मदत - रामरक्षा स्तोत्र..
एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये.