नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
1 Dec 2015 - 3:36 pm

नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन

भारी भारी
ब्लॉग दुवा

भारी भारी *३
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू

रस्त्यारस्त्यावर आमच्या भाऊंची हवा
भारी की नाय (हबीबी दा)
दिसतो तो म्हणतो भाऊ तुम्हीच हवा
भारी की नाय (हबीबी दा)

भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू

भाऊंचा नाद कुण्णी करतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)
करतो तो करतो पण तो उरतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)

भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू

भाउंची गाडी ऑडी चमचमत्या चैनी
रेबॅनचा गॉगल आणि तोंडात खैनी
भाऊंना भेटायसाठी ह्या मोठ्या लैनी
भाऊंची वाईफ अख्या गावाची वैनी

भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू

नडला की तोडला भाऊ सॉलिड स्ट्रिक्ट
चुकीला माफी नाही लाथच डायरेक्ट

भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू

वीररसअद्भुतरसरौद्ररसविडंबन