CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .