मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्याख्याच व्याख्या

स्पा · · जनातलं, मनातलं
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर) ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र' परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

वाचन 23537 प्रतिक्रिया 73