मी अश्व!!
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!
वेग अफाट
शक्ती अचाट
अंगी डौल
मोल अमोल
निष्ठा घोर
इतिहास थोर
करारी बाणा
सखा महाराणा
बनता दळ
सैन्या बळ
आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन
नीज गहाण
वया परिमाण
लौकिकी मती
प्राणी जगती
अडीच पावली
चौसष्ठ आलयी
पौरुष नामांकन
दिव्य आभूषण
मिळता सात
तिमिरा मात
ऋणी विश्व
मी अश्व!!
- संदीप चांदणे