अद्भुतरस
ट्रिंग ट्रिंग !!!!!
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"
१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..
चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...
काही वर्षांनी,
कधीतरी.....
उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....
भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....
चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....
मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!
(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद
शिव शिव
कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही
© कर्रोफर नमुरा
निळावन्ती
मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला
त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही
काफिल्यात विरघळताना
गारूड निळेसे पडले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले
(लिहितो विडंबन स्वतःच साठी)
लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल
विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा
वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा
विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस
गेम = डुआयडी
प्रेरणा : गेम
आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे
वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही
तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
वाट पहात आहे.....
त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!
घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!
मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!
चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!
पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!
<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका
एकोणवीस
शोधण्यात खूप वेळ जातो
काथ्याकुटात एक धागा हुकला आहे
त्याच्या जरासं खाली
एक किडा वळवळतोय
दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो
टंकाळा आल्यावर मी
एखादा प्रतिसाद लिहायला घेतो
अर्थ?
समजण्यात खूप वेळ जातो
तोल सुटलाय मिपावरचाही
रोज उठून कोण साव्ररणार त्याला?
सल्ला,
मागण्यातही तूचभेळ खातो
<<<माजबुरी है>>>
लै लै गांजलेल्या मिपाकर वाच्कांनी ह्यो कागुद आमचे टाळक्यात हाणला(आतल्या दगडासकट) (डोक्याव शिरस्त्राण असलेने वाचलो) का? का? वाचलात असे म्हणण्यापुर्वी आम्ही दगड बाजूला ठेऊन कागद शिताफीने वाचला आणि जसाच्या तसा तुमच्या समोर ठेवला..
आणि दगड बरोबर घेऊन जात आहोत (दुसर्या कागदाला लावायला,इतर विचार मनात आणू नयेत)
ठहेरे हुए पानी मे
तैरते डुबते पत्ते की तरह
होता है तेरा लॉजीक का कबूतर
कहेने को तो पानी पत्तोंको
कभी डुबता तो नही
बस पानी मी बहता हुआ
भटकता रहता है