व्याख्याच व्याख्या

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
11 Jan 2011 - 9:48 am

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

11 Jan 2011 - 10:18 am | विजुभाऊ

अरे अजून काही राहिले का?
प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो)
अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती.
अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

चांगले आहे कलेक्शन..

आवडले.

अजून काही व्याख्या सुचत असतील तर लिहिण्यास हरकत नाही.. तेवढेच कलेक्शन वाढेल

ramjya's picture

11 Jan 2011 - 10:25 am | ramjya

Digestive System : " The System which start by right hand and by left hand"

....

डावखुरा's picture

11 Jan 2011 - 10:29 am | डावखुरा

मजाचे...

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे.

स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम

-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 10:43 am | नरेशकुमार

-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

ह. घे, जिव नको घेउ.
मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे.
पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर
स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 11:04 am | नरेशकुमार

जरुर जरुर,
पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jan 2011 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर

भाड्या !!

बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

गवि's picture

11 Jan 2011 - 10:48 am | गवि

सैपाक येणारी आय टी तली पोर्गी

आणि

सैपाक करणारी आय टी तली पोर्गी

यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे.

नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..

ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;)

असो

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

गवि's picture

11 Jan 2011 - 11:08 am | गवि

स्वाक्षरीवरून तर अगदी सिद्धच झालं..

टारझन's picture

11 Jan 2011 - 11:18 am | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 10:43 am | नरेशकुमार

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
हे एकदम खरे आहे.

अजुन एक डेफिनिशन.

नरेशकुमार : काहीही न करता देवाने सगळे काही पुरवलेला इसम.

डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे.
टारझन भाऊ हलकं घ्या
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)

मजा म्हणून वाचा, सोडून द्या

स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम
आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद

(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन
असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)

अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;)

आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) )

-(पुसीकॅटप्रेमी) झा

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 10:45 am | नरेशकुमार

वयाचि गेलि २७ वर्शे किचन मधे मोजुन ८-१० वेळा गेलो असेन.

वेताळ's picture

11 Jan 2011 - 12:00 pm | वेताळ

बाहेर घासता काय?

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 12:10 pm | नरेशकुमार

नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत)
प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही.
ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही,
क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

टारझन's picture

11 Jan 2011 - 12:13 pm | टारझन

नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट ..
अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील.

असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला..

भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :)

(रामागडी) ग.बि.

चिगो's picture

12 Jan 2011 - 8:11 pm | चिगो

>>.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील.

ब्येक्कार हाणला हा गवि... ;-)

सूर्यपुत्र's picture

11 Jan 2011 - 9:28 pm | सूर्यपुत्र

>>(घरात दोन बायका घरकामाला आहेत)

मी सोयीस्करपणे "घरकामाला" हा शब्द गाळला. :)

(पुसीकॅटप्रेमी) झा

टार्या कहर आहेस

(तुझ्या व्याख्या वाचायला आवडतील)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Jan 2011 - 10:53 am | घाशीराम कोतवाल १.२

सिगरेट = तंबाखु भरलेली एक कागदाची नळी जिच्या एका टोकाला आग आणि दुसर्या टोकाला एक मुर्ख माणुस ( कोण म्हणाला रे धम्या म्हणुन )
..;)

अवलिया's picture

11 Jan 2011 - 12:04 pm | अवलिया

व्याख्येची व्याख्या काय?

मुलूखावेगळी's picture

11 Jan 2011 - 12:10 pm | मुलूखावेगळी

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका !
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 12:22 pm | नरेशकुमार

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

असहमत

जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते.
सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

अवलिया's picture

11 Jan 2011 - 12:17 pm | अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

हॅ हॅ हॅ
झालं..
नाना सुरु झाला

हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

अवलिया's picture

11 Jan 2011 - 12:59 pm | अवलिया

कोण टारु का?

चालु दे

तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;)

:)

असो.

(जाणकार) गवि.

तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :)
बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

अवलिया's picture

11 Jan 2011 - 1:33 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाही

ह्म्म. बरे..
पण..
अहो निदान गगनमराठी म्हणा हो.

बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :)

तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?

खुलाश्याबद्दल धन्यवाद.
आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :)

बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :)

- ततपपकरी

स्पा's picture

11 Jan 2011 - 1:54 pm | स्पा

ततपपकरी

मुलूखावेगळी's picture

11 Jan 2011 - 12:41 pm | मुलूखावेगळी

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत
>>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए
जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते.
सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.
>>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो

प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17.

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?
>>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात.

तसे नव्ते ते
१ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे
१+१=२ आता झाले ना २ जन?

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 12:46 pm | नरेशकुमार

सॉरी,
पन तसे नव्ते ते,
नवरा बायकोनि एकमेकांवर जिवापाड प्रेम करावे असे म्हनाय्चे आहे

नंदन's picture

11 Jan 2011 - 12:10 pm | नंदन

स्पावड्या, 'व्याख्या'न आवडलं :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jan 2011 - 12:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त रे स्पावड्या, लगे रहो,

विजुभाऊ's picture

11 Jan 2011 - 1:38 pm | विजुभाऊ

किसिंग अ स्मोकर इज लाईक लिकिंग अ‍ॅन अ‍ॅश ट्रे

दारुडा - जिवंतपणी स्वर्गात जाऊन येणारी व्यक्ती

टारझन's picture

11 Jan 2011 - 2:21 pm | टारझन

व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो.

-हरिओमहरी

टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे?

मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची !
बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि's picture

11 Jan 2011 - 2:19 pm | गवि

रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त's picture

11 Jan 2011 - 2:24 pm | ५० फक्त

चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते
वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते.

प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

स्पा काका अमदावादला जाऊन मराठीचा क्रॅश कोर्स केलात वाटतं, व्याख्या वैगरे देताय म्हणून म्हटलं !! :D

असुर's picture

11 Jan 2011 - 4:32 pm | असुर

सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!!

मी अजून एक अ‍ॅडतो यात!!!

विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =))

कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =))

--असुर

स्पा's picture

11 Jan 2011 - 4:45 pm | स्पा

वैचारिक वांत्या

नावातकायआहे's picture

11 Jan 2011 - 5:25 pm | नावातकायआहे

लाइफ : सेक्सुअली ट्रांन्समिटेड डिसिज.

ईन्टरफेल's picture

11 Jan 2011 - 8:42 pm | ईन्टरफेल

नरेशकुमार's picture

12 Jan 2011 - 6:25 am | नरेशकुमार

आत्तच एक मेल आला
New Financial definitions in India :

· 1 Lac = 1 Peti;
· 1 Crore = 1 Khoka;
· 500 Crore = 1 Koda;
· 1,000 Crore = 1 Radia;
· 10,000 Crore = 1 Kalmadi;
· 10 KALMADI = 1 Raja;
· 10 RAJA = 1 PAWAR;
· 10 PAWAR = 1 Madam..

चिगो's picture

12 Jan 2011 - 8:02 pm | चिगो

>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ

स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-(

>>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

>>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

ह्या तर येकदम झक्कास... ;-)

एक खडा माझापण...
SMILE - the second best thing you can do with your lips...

नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ.

अरे मेल्या चीगो,

मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे...
गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात.
कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच.
आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत...
म्हणून ती व्याख्या
आता कल्ल का?

त्या वाया गेलेल्या अनेक मुलामुलींमध्ये तुमचा नंबर कितवा ??

त्या वाया गेलेल्या अनेक मुलामुलींमध्ये तुमचा नंबर कितवा ??

तुमच्या नंतरचा

आणि सुधांशु साहेबांचं वायाच गेलं नसेल तर ? :)

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 3:02 pm | नरेशकुमार

काय वाया गेलं नसेल तर ?
योग्य खुलासा व्हावा.

त्यातही आमच्या नंतरच का ? अरे कधी तरी आमच्या आधी नंबर लावा !! :D

साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ?

रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात

टार्या क ह र

टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ??
तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :)
बाकी लावणे महत्वाचे आहे :)

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 2:59 pm | नरेशकुमार

पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सूड's picture

13 Jan 2011 - 3:04 pm | सूड

प्रकाटाआ

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 3:04 pm | नरेशकुमार

योग्य वेळी, योग्य ठिकानी, योग्य लंबर लावण्यासाठी धोरन कडक असावे लागते.

इंटरनेटस्नेही's picture

13 Jan 2011 - 10:16 am | इंटरनेटस्नेही

अरे स्पा मित्रा खरोखर चान चान लिहीलयंस रे.. मनापासुन आवडला धागा! :)
कीप इट अप! :)

कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित)
१) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट
२) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!

एकदम खतरनाक, काका :)