डासाचे मनोगत
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला
मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला ||
अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव
जीव भुकेला रक्ता वाचून
झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१||
मारशील तू मजला कितीही
वंश माझा टिकतो तरीही
तव अस्त्रांची न मजला भीती
तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||