.
(चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)
बया आज माझी नसे वात द्याया
असो बंद डोळे मिटो पापण्या या..
नको गाणी आता जरा झोपतो मी
सुरांची तिच्या आज ती हूल नाही
बयेवीण ना त्रास होईल आता..
किती छान म्हटले तरी त्रास होतो
जरी कान बंदी तरी बोल येतो
शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..
न भांडी धुवाया,न कामा उशीर
कसा आज हातास येईल जोर
मुखी यातना रात्र जागेल गाया..
किती आठवू मी अशा भांडणांसी
पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी
कशाला उभी ती मनीं महामाया..!
.
प्रतिक्रिया
13 Jul 2013 - 9:36 am | चौकटराजा
आपले हे मिपावर पहिलेच काव्य आहे बहुदा ! सुरूवात मस्त !
जरा जोडू का...?
आमची अशीच माहेरी गेली असताना-स्वैपाकाची पाळी आली मग तिचा सय आली.
नको शेंगदाणे नको त्याच लाह्या
जाया आज माझी नसे भात द्याया
....असे काहीसे सुचले त्यावेळी !
13 Jul 2013 - 11:50 am | पैसा
मस्त!
13 Jul 2013 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
आवडत्या गाण्याची अशी "सुंदर" वाट लावलेली पाहून मजा आली :)
13 Jul 2013 - 12:32 pm | चाणक्य
.
13 Jul 2013 - 1:18 pm | सस्नेह
जमलंय !
13 Jul 2013 - 2:27 pm | अमोल केळकर
मस्तच !
अमोल केळकर
13 Jul 2013 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा
नको गाणी आता जरा झोपतो मी
सुरांची तिच्या आज ती हूल नाही>>> =))
13 Jul 2013 - 10:10 pm | विविवि
अप्रतिम
13 Jul 2013 - 11:56 pm | बॅटमॅन
बया आज तूझी नसे वात द्याया, नपेक्षा पहा भांडणे कत्तल |
बोला हवे ते, परी काव्य हे तो पुरे नेटके आणि हो उज्ज्वल |
जी जीवनाच्या पुर्या यातनांची, पहा बांधिली पूर्ण मोठी खरी |
मंदारमालाचि साता त-कारी, तिच्या वर्णिते सर्व नाना परी ||
15 Jul 2013 - 11:03 am | सूड
बर्याच दिवसांनी चांगलं विडंबन वाचलं मिपावर. नायतर विडंबनाच्या नावाखाली जी काही काशी करतात एखाद्या गाण्याची त्याला तोड नाही.
मनापासून आवडलं.
15 Jul 2013 - 3:28 pm | बाळ सप्रे
याच चालीवर..
नसतेस घरी तू जेव्हा, जीव सुटका सुटका होतो|
जगण्याचे जुळती धागे, संसार नेटका होतो
:-)