हंपी एक अनुभव - भाग १
गेले अनेक दिवस... दिवस का गेलं वर्षभर हंपीला जावं असं मनात होतं. पण 2020 आलं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि भविष्यातली स्वप्न बदलून गेलं. दिवाळीपर्यंत पुढचा काही... विशेषतः आपल्या स्वप्नांचा काही विचार करण्याची हिंमत देखील नव्हती. पण मग हळूहळू आयुष्य काहीसं पूर्व पदावर येतं आहे असं वाटायला लागलं आणि मग पूर्वी बघितलेली स्वप्न परत डोकं वर काढायला लागली.... मला पुन्हा एकदा हंपीची स्वप्न पडायला लागली. अर्थात इतक्या लांब स्वतः ड्राईव्ह करून जायचं म्हंटल्यावर नीट विचार करून योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं.