मदत हवी आहे - प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे खरेखुरे घर बांधण्यासंदर्भात..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
20 Apr 2017 - 11:25 pm

नमस्कार मिपाकर्स..

गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे.. त्यातील एका ग्रुपवर एक मदत संदेश येऊन धडकला.

घर बांधण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या बाटल्या हव्या आहेत.

उत्सुकता चाळवली म्हणून या प्रोजेक्टची अधिक माहिती घेतली आणि बांधकाम सुरू आहे तेथे भेटही देऊन आलो.

हा प्रोजेक्ट करणार्‍या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार, सिंहगडाच्या पायथ्याशी एके ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे.

दोन कामगार बाटल्या भरताना..

.

घराची बाजू - दोन चौकटी आणि एक खिडकी..

.

बेस (फाऊंडेशन) पासून अशा सळया वर घेतल्या आहेत आणि कोपर्‍यावर कॉलमसारखे स्ट्रक्चर करून मजबुती वाढवली आहे.

.

.

घराच्या आतून.. पुढे आलेल्या बाटलीच्या टोकावर जाळी लाऊन गिलावा केला जाईल.

.

.

.

.

प्रत्येक ओळीतील बाटल्यांना एका मजबुत दोरीने बांधून मग एकावर एक रचले जाते.. त्यामुळे बाटल्या एकावर एक पक्क्या बसतात.

.

*****************

१) प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडी (ग्रीटपेक्षाही बारीक) भरून बाटल्या विटांप्रमाणे वापरल्या आहेत. हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याने फायदे तोटे किंवा घराच्या आत गरम होणे किंवा वातावरणातील बदलाचे घरावर होणारे परिणाम कळायला वेळ लागेल.

२) सुमारे २० हजार बाटल्या गोळा करून हे काम सुरू केले आणि अजुनही तितक्याच बाटल्यांची गरज आहे.

३) आपण घरातल्या / आपल्या वापरानंतरच्या बाटल्या टाकून न देता यांना देऊ शकतो पण येथे असलेली बाटल्यांची गरज आणि एकंदर आकडा बघता एकेकट्याने बाटल्या देणे सोयीचे होणार नाही. एखादी सोसायटी किंवा किमान १० - १५ घरांनी मिळून बाटल्या साठवल्या तर वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे पडेल

४) मिपाकरांकडून हवी असलेली मदत पुढीलप्रमाणे,
-- तुमच्यापैकी कोणी अशाप्रकारच्या प्रोजेक्टवर काम केले असल्यास अशा पद्धतीतले फायदे तोटे काय असतात..?
-- एकाच ठिकाणी नियमीतपणे / भरपूर प्रमाणात बाटल्या मिळतील असे एखादे हॉटेल किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या बघण्यात असल्यास प्लीज माहिती द्या.
-- आणखी कांही सल्ला / शंका असल्यास जरूर प्रतिसादावे.

*****************

तंत्रमतसल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

आपण जवळच आहोत व आमच्या नरहे कचरा डेपो मध्ये खूप मित्र आहेत मी मदत करतो जमेल तेवढी व निःशुल्क.

दोन दिवसात तुला 200+ बाटल्या देण्याची जबाबदारी माझी. पुढे ही आहेच मी, फक्त ही सुरवात. साईझ ची काही अट आहे का?
म्हणजे त्यानुसार शोध सुरू करू.

साईझची कांही अट नाही. मिळतील त्या बाटल्या चालतील.

उद्या फोन करतो.

तारेचे हुक लॉक का वापरात नाही आहेत ते? अजून मजबुती होईल आणि बाटल्यामधील हवा जाण्यासाठी होल केले आहेत का? तसेच पाणी आणि इतर हवामान मध्ये नेहमी बद्दल होतो तेव्हा त्याचा विचार केला आज का? छत याबद्दल का कल्पना आहे?

भन्नाट आहे कल्पना. अनेक शंका आहेत, पण त्या नंतर विचारू. इनामदार यांना शुभेच्छा.

भन्नाट आहे कल्पना. अनेक शंका आहेत, पण त्या नंतर विचारू. इनामदार यांना शुभेच्छा.

शेकिंग टेबलसारखे काहीतरी मशीन तयार करून बाटल्या भरण्याच्या प्रोसेसची क्षमता वाढवता येईल का..?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2017 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्हायब्रेटिंग फीडर बनवता येउ शकेल किंवा बाटलीचं तोंड लहान असल्याने नोझल फीडर. मदत लागली सांग एक रफ आराखडा बनवुन देउ शकतो.

