लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल
विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा
वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा
विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस
पुन्हा अवेळी आली कळ जर
पोट दाबुनी ठेउ नका
पाडून टाका मळमळ सारी
विचार कधिही करु नका
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
23 Nov 2016 - 12:53 pm | किसन शिंदे
ह्हाह्हाह्हा!! भारी लिहीलंय हे
एक लंबरच
23 Nov 2016 - 12:58 pm | खेडूत
नेहेमीप्रमाणेच सुंदर हो बुवा!
अजून कच्चा माल शिल्लक आहे..
23 Nov 2016 - 1:11 pm | पाटीलभाऊ
पैजारबुआ...मस्त लिहिलंय.
23 Nov 2016 - 1:15 pm | पुंबा
वा वा.. वंटास लिहिलंय
23 Nov 2016 - 1:22 pm | टवाळ कार्टा
हही हही हही
23 Nov 2016 - 2:01 pm | नाखु
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले.
अमक्या तमक्या यमक्यातला नाखु
23 Nov 2016 - 8:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी)
पैजारबुवा,
23 Nov 2016 - 2:21 pm | ग्रेंजर
मस्त लिहिलंय :)
23 Nov 2016 - 3:58 pm | वेल्लाभट
लोल!
23 Nov 2016 - 4:11 pm | प्रचेतस
हहपुवा.
पैजारबुवा हे मिपाला लाभलेले एक श्रेष्ठ विडंबक आहेत.
23 Nov 2016 - 5:28 pm | सस्नेह
=))
23 Nov 2016 - 5:45 pm | हतोळकरांचा प्रसाद
जबराट!
23 Nov 2016 - 8:20 pm | सूड
हा शालजोडीतला का?
23 Nov 2016 - 9:06 pm | अजया
=))
महान विडंबक आहेत पैजारबुवा!
23 Nov 2016 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा
@पुन्हा अवेळी आली कळ जर
पोट दाबुनी ठेउ नका
पाडून टाका मळमळ सारी
विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नळावरच पाठवतो! ;)
5 Dec 2016 - 5:01 pm | रातराणी
=))
5 Dec 2016 - 5:08 pm | बरखा
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस"
हे भारी....
6 Dec 2016 - 11:56 am | अमोल केळकर
सुरेख
7 Dec 2016 - 7:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी
बुवा __/\__!