कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार