सिर्फ पचास कमेंट्स चाहिये!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
27 Dec 2016 - 8:42 pm

NRI वेल्फेअर कमेटी,
आहार आणि आरोग्य विभाग,
ब्रँच पटाया (थायलंड).

बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स.
दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार)
वेळ :- सायंकाळी ७ वाजता.

अटेंडी :-
१) मिस्टर वेंकटेश गोपालन (VP, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल)
२) मिस्टर नंदकुमार एम. (रिजनल हेड, मेसर्स क्लार्क्स शूज कंपनी)
३) मिस्टर बाजीप्रभू (IT मॅनेजर, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल)
४) मिस्टर देवादास रामाकृष्णन (मॅनेजर कस्टमर सर्व्हिस, मेसर्स. पॅक्सीस ग्लोबल)
५) मिस्टर वेणू गोपालन (QC मॅनेजर, मेसर्स फोर्ड ऑटोमोबाईल)
६) ४ मोठे गजरे आणि ५ लहान वेण्या. (आयमीन लुंगीवाल्यांच्या बायका-पोरं)

विषय :- "कडिपत्ता संवर्धन आणि मशागती बाबत"

प्रस्तावना:-
पटायास्थीत भारतीय वंशाच्या कुटुंबांच्या स्वयंपाक गृहात चांगले चांगले पदार्थ बनत असतांना देखील चवीमधे "कुछ तो है मिसिंग" हि ओरड आणि त्या अनुषंगाने बऱ्याच चर्चा होतं असत. अश्याच एका चर्चेत लुंग्या वर करत, बाह्या फोल्ड करत आणि "एन्ना रास्कला" म्हणत या प्रकरणाचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावण्यावर एकमत झालं होत. स्वयंपाक गृहात चवीसाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या गृहिणींनी "कुछ तो है मिसिंग" याला जवाबदार थायलंड देशात "कडिपत्याचा" अभाव हे असल्याचे कारण ऍज ए इनपुट म्हणून ऑलरेडी दिले होते.

ऑगस्ट महिन्याच्या आसपास झालेल्या एका गुप्त बैठकीतल्या खलबतांनुसार, "मिस्टर देवादास रामाकृष्णन" यांनी यशस्वी “स्मगलिंग” करत केरळमधून "कडिपत्ता" झाडाचं जिवंत "कलम" थायलंडमधे आणण्यात नुकतंच यश मिळवलं होतं. ठरवलेल्या माईलस्टोन्स नुसार "प्रोजेक्ट कडिपत्ता" आकार घेत असतांनाच एका (अंध)श्रद्धेची मुख्य अडचण उदभवली ती म्हणजे,

"ज्यांच्या घरात एखादा मुलगा आहे त्यांनी स्वतःच्या घरात कडिपत्त्याचं झाड लावू नये, संततीसाठी ते चांगलं नसतं"

मिस्टर देवादास यांनी आपल्या घरातल्या बागेत कडिपत्त्याचं झाड लावल्याच्या एक-दोन दिवसांतच त्यांना हि माहिती मिळाली आणि कडिपत्त्याचं काय करायचं हा प्रश्न अचानक ऐरणीवर आला. एकच मुलगी असलेला आणि देवाला वाहिलेला मिस्टर बाजीप्रभू सोडून बाकी सगळेच केरळी आणि प्रत्येकाच्या घरी एक मुलगा असल्याने "कडिपत्त्याच्या" झाडाला बाजीप्रभूने "दत्तक घ्यावे किंवा कसे" यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी वरील ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. भरपूर खादाडी झालेल्या या गोलमेज परिषदेत "प्रोजेक्ट कडीपत्ता" साठी घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे,

NRI वेल्फेअर कमेटी निर्णय :-
१) श्री बाजीप्रभू हे अपार्टमेंटमधे रहात असल्या कारणाने त्यांनी सुचवलेला "कंपनीच्या बागे" चा पर्याय एकमताने मंजूर करण्यात आला.

२) कडिपत्ता झाडासाठी लागणारी कुंडी, माती आणि खत यांचा आर्थिक भार "पाला" सदस्यांमधे समान वाटून घ्यावा.

३) वरील खर्चामधून श्री. बाजीप्रभू यांना "विशेष बाब" म्हणून वगळण्यात यावे.

४) झाडाची निगराणी, पाणी आणि औषध फवारणी इत्यादी जवाबदारी श्री. बाजीप्रभू यांच्याकडे निश्चित करण्यात आली.

५) सुट्टी काळात कंपनीचा ड्रायव्हर झाडाची काळजी घेईल याची हमी श्री बाजीप्रभू यांनी दिली.

६) "कडिपत्ता" झाड तीन फुटांचं झाल्यानंतरच "पाला" तोडण्यास अनुमती यावर सगळ्या सदस्यांचं एकमत.

७) श्री. बाजीप्रभू यांनी झाडाची वाढ, येणाऱ्या अडचणी याबाबत वेळोवेळी "श्वेत पत्रिका" रिलीज करावी.

८) कडिपत्ता झाडाचा पाला तोडणी आणि "डिस्ट्रिब्युशन लॉजिस्टिक" याचा फ्लो चार्ट बनवण्याची जवाबदारी श्री. वेंकटेश आणि श्री. नंदकुमार यांच्यावर निश्चित करण्यात आली.

९) झाडाच्या उत्तम मशागतीसाठी "आभार" म्हणून श्री. बाजीप्रभू यांना "शेती तज्ञ" हा पुरस्कार आणि पाला सदस्यांकडे वार लावून जेवणाची सुविधा हा प्रस्ताव पुढल्या बैठकीपर्यंत "शिताफीने" टाळण्यात आला.

वरील निर्णय/आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

आपला,
वेंकटेश गोपालन
सचिव (NRI वेल्फेअर कमेटी)

ताजा कलम,
श्री. बाजीप्रभू यांनी कडिपत्ता झाडाची निगुतीने काळजी घेत "प्रोजेक्ट कडिपत्ता" यशस्वी करून दाखवला आहे. "कुछ तो है मिसिंग" हि समस्या जवळपास नाहीशी झालेली आहे. गृहिणी आनंदात आहेत. श्री. बाजीप्रभू यांना "शेती तज्ञ" हा पुरस्कार मिळवण्यासाठी कमीत कमी ५० +ve कमेंट्स मिळवण्याचा नवा नियम पारित करण्यात आलेला आहे. तेव्हा सगळ्या "मिपा"करांनी जास्तीतजास्त +ve कमेंट्स करून हाफ सेंचुरी मारण्यास मदत करावी हि विनंती. __/\__

-

-

विडंबनमदत

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

27 Dec 2016 - 8:45 pm | बाजीप्रभू

मामलेदाराचा पंखा यांच्या एका वृत्तांताचा प्रभाव या पोस्ट मध्ये दिसेल.

मस्त दिसतोय कडिपत्ता. जमिनीत रुजवलेत तर मस्त फोफावेल झाड.

खेडूत's picture

27 Dec 2016 - 9:09 pm | खेडूत

अभिनंदन. आणि शुभेच्छा!
दरमहा अजून एक काडी लावून जास्त क्षेत्र लागवडीखाली आणा.
इतक्या लोकांनी वापरल्यास बिचार्‍या झाडाचं काय होईल?

सुखी's picture

27 Dec 2016 - 9:33 pm | सुखी

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2016 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रकल्प ! थायी लोकांमध्ये कढीपत्ता लोकप्रिय करण्यासाठी शुभेच्छा !

असंका's picture

27 Dec 2016 - 10:33 pm | असंका

ओके.

लालगरूड's picture

28 Dec 2016 - 3:15 am | लालगरूड

जंगल करून टाका ;-)

संजय पाटिल's picture

28 Dec 2016 - 11:40 am | संजय पाटिल

छान प्रकल्प!!

इरसाल कार्टं's picture

28 Dec 2016 - 4:11 pm | इरसाल कार्टं

देऊन टाका पुरस्कार...

पैसा's picture

28 Dec 2016 - 4:57 pm | पैसा

पण फटु दिसेनात

सिरुसेरि's picture

28 Dec 2016 - 5:48 pm | सिरुसेरि

मस्त लेखन . छान खिंड लढवलीत . थायलंडमधल्या या यशोगाथेवर कबाली - २ निघाला पाहिजे .

मिशन कढिपत्ता सक्सेसफुल!

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Dec 2016 - 9:27 am | श्री गावसेना प्रमुख

मी पण लावलय कढिपत्त्याच रोप पण ३ फुटाच झाल तरीही सरळ वाढतय पाल्याच प्रमाण पानगाळ झालेल्या झाडासारखे आहे काय करावे बरे.

यशोधरा's picture

29 Dec 2016 - 3:20 pm | यशोधरा

त्याला ताक घाला. चहा करुन झाल्यावर चहापत्ती आणि त्याचं पाणी घाला.
त्यावर पांढरी बुरशी धरलीये का? पाण्याचं प्रमाण किती आहे झाडासाठी? माती बरी आहे का?

नावातकायआहे's picture

29 Dec 2016 - 9:44 am | नावातकायआहे

मस्त!

कढीपत्ता चिरून मग तो फोडणी करताना टाकावा म्हणजे व्यवस्थित खाल्ला जातो. नाहीतर सगळे खाताना तो बाजूला काढतात . एक चांगली वनस्पती आपण खाण्याऐवजी फेकून देतो व केवळ वासापुरता त्याचा उपयोग करतो.

पिशी अबोली's picture

29 Dec 2016 - 10:25 am | पिशी अबोली

कढीपत्ता नीट धुवून, एक दिवस नीट वाळवून त्याची पूड करून ती पूड वापरावी. मस्त वास लागतो आणि पोटात पण जातो.

पिशी अबोली's picture

29 Dec 2016 - 10:23 am | पिशी अबोली

अभिनंदन!

छान काम केलय! रच्याकने केरळी, थाई लोकांविषयी सविस्तर लिहा.

कायरा's picture

29 Dec 2016 - 2:54 pm | कायरा

छान विनोदी लेखन!

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2016 - 9:31 pm | टवाळ कार्टा

खी खी खी