ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही!
आणि हो..स्मायल्या'ही बर्याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin*
................................
सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धडाधड आपटणे सुरु असते ते 'बर्याचदा' ज्या घरासमोरच्या वावरा'त पळत गेलो त्यातून आलेली ओलसर श्रद्धा अढळणारे, टराटर(मनास-मोकळे करणारे! *biggrin* ) आवाज न काढण्याची, तसा वात् प्रचार करु न देण्याची दडपशाहीची, बद्ध-कोष्ठाची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (सक्काळी ना...,{लागली नै तरी!}जायलाच हवे असे मत, का कशासाठी{असते}ते ठाऊक नसले तरी चालेल )...म्हणे!!! ;)
[*>>> कूंssssथुनी..वर्गा#त सार्या..वास माझा वेssगळा हे या तत्वाच्या लोकांचं जीवन सूत्रच!!!
#<--> इथे वर्ग या शब्दाचा अर्थ,सामाजिक..शालेय..जातीय असा आपापल्या मतीप्रमाणे हावा-तो घ्यावा.नंतर उगीच धागाकर्त्याच्या नावानी कुंथू नये! *biggrin* कारण कोणत्याही वर्गात काहिच अर्थ नसता,तर कुणी तरी त्यात-बसलं असतं का? ..असो!]
जुन्या कुंथीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच टारटूर/कूंन्थू..आणि घाई'ची लागणार्यांचा-हुतुतू..)असे बरेच वाSतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूSSSळा'कडे जाण्याची प्रेरणा{ढर्रढर्रढरढर...इथे नित्यानुभवाप्रमाणे, भस्सकन कॉक दाबून पाणी सोडल्याचा आवाज आला..} आणी कुंथुन कुंथुन करण्याचा प्रयत्न सर्व वावरां'मध्ये आढळतो. मी आणि मो.फोन, खादाडजग/बद्धकोष्ठी-सृष्टी कशी निर्माण झाली??? इ.इ. चा शोध मानवाने याच कक्षात सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात(भिंतींवर)आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे तिथल्या कार्य-क्रमाचाचा गाडा (सुळूक.सुळूक..)चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे विशेष-पटकन होण्यास मदत होते असे पाली,झुरळं इ.भयप्रद..व वर'च्या कक्षातून गळणारा ठिबक-सिंचनाचा पाऊस(मंजे-वरुन*) {*-म्हणून तो वरुण!..काय अगाध तर्कसंगती लागली...च्यामायला! *biggrin* }, आणि टाकिचे पाणि संपल्यावर नळातून येणारा(नुस्ताच)वारा इ. ना (पटकन होण्याच्या प्रांतातील)देव मानण्याची प्रथा सुरु झाली. बद्धकोष्ठमुक्ती औषधांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी (सर्वसाफ)नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'सांभाळण्या'चे काम सुरु होऊन त्यांना *च-कूपात{*-हा शब्द उघड वाचतांन्नाही अनेकांना अजुन अशौच-येतं..म्हणून फुली टाकली..क्षम-स्व! ;) ..) आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. त्यांचे हाती अनेक (विविक्षीत जागी) ऐनवेळी गुदगुल्या करवणारी अस्त्रे दिली गेली. आणि मग,(होइल की नाही???)या भितीपोटी त्यांची भक्ति सुरु झाली.
सुरुवातीला अस्सल परिणामी असलेले हे षड-तंत्र हळूहळू आलेल्या बर्याच नवरोगांमुळे टिकेचे लक्ष बनले.
काळाच्या ओघात टाइट झालेली आणि (काहिशी) सुटत आलेली,ढेरी इ. निकष मानून मजबूत केली गेलेली आतडीव्यवस्था ह्यांच्या-आतून,ढामढूमधडामधुडूम..आवाजी-मुख्य-कर्म आणि त्याचे कार्यस्थान असलेला परम-अर्थ सातत्याने पोट-कैदेत राहिला. सातत्याने होणारी खाद्यीय आक्रमणे,जिभेची गुलामगिरी,अकारण खाद्यार्थ-हिंसा(ए....कोण रे तो नॉनव्हेज खाणं..म्हणतोय!?), हार्ड वारूणी-करुणा यामुळे त्या पोटातील खाद्यात्मिक सूज आलेला स'माज,खर्या (प्रातःकालीन)परमार्थापासून सतत वंचितच राहिला.
याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच चिकटलेले आणि कधीही पटकन न होऊ-देणारे भ्रम (इल्यूजन){इथे..लूजमोशन का ऐकू आलां रां*&%चं .. ;) ..),प्रमाद(भका/भका खाण्याचा स्वभाव), करणापटव* (लिमिटेशन्स){*लोकहो..हे एरंडेल तेलासारखं बुळ्ळुक्कन बाहेर काढणारं..एखादं आयुर्वेदीक औषध असावं का?}, विप्रलिप्सा* (लोभीपणा){*-लोकहो,मला हे(पण) ,एरंडेला'सारखच जागा-मोकळी करणारं,कागद-सुरनळी-मयुरपिसाराफुलवासन..तंत्रातलं..औषध वाटतं!...आपल्याला काय वाटतं??? =)) } हे केवळ कल्पनेनी कळणारे-तदोष्ठशोषात्मक-दोष आपल्याला आपल्या त्या मूळ जागेचा ठाव घेण्यास सहाय्य तर करतातच पण त्यातही एखाद्या खाद्यविरोधी-वर्णाच्या अहंकारापोटी इतर समाजाला तसा अभास मिळण्यापासूनही वंचित-खुर्चीत* ठेऊ शकतात.{*--हे आसन भा'रतीय नाही,म्हणून संस्कृतीप्रेमी-आध्यात्मिक लोक..त्याचाही कचकाऊन निषेध करतात म्हणे..कै कै वेळेला..त्या'च्यावरच-बसायची वेळ आलेली असतांन्नाही!...असो!}
असा कुंथित, सगळ्यांपासून लांम(ब), मोकळे होण्यात-लाचार,सांस्कृतीक लेंग्याच्या नाडीनी अवळला गेलेला, स्व-तंत्र वात्-प्रचार न करु शकणारा{मंजे *सक्या सोडणारा..खराखुरा दांभिक) समाज आहारतज्ञांच्या आहारी गेला तर नवल काय? तिथे..आत-गेल्यावर निरिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची भित्ती-मनोरंजनाची साधने नाहीत, गळणारी डबडी नाहीत, खिडकीग्रंथ मिळालाच तर पाहाण्यापलिकडे आणि वरवर वाचना पलिकडे त्यातला-कूटार्थ कळत नाही अशा---परिस्थितीत* करणार काय?{*सांगा..सांगा...काय??????...} तेव्हा...हे-सगळे भाकड-सुरु झाले. रुपके ऐकताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरु'पणकार,{या विषयी अधिक खुलासा,व्य.नि.तून मिळेल..कृपया इथे छळून त्या उन्मनी अवस्थेचा बेरंग करू नये!} Kee'र्तनकार{मंजे,ज्यांना यात..सॉरी यातली,चावी-मिळालेली आहे,,ते!} देखील (त्याच) त्या अत्यावश्यक गोष्टी रंगवून रंगवून सांगू लागले आणि त्या ऐकून भस्सकन झाल्या'सारखा नि'श्वास टाकला गेला...
खरे तर (यात)वावरा'त-बसणार्या व्यक्तिंनुसार,आणि या व्याधितल्या भ्रातृ'वर्गा*नुसार{*वर्गा'चा अर्थ सुरवातीला विशिदिलेला आहेच!} फरक करणे अपेक्षित आहे. खाद्यांन्नांची आणि खादाडीची मांडणी खरे तर ८०% कडक-स्वयंपाक-कांड, १६% व्यायामोपासना आणि ४% ध्यान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा खर्या खाद्यांन्नांची माहिती नसलेला असा आहे. त्यांना नेमाने, काहीतरी चांगले खायला मिळेल असे आमिष दाखवून,नायतर अपचन होईल.. अशी भीती घालून प्राचीन खादाडीकडे वळवणे त्यांच्याकडून काही खाद्यान्नयज्ञ, खाद्यव्रते, दंभोSपास, असे काहीतरी करवून एक पुरावा मागितला..तरी फुटवता येईल अशा परिस्थितीत आणणे हे असल्याकर्मकांड्यां'चे मुख्य काम(असते.) त्यानंतर त्यातील-(उपासनेनी)वाकलेल्या लोकांना (सुटकेची आशा दाखवून)दिलेले काम,(इच्छाविरोधी)पंथ पूजन, मजा न येणारी-पूजा ही(असली-नकली :-/ ..)उपासना आणि त्यानंतर त्यांनाच पिळायचे कुभांड.. असे(दिव्य..यात) अपेक्षित आहे.(असते.)
२१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची सा'मान्य खाद्यभक्तांत आलेली क्षमता यामुळे या असल्या योग्यांना..पुराणातल्या गोष्टी /वानग्या नित्य (आजही..)व्यवहारात याव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे (जातकांवर टाकायचे..) टप्पे आहेत आणि ते अत्यंत अर्क*शुद्ध आहेत हेही (आपण)समजून घेतले(च) पाहिजे. {*अर्कशुद्ध म्हणायचे..कारण हव्या त्या समर्थनीय स्तराला जाणारे,यांच्या इतके या प्रांतांमधले जे ,त्यांना..अर्क'चम्हणायला हवे..त्याशिवाय कैसी शुद्धता??? नै का!?..असो!}
खादाडांन्नो जपून खा'हो। स्व'धर्म वेळेवर होवो। जो जे..पचवील तो ते खावो। (मग..)तुमचं काय जाssतं??? ॥ :p . :p . :p
प्रतिक्रिया
6 Jul 2014 - 8:14 pm | प्रचेतस
*yahoo* *lol* *mosking* *preved* *good*
6 Jul 2014 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा
दु...दु..दु... =)) :p
6 Jul 2014 - 8:28 pm | धन्या
@#$%&*-+/_!"':;,?~`|•√π÷×{}][)(=^°€£™®©¶\<>
6 Jul 2014 - 8:30 pm | प्यारे१
जुदा हो के भी... तू मुझमें कही बाकी है!
चित्रपटः 'कलयुग'. :)
6 Jul 2014 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा
खुदा होके भी तूम..आज भी कही खाकी है|
चित्र पट - हल्लीयुग! ;)
6 Jul 2014 - 8:38 pm | किसन शिंदे
=)) बूवा किती सुपार्या घेतल्या?? :D
6 Jul 2014 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा
किसनद्येव....आपनास...फोडल्या...असे म्हनायचे हाए काय? :p
6 Jul 2014 - 8:41 pm | भिंगरी
बापले
गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी.
माज्या पोतातून आवाज यायचा बन्दच ज्याला.
6 Jul 2014 - 10:07 pm | कवितानागेश
सेव्ह मिपा!!!
6 Jul 2014 - 11:04 pm | भिकापाटील
हग्यादादा की जय
6 Jul 2014 - 11:08 pm | पिंगू
हाहाहा.. कायमचूर्णाची मात्रा हवी असल्यास संपर्क साध्णे..
6 Jul 2014 - 11:55 pm | सूड
लैच !!
7 Jul 2014 - 1:55 am | बॅटमॅन
कुंथायला जाऊन....**** का लपविता ;) =)) =)) =))
7 Jul 2014 - 8:38 am | धन्या
डबडं हा शब्द तीन अक्षरी आहे. चार फुल्या कशासाठी ?
7 Jul 2014 - 8:41 am | चौकटराजा
टमरेल .....आँ .....?
7 Jul 2014 - 8:53 am | धन्या
असेल.
मात्र कवीच्या बोलण्यात डबडं हाच शब्द येतो नेहमी. ;)
7 Jul 2014 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे
पण हे बुवा चाकोरी सोडून (तिकडे) निघालेले नवकवी आहेत ना ! :)
7 Jul 2014 - 8:29 am | चौकटराजा
आता नाव बदलायला हवे .अत्रुप्त कुंथलगिरीकर ठेवावयास हवे.
7 Jul 2014 - 10:04 am | अत्रुप्त आत्मा
<<< चौजी कुंथा>>>
'तिकडचे' नाव घेऊन तुम्ही,'इकडल्या'त' मला गणता..
मनात भाव ऐहिक..तरी , आध्यात्मिक का म्हणता??? :p
7 Jul 2014 - 10:42 am | अधिराज
हि जिलेबी अगदीच कुंथुन कुंथुन पाडल्यासारखी वाटतीये.
7 Jul 2014 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा
जैसे असे मूळ पीठ,तैश्याची होती जिलब्या सु नीट! :p
7 Jul 2014 - 11:58 am | मदनबाण
फार त्रास होउन पाडलेली चकली... सॉरी सॉरी धागा दिसतोय ! {च्यामारी थोडा चावटपणा मी पण करुन घ्यावा म्हणतो ! ;)}
ढुश्श..-क्लेमर :-
आता सुरवातीलाच ढुश्श केल गेलयं तेव्हा यावर ४ ओळी खरडाव्या म्हणतो... तर या ढुश्श कॅटेकरीतल्या मंडळींचा त्रास ट्रेनच्या डब्यात {जो अगदी खचाखच भरलेला असतो} होतो आणि त्यावरुन त्या डब्यातल्या मंडळींचे रोचक संवाद कर्णपटलावर आदळण्यामुळे त्रासाची व्याप्ती कळुन येते.
संवाद १ } साला किधर किधर से आ जाते हय पता नय... इधर साँस लेने के लिये हवा नय और उपर से ये लोक बहोत तकलिफ देते हय !
संवाद २} नाकातले सगळे केस जळाले साले... अरे कोण आहे तो हरामी ?
संवाद ३} सुबह सुबह जाके आते नही और पुरा प्रेशर इधरीच को निकालते है कमिने... इनकी तो !
संवाद ४} मघासपासुन साला कोणतरी त्रास देतो आहे... मूळव्याध झाली पाहिजे साल्याला.इथे जीव जायची वेळ आली आता.
संवाद {टिपीकल मराठी} ५} या भय्यांच्या आईची टिंब टिंब ! साले आधीच राइच तेल लावुन येतात, त्यात मुळा खातात भो**चे.
संवाद ६}अरे भाई... कलसे जरा डियो का बोतल भी लाना,जरा तकलिफ कम जायेगी हम लोगों की ! {इथे समस्त डब्यात हश्या उडलेला असतो.}
संवाद ७} चला दादर आल ! सुटलो या नरकातुन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2
7 Jul 2014 - 12:10 pm | स्पा
कुन्ठुनी कुंथ्यात सारा , कुंथ माझा वेगळा
वा बुवा.. काय तुझी हि अभिरुची
7 Jul 2014 - 12:42 pm | बॅटमॅन
अगागागागागा, काय रे हे स्पांडू =)) _/\_ =))
7 Jul 2014 - 12:23 pm | बाबा पाटील
*lol* *lol* *lol* *yahoo*
7 Jul 2014 - 12:35 pm | बॅटमॅन
आधी होता साधा, कुंथून कुंथून झाला कुंथ्या |
त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना ;)
7 Jul 2014 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
@ या भय्यांच्या आईची टिंब टिंब ! साले आधीच राइच तेल लावुन येतात, त्यात मुळा खातात भो**चे.>>>.
@वा बुवा.. काय तुझी हि अभिरुची>>> *biggrin* तू गप रे हलकटा!
तुझी अभी रूची मला म्हैतीये!!!
7 Jul 2014 - 1:13 pm | धन्या
तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे तोडण्याचं कौशल्य लोकांनी दाद देण्यासारखं आहे. कदाचित लोक त्याची दाद देत असतीलही, राम जाणे. ;)
7 Jul 2014 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे तोडण्याचं कौशल्य>>> *biggrin* त्यामुळे सदर शब्दातील अर्थव्याप्ती अधिक लज्जतदार होते हो! *blum3*
अभी रूची... मंजे, चालू काळातील - (सदर व्यक्तिची) एक 'खास' आवड! *yahoo*
7 Jul 2014 - 2:22 pm | स्पा
कुंथता... हृदय हे....
7 Jul 2014 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाय, नाय... हा धागा "कुंथता उदर हे..." बद्दल हाय हे नज्रेस आणू इच्चितो. तेवा शिर्फ 'उदर'च देखो, इदर उदर मत देखो, क्या? ;)
7 Jul 2014 - 2:31 pm | स्पा
=))
7 Jul 2014 - 2:32 pm | प्यारे१
___/\___
7 Jul 2014 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट पांडूssssss
7 Jul 2014 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट पांडूssssss
7 Jul 2014 - 2:49 pm | बॅटमॅन
पुढची यमकबद्ध ओळ कुठेय ?????????????????
7 Jul 2014 - 2:51 pm | बॅटमॅन
'पांडुदंडमंडिता' ;)
7 Jul 2014 - 2:55 pm | सूड
>>'पांडुदंडमंडिता'
__/\__
7 Jul 2014 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा
हे घे खटुक =))
फट'खा ब्याटुक-हातोडी आत्मुक! *biggrin*
7 Jul 2014 - 1:06 pm | कंजूस
वेगळ्या चरांतले लेखन म्हणावे का याला ?मिसळपावच्या प्लैटफॉमचा उपयोग असाही होत आहे हे विशेष .वरती छप्पर ,चोवीस तास पाणी व कट्ट्यासाठी बाकडी आणि मोफत बत्ती .येवा फलाट आपलाच असा .
7 Jul 2014 - 4:09 pm | स्पंदना
खंप्लिट फिलॅट!!!
7 Jul 2014 - 4:18 pm | प्यारे१
सुपडा साफ!
7 Jul 2014 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा
असो....!
7 Jul 2014 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा
आणि .. धरली का वाफ! *biggrin*
इतक्यातच! *blum3*
7 Jul 2014 - 5:00 pm | प्रचेतस
कुंथणाऱ्या दांभिकांवर चांगलेच कोरडे ओढले आहेत.
7 Jul 2014 - 5:55 pm | धन्या
पण कुंथणार्या दांभिकांवर याचा काही परीणाम होईल असे वाटत नाही. त्यांची विचारांची झापडे गच्च बांधलेली असतात.
7 Jul 2014 - 6:07 pm | स्पा
तुम्हाला कुंथणारया दांभिकांची इतकी का पडलेली असते .. आपल्या आयुष्याचे तेच आद्य कार्य असल्यासारखे का मागे पडता , कुन्ठून्द्या कि तुमचे काय जाते .... :D
9 Jul 2014 - 1:47 pm | प्रचेतस
तुम्ही दांभिक आहात का?
नसलात तर दांभिकांची बाजू का घेत आहात?
9 Jul 2014 - 2:47 pm | चौकटराजा
दांभिक पणात एक नशा अस्तो .. मग दांभिकपणा कशाला लपविता..
पिउनी दंभास सार्या
दंभ माझा वेगळा
9 Jul 2014 - 3:29 pm | स्पा
आपल्या दयाळू माहितीसाठी मी कुठेही दांभिकांची बाजू घेतलेली नाही
जर दाम्भिकांवर काहीच फरक पडत नसेल तर वेळ का वाया घालवता असे म्हटलेले आहे
त्याच त्याच चर्चा वर्षानुवर्षे सुरु आहेत,नुसते अंतर्जालावर वाद घालून काहीही फरक पडणार नाही
9 Jul 2014 - 3:34 pm | बॅटमॅन
स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद घालून वैसेभी कुच्च्च नै होता (नै म्हणायला काश्मीर धोरण ठरवले जाते तेवढे सोडून). पण दांभिक लोकांची व्यर्थ पिरपिर सदानकदा सुरू असते इतके सांगायचे म्हटले तरीही लोक का उसळतात ते कळत नाही.
9 Jul 2014 - 3:38 pm | स्पा
मग चालू द्या .. तुम्हीही तेच बोलणार , समोरूनही तेच प्रतिसाद येणार, ह्याला अंत नाही.. कुठे थांबव हे ज्याचे त्याने ठरवावं नाहीतर आहेच ,तेच तेच
9 Jul 2014 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
असं कसं, असं कसं ???
मराठी जालावरूनच शिकवण घेऊन तर ओबामाभाऊ त्यांचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवतात अशी अंतर्गत गोटातली बातमी आहे *secret* (त्यामुळे ते बरेचदा चुकते हे वेगळे ;) )
9 Jul 2014 - 2:37 pm | धन्या
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।
असे समर्थांनीच म्हटले आहे.
9 Jul 2014 - 2:50 pm | प्रचेतस
अरे वा. तुम्ही पण दासबोध वाचलेला दिसतोय की. ;)
9 Jul 2014 - 3:19 pm | धन्या
घरी आहे मात्र पुर्ण वाचले नाही. कुणी "समर्थांनी अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटलं आहे" असं म्हटलं की ते संदर्भ वाचतो दासबोधात.
मनाचे श्लोक आवर्जून ऐकतो.
9 Jul 2014 - 3:03 pm | बॅटमॅन
पण
'आधी असलेला पाग्या' जो 'संतवचने रटून होतो वाघ्या' आणि त्यामुळे 'ज्याचा येळकोट रहात नाही' कारण 'मूळ स्वभाव जात नाही' अशा लोकांचे काय करायचे?
9 Jul 2014 - 3:17 pm | किसन शिंदे
हे अश्या पध्दतीने शहाणे करणार का रे धन्या? आणि समजा या सकळजनांना शहाणे व्हायचेच नसेल तर एवढा सगळा घाट कशाला?
सिरियस उत्तर अपेक्षित आहे!
9 Jul 2014 - 3:24 pm | बॅटमॅन
शहाणे करायची/करू पाहण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी. आणि समजा शहाणे व्हायचेच नसेल तरीही ते बिंबवत राहणे, कारण आज नै झाले ते उद्या होऊही शकते.
9 Jul 2014 - 3:37 pm | धन्या
पद्धत कशीही असो, विचारांनी टकरा दिल्या की त्यातून काहीतरी चांगलं हाती लागतंच. त्या धाग्यावर कुणीतरी एखादं सुंदर वाक्य, एखादा सुंदर परिच्छेद लिहून जातो. जो वाद घालणार्यांच्या लक्षात येत नाही मात्र बाकी वाचकांना जाणवतो.
उदाहरणार्थ असाच मी कुठेतरी वाद घालत असताना मुकवाचक त्या धाग्यावर तटस्थ राहिले. मात्र त्यांनी मला तीन खरडी लिहिल्या ज्यांनी मला विचार करायला भाग पाडले.
बुडती हे जन, न देखवे डोळा। म्हणूनि कळवळा येतो आहे || :)
आपल्या पूर्वसुरींनी हे केलं नसतं तर जग आजही मध्ययुगातच असतं. काही धागे हे निमित्त असतात. त्या धाग्यांच्या निमित्ताने आपले विचार मांडता येतात. प्रत्यक्ष चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते.
9 Jul 2014 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा
@चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते. >>> +++१११ सूक्ष्मपणे अंतर्मनावर संस्कार यातूनच होतात. माझा तर अनुभव असा..की विरोधी विचार ऐकत असतानाच,मला नेमकं खरं काय? हे जाणून घेण्याची ऊर्मी बळावली.आणि त्यातूनच मी आपल्या घाटपांडेकाकांचं-"जंयोतिषाकडे जाण्यापूर्वी!" हे पुस्तक वाचलं. पुढे सर्वच हिंदु(धर्म)विरोधी मतं वाचली...जो प्रवास आजही चालू आहे. :)
9 Jul 2014 - 9:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे बुवा... हे सगळे चलाख लोक चर्चा तुमच्या धाग्यापासून दूर भटकवत आहेत... *unknw*
आणि तुम्हीही चक्क तुमच्या पोटाचा गदारोळ विसरून त्या लोकांच्या गदरोळात भाग घेता आहात ??? *dirol*
9 Jul 2014 - 3:32 pm | स्पा
नुसते वाद घालून मजा बघणे "ह्याला शाहणे करून सोडणे" म्हणत नसावेत :)
9 Jul 2014 - 3:41 pm | धन्या
ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या या आक्षेपाच्या उत्तरासाठी हे किसन शिंदे यांना दिलेले उत्तर वाचा.
