खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (पूर्ण)
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित होते आणि म्हणून त्याबद्दल बरेच कांही लिहिण्याचा संकल्प ही मालिका सुरू करताना सोडला होता. या आधीचे काही लिखाण केल्यानंतर वैयक्तिक जीवनांत अनपेक्षितपणे सुरु झालेल्या आणि चालूच असलेल्या वादळामुळे हा संकल्प मधेच सोडून द्यावा लागत आहे. या विषयावरील लिखाण सुरु करतांना बरेच नवीन कांही घडेल अशी अपेक्षा होती आणि त्याबद्दलची माहिती रंजक ठरेल ही अपेक्षा होती.