उन्हाळी उद्योग : भाग १ उद्योजक व्हा, आपले स्वतःचे दुकान उघडा
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित)
प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे" दुकान उघडणे, ते उभारण्याच्या प्रक्रियेत "दुकान" म्हणजे काय, त्यात काय काय हवे/ठेवता येईल, ते कसे तयार करता येईल या वर विचार करताना आजी/आजोबांना नातवंडांच्या कल्पनाशक्तीला बरीच चालना देता येईल
स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल