 जुलै रोजी सेंट पीटर्सबर्गमध्ये पोहचल्यावर नौदलांच्या परंपरेनुसार यजमान देशाच्या नौदलाच्या खास समारंभासाठीच्या बँडपथकाच्या वादनाने ‘तबर’चे स्वागत केले गेले. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनीही ‘तबर’ला भेट दिली.
माझ्या या लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_31.html?m=1
प्रतिक्रिया
31 Jul 2021 - 12:50 pm | चौथा कोनाडा
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे !
‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल !
फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल !
नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल !
धन्यवाद !
31 Jul 2021 - 1:14 pm | कंजूस
बोटीबद्दल गुप्तता राखत असतील.