रच्याकने मला राजेंद्र इनामदार ह्यांचा नंबर देशील का?

अजुन एक शंका बाटलीची स्क्रॅपकिंमत+ बारीक खडी पर बाटली ची किंमत नेहेमीच्या वीटेच्या तुलनेमधे कशी आहे? भिंतीमधे दर २ ते अडीच फुट उंचीवर सळई वापरली असती तर जास्तं ताकद मिळाली असतील. म्या शीवील इंजिणिअर नसल्याने घरांच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथबद्दल मी अचुक माहिती देउ शकणार नाही. कॉल अण्णा.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2017 - 5:37 am | अत्रुप्त आत्मा

अभिनव व भन्नाट उपक्रम.

अत्रे's picture

21 Apr 2017 - 6:04 am | अत्रे

आयडिया भारी आहे.

हा प्रोजेक्ट करणार्‍या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार,

यांना मिपावर बोलावता येईल का? एक AMA (आस्क मी एनीथिंग) सेशन करून त्यांना या बद्दल प्रश्न विचारता येतील.

वेल्लाभट's picture

21 Apr 2017 - 12:28 pm | वेल्लाभट

स्वागतार्ह कल्पना !

पण सिमेंट नेहमीपेक्षा जास्त वापरले जात नाही का? उन्हाळ्यात भिंती जास्त गरम होतील असं वाटतंय.

मदनबाण's picture

21 Apr 2017 - 9:30 am | मदनबाण

उपक्रमाला शुभेच्छा ! :)
Plastic Bottle Homes and Greenhouses

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)

इरसाल कार्टं's picture

21 Apr 2017 - 9:57 am | इरसाल कार्टं

धागा टाकल्याबद्दल धन्यवाद मोदक,
या विषयावर आपले आधीच बोलणे झालेले आहे तरी माझ्या शंका पुन्हा इथे मांडतो जेणेकरून व्यापक चर्चा होईल.
१.हा प्रकल्प किती व्यावहारिक आहे, म्हणजे विटांच्या बांधकामाच्या तुलनेने किती टक्के खर्च होईल?
२.बाटल्यांमध्ये माती/ग्रीट भरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ खर्च विटांच्या खर्चाइतकेच नाही ना होणार?
३.मजबुती विटांच्या तुलनेत किती आहे? याच्या काही चाचण्या घेतल्यात का?
४.फोटोंकरून असे दिसते कि भिंतीच्या आतल्या बाजूला बाटल्यांची झाकणे येतात, ती अर्थातच प्लास्टरने लिंपली जातील. तरी, इथे असलेल्या शंकूच्या आकारात विटांपेक्षा कितीतरी जास्त सिमेंट नाही का वापरले जाणार?
५.सिमेंटची (गुळगुळीत)बाटलीला धरून ठेवण्याची क्षमता आणि (खरखरीत)विटेला धरून ठेवण्याची क्षमता याने भिंतीच्या मजबुतीवर फरक पडेल असे मला वाटते.
६.तसेच बांधकामानंतर खालच्या थराच्या बाटल्या दाबल्या तर जाणार नाहीत ना?

वरील शंका काहीजणांना नकारात्मक वाटतीलही, पण मी खरेच या संकल्पनेवर ३-४ वर्षांपूर्वी विचार केला होता आणि मला हे मुद्दे नकारार्थी परिणाम देतील असे वाटले म्हणून मी हि संकल्पना गुंडाळून ठेवली होती. याबद्दल जर कोणाकडे पर्याय असतील तर मला आनंदच होईल तसेच इनामदारांनाही मदत होईल.

नितिन थत्ते's picture

21 Apr 2017 - 10:04 am | नितिन थत्ते

>>एकाच ठिकाणी नियमीतपणे / भरपूर प्रमाणात बाटल्या मिळतील असे एखादे हॉटेल किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या बघण्यात असल्यास प्लीज माहिती द्या.

रेल्वेचे अंतिम स्थानक. तिथे शताब्दी/राजधानी टाइप गाड्या पोचतात तेव्हा त्या गाडीतून काहीशे बाटल्या सहज मिळाव्या.
कॉन्फरन्स भरवल्या जातात अशी ठिकाणे.
पंचतारांकित किंवा साधारण उच्च हॉटेले
मॉल्सची फूड कोर्ट- तिथे कोक पेप्सीच्या बाटल्या मिळतील.

