वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
१.
तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते.
रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता. अजूनही पायरेटच्या केसचा छडा लागत नव्हता.
रो पानी पिण्यासाठी उठला मात्र पाण्याचा ग्लास बघूनच त्याला किळस वाटली.
त्या पाण्यावर एक झुरळ तरंगत होते, जीवाच्या आकांताने त्याची बाहेर येण्यास धडपड चालली होती!
रोने पाणी बाहेर फेकले.
पण!!!!
त्याच्या डोक्यात वीज चमकली!
आणि तो आपली हत्यारे घेण्यासाठी पळाला!
२.
"अरेबिक कथा बंद कर बरं आधी!"
"कथा नाही खरोखरची घटना आहे ही."
"जरी मी घोस्टहंटर असलो तरी माझा या कथेवर विश्वास नाही."
रोने खिशात हात घातला व एक नाणे बाहेर काढले.
समोरची व्यक्ति अवाक होऊन बघतच राहिली!
"बरं तुला एक जहाज हवी आहे, जी वाळवंटात चालेल."
"हो."
"अम्म्म्म, आणि हो तिच्यावर तुला गावभरच्या तोफा हव्या आहेत."
"हो."
"ठीक आहे मी तजवीज करतो, पण बदल्यात काय देणार?"
रोने एक बाटली पुढे केली!
महाबायंगी!!!!!!
"वापरू नकोस विकून टाक कोणालातरी."
"महाबायंगी वापरायला मी मूर्ख नाही."
'नाही रे तू तर खूपच हुशार आहेस."
"हाणा अजून! बरं आठ दिवसात तुला तुझे जहाज मिळेल!"
३.
त्याने बोलल्याप्रमाणे खरंच वाळवंटात चालणारी जहाज तयार केली.जहाज मजबूत होती. पण पायरेटच्या जहाजापुढे टिकाव धरेल कि नाही हे अजूनही रोला कळत नव्हते.
तरीही देवाचे नाव घेऊन तो जहाज चालवत होतात.
त्याच्याबरोबर जहाज चालवण्यासाठी राजपुत्राने अठरा हबशी दिले होते.
समुद्राच्या अलीकडे वारा जोरात वाहत होता.
पायरेटची जहाज वर आली होती.
ती जहाज बघून हबशी लोकांची भीतीने गाळण उडाली.
रोने सर्वाना धीर दिला
पायरेटने तोफांचा मारा चालू केला.
जहाजाच्या चिंध्या उडाल्या.
रोने तोफा बाहेर काढण्याचा आदेश दिला.
मात्र तोफेत दारुगोळा भरला गेला नाही.
भरलं गेलं ते पाणी!
आणि पाण्याचा मारा सुरू झाला.
पायरेटच्या जहाजावर हलकल्लोळ माजला!
सगळीकडे ज्वाला दिसू लागल्या!
आणि पायरेटने ह्या जहाजावरून त्या जहाजावर जळत असताना उडी मारली.
पायरेट आग्यावेताळच दिसत होता.
हबशी जहाज चालवत होते!
जहाजाची दिशा बदलली गेली होती!
पायरेटने रोवर तलवारीने घाव घालायला सुरुवात केली.
रो त्याचे वार थांबवू शकत नव्हता.
रो अत्यंत जखमी झाला होता.
हबशी केव्हाच जहाज सोडून गेले होते.
कारण जहाज इप्सीत स्थळावर आली होती!
रोने पायरेटचा वार चुकवला.
त्याने एका वातीला आग लावली.
जहाज आता त्याच्या आवडत्या जागी होती.
समुद्रात!!!!
रोने समुद्रात उडी घेतली, आणि वात दारुगोळ्यावर पोहोचली!
धडाम्!!!!!
जहाजाच्या ठिकर्या उडाल्या!
आणि पायरेट जहाजासहीत समुद्रात विलीन झाला!
क्रमशः
(पुढील भागात रोची श्रीमंती आणि 'ती'ची भेट व अँद्रिआच्या रहस्याचा उलगडा)
याआधील भाग
घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
www.misalpav.com/node/34200
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
www.misalpav.com/node/34204
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २
www.misalpav.com/node/34253
घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३
www.misalpav.com/node/34334
प्रतिक्रिया
9 Apr 2016 - 6:56 pm | विजय पुरोहित
मधल्या अनुपस्थितीच्या काळातील सर्व भाग पुन्हा वाचून काढले पाहिजेत...
बाकी भारीच प्रकरण दिसतंय भावा...
9 Apr 2016 - 7:00 pm | DEADPOOL
त्याशिवाय समजणारही नाही
9 Apr 2016 - 8:52 pm | अनिरुद्ध.वैद्य
म्हणजे काय?
9 Apr 2016 - 9:16 pm | विजय पुरोहित
मिपावरील भूत पिशाच तज्ञ मंदारमामा कात्रे यांचे लेख वाचून पहा.
10 Apr 2016 - 12:58 am | mandarbsnl
त्याची लिंक देऊ शकाल का आपण?? धन्यवाद...
10 Apr 2016 - 8:32 am | विजय पुरोहित
रंगाण्णा मदत करा प्लीज...
10 Apr 2016 - 9:12 am | विजय पुरोहित
http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.
9 Apr 2016 - 9:25 pm | DEADPOOL
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते.
हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते.
महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!
9 Apr 2016 - 9:28 pm | पिंगू
मस्तच. हा भाग लहानसा पण उत्कंठा वाढविणारा आहे.
11 Apr 2016 - 4:04 pm | पंतश्री
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली.
एकच विनन्ति.
जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
11 Apr 2016 - 4:21 pm | मराठी कथालेखक
रटाळ.
11 Apr 2016 - 8:08 pm | जव्हेरगंज
अखेर आले परतुनी DEADPOOL!!
दमदार, जोरदार, सदाबहार !!
येऊंद्या अजून !!
11 Apr 2016 - 10:22 pm | DEADPOOL
धँस जव्हेरभौ