चंद्र पाहिलेला माणूस
रात्रीचे साधारण ९-१० वाजले असावेत.मी नानांच्या सोबत टेरेसवर वर शांतपणे उभा होतो. नुकतेच शारदीय नवरात्र संपुन गेले होते त्यामुळे हवेत आता जाणवण्याइतपत गारवा होता. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने रात्री उशीरा टेरेसवर सगळ्या घरच्यांच्यासोबत दुग्धपानाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणेच! टेरेसच्या एका कोपर्यातील भागात एका मोठ्ठ्या कढईत खुप सारं दुध उकळत ठेउन मगाशीच आज्जी खाली गेलेली होती. त्या स्टो चा शांत आवाज रातकिड्यांच्या आणि दूरवर असलेल्या पिपळपानांच्या सळसळीत बेमालुमपणे मिसळुन एक वेगळाच माहोल तयार करत होतो.