चांदणे संदीप's picture

21 Apr 2017 - 11:07 am | चांदणे संदीप

जगभरात असे अनेक प्रयोग सुरु आहेत घरबांधणीच्या कामात.

पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळी वाट धुंडाळण्याची कारणे असतात...

१) पैशाची बचत २) वेळेची बचत ३) मजबुती आणि आकर्षकता ४) नाविन्यता.

यातही ३) आणि ४) हे पर्याय काहीसे गौण आहेत. तर... पहिल्या दोन पर्यायाकडे बघता मला तरी प्लास्टिक बाटल्याचे घर जर्रा खर्चिक वाटत आहे. वेळेची बचत होत असेलही.

इथे ह्या घरमालकांनी फक्त मातीची पोती भरून, ती एकावर एक रचून भिंती बांधल्या आहेत. यात सिमेंट, वाळू पाणी वगैरेंचा वापर "नाही" इतका आहे. फक्त घर वाटावे असे पुन्हा आतून घरमालकांनी इंटेरियरची कामे केलेली नाहीयेत.

या इथे तर एक पूर्ण मालिकाच आहे मातीच्या पोत्यांपासून घरबांधण्यावर! नक्की बघा!

अजून एक तांत्रिक प्रश्न आहे.... पण तो आता असूदे, पुन्हा जरा वेळ मिळाला की सविस्तर टंकतो.

धन्यवाद!
Sandy

मार्मिक गोडसे's picture

21 Apr 2017 - 11:47 am | मार्मिक गोडसे

अशा घराला आग लागल्यास आगीमुळे नुकसानीची शक्यता अधिक असेल. लघु परिपथनाने आग लागल्यास भिंतीतील प्लॅस्टिक वितळून आग अधिक प्रमाणात पसरेल. बाटलीतील कच मोकळी होउन भिंतीवरील तुळईच्या वजनाने संपुर्ण भिंत व छत खाली कोसळेल. हवामानामुळे प्लॅस्टिक बाटलीतील हवेचे प्रसरण व आकुंचन झाल्यामुळे बांधकामाला तडे जाऊ शकतात. काही काळाने प्लॅस्टिक ठिसूळ होउन आतील कच मोकळी झाल्याने भिंत कमकुवत होईल.

दशानन's picture

21 Apr 2017 - 12:34 pm | दशानन

+1
हाच मुद्दा माझा ही आहे.
आताच एका हॉटेल मालकाला बोललो आहे, जमतील तेवढ्या देतो म्हणाला आहे बाटल्या.

राही's picture

21 Apr 2017 - 12:19 pm | राही

वरोरा येथील आनंदवनात जुने टायर वापरून वाहत्या ओढ्याला मजबूत बांध घालण्याचा यशस्वी प्रयोग विकास आमटे यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेला आहे.

लेख दिल्याबद्दल धन्यवाद. एकूण वापराविषयी साशंक. एक मात्र आहे बाटल्या गोळा करून वापरल्या जात आहेत. राजगडावर भरपूर असतात.
हल्ली धरणाची भिंत तिथलाच दगड ,खडक चुरा करून सिमेंट मिसळून बांधतात. उदा० ८० सालातले भातसा धरण.( आसनगावजवळचे)

वाळूपेक्षाही बारीक दगड आणि लाल माती वापरली तर?

कपिलमुनी's picture

21 Apr 2017 - 2:51 pm | कपिलमुनी

Let's Drink for a noble cause !

मी-सौरभ's picture

21 Apr 2017 - 3:33 pm | मी-सौरभ

भेटू संध्याकाळि

सोंड्या's picture

21 Apr 2017 - 6:55 pm | सोंड्या

रेल्वे रुळांवर फिरणार्या कचरावाल्यांबरोबर बोलन करून बघा. सध्या उन्हाळा असल्याने रेल्वे पटरीवर बाटल्या वेचणार्यांचा धंदा तेजीत असतो.
रेल्वे परिसरात पडणार्या 90 टक्के बाॅटल्स रिसायकल होतात.
कसारा ईगतपुरी येण्याची तयारी असेल तर व्यनि करावा सहकार्य केले जाईल

बाबा योगिराज's picture

22 Apr 2017 - 1:27 pm | बाबा योगिराज

माझ्या दुकानाच्या बाजुला होटेल/बार आहे. आठवड्याला ५००-१००० बाटल्या सहज मिळु शकतील. कधी हव्या ते कळवणे. त्या हिशोबाने मालकास बोलुन ठेवतो.

कळावे
बाबा योगिराज.