प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का?
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......
(आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.)
(पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल.
पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये.... पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये )
(एवढे पुरे... आता ही चाल विसरा... आता नवी चाल)
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये
किस काढता काढता आपलीच बोटं किसू नये
एवढ्याच साठी धुवत नाहीत, ते डोळ्यावरची चिपडे
की ताटा भोवतीची रांगोळी, चुकूनसुध्दा त्यांना दिसू नये
ताजे वाढा, शिळे वाढा, वा हलवायाकडचे सुध्दा चालेल
पण हे अन्नपूर्णे, भरल्या ताटावर, या पोटात मात्र सारखे दूखू नये
वृत्तीने असेन किंवा प्रवृत्तीने, कशाने वखवखलेला मी?
की माझ्या मनाजोगता एकही पदार्थ, मला जन्मात दिसू नये
कुणी आणली असेल अशी वेळ या बुभूक्षीतांवर,
की स्वादिष्ट, सकस, सुग्रास अन्नही यांना पूर्णब्रम्ह वाटू नये?
सुवासासाठी कोणी कधी, अन्नात अत्तर मिसळते का?
तसे चूल पेटवण्या साठी कधी चंदन जाळू नये
(माज म्हणून सुध्दा,... चंदन पेटवण्याची जागा वेगळी असते)
बाकी सारे विसर "पैजारबुवा", पण एक लक्षात ठेव तू
ढलप्या उचकटून काढता काढता, (उगाच) आपले ज्ञान पाजळू नये
प्रतिक्रिया
20 Apr 2014 - 12:10 pm | पैसा
कुटलं तर चालेल का?
20 Apr 2014 - 12:20 pm | यसवायजी
हा हा हा..
काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो.
कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.
20 Apr 2014 - 3:51 pm | प्यारे१
__/\__
आता डब्बल मस्तानी
(काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;)
संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)