देहाला चोळून घेता...(एक लांबड)
देहाला चोळून घेता
मालिशवाला वदला
ढेरी वाढली मालक!
लाईफस्टाईल बदला
देहाला चोळून घेता
नेते सुखाने म्हणले
सत्तेच्या कृपेने मी
बख्खळ पैसे आणले
देहाला चोळून घेता
रोमिओही तणतणले
बायका वाघिणी झाल्या
आम्हा चप्पलने हाणले
देहाला चोळून घेता
ते विकलतेने कण्हले
लवकर ये मृत्यू
मन रोगाला शीणले...