(पाठ शिवा हो पाठ शिवा)
पाठ शिवा हो पाठ शिवा
वार्धक्यातही वाघ रडवला
डाव टाकूनि नवा नवा
बन कमळांचे मुदित* सापळे
लपायास मज असे मोकळे
सत्तांधाला काय का कधी
शिवाशिवीचा खेळ नवा?
टिकटिकविरहित जरी तव पाऊल
अचूक मला पण लागे चाहूल
कित्येकांची चळते बुद्धी
तुझ्या ऐकता पायरवा
उमटू न देईन साद पाऊली
सर्रकन जाईन जशी सावली
सामावून मज घेईल अलगद
हा कमळांचा उभा थवा
मालकी घेशील परी कशाची
तुझ्या पदांची तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे
महाराष्ट्र जर तुला हवा !! ;)
*मोद-मोदी-मुदित