9 Jul 2014 - 3:56 pm | स्पा
तुमचा दृष्टीकोनही दिसून येतोच आहे.. २, ४ चांगले विचार मिळवण्यासाठी.. घाला वादावादी :)
तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो काही प्रश्न नाही
9 Jul 2014 - 4:02 pm | धन्या
थोडक्यात काय तर आम्ही सध्या बाकडयावर आहोत हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नाही. :)
9 Jul 2014 - 4:03 pm | स्पा
खिक्क
या निमित्ताने तुमच्या सोबत काफी पितापिता चर्चा झाडणाऱ्या तुमच्या मित्राची आठवण झाली
9 Jul 2014 - 4:05 pm | सूड
यू मीन दॅट ढवळ्या पवळ्या अॅन ऑल ?? ;)
7 Jul 2014 - 6:08 pm | सूड
दांभिकांवर ताशेरे ओढण्यास जाणे म्हणजे चिखलातल्या वराहासोबत खेळावयास जाण्याप्रमाणे आहे. आपण चिखलात लोळून येतो, वराह मजा घेतो ते निराळंच!!
7 Jul 2014 - 6:04 pm | अधिराज
हे कार्य सुकर होत नसेल तर संगीतोपचार अवश्य करून बघावा. उदाहरणादाखल खाली दिलेली गाणी आळवल्याने लाभ होउ शकतो.
१. आsssभी जाsss, आssssभी जाssss, ए ----- आ भी जा
२. आजा आजा मै हू प्यार तेरा, वल्ला वल्ला इंतजार तेरा
३. आयेगाss आयेगाss आयेगाss, आयेगा आनेवाला आयेगा
जाणकारांनी यादीत भर घालण्यास हरकत नाही.
9 Jul 2014 - 2:49 pm | सूड
कार्य अधिक सुकर झाल्यानंतरच्या काही भावना:
१) जिवलगाऽऽऽ राहिले रे दूर घर माझे..पाऊल थकले पोटामधले जड झाले ओझे!!
२) झाला साखरपुडा गं बाई थाटाचा....मऊ मऊ पुरणपोळ्या खाईन गं आणि वापर वाढेल बाई लोट्याचा
३) कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी...प्राणविसावा पैलतीरावरी अफाट वाहे मधी
9 Jul 2014 - 11:36 pm | स्वप्नांची राणी
सगळ्या कुंथलगिरीकर महाराजांसाठी हे फार उत्तम गाणं आहे..अवश्य लाभ घ्यावा...
http://www.youtube.com/watch?v=1u-6QMaKuSQ
10 Jul 2014 - 5:42 am | भीडस्त
आधी
कोई आनेवाला है जिया बेकरार मेरा जिया बेकरार
आजा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा
नंतर
तुम आ गये हो नूर आ गया है नहीं तो चरागोंसे लौ जा रही थी
एकदम apt.
9 Jul 2014 - 3:31 pm | प्रसाद गोडबोले
=))
9 Jul 2014 - 3:35 pm | प्यारे१
चालू द्या! :)
9 Jul 2014 - 3:48 pm | प्रसाद गोडबोले
काय चालु द्या ?
9 Jul 2014 - 3:50 pm | प्रसाद गोडबोले
काय चालु द्या ?
9 Jul 2014 - 3:57 pm | प्यारे१
जे चालू आहे तेच्च! होत नसेल तर आणखी काही उपाय करा.
(बोळे) मोकळे होणं मह्त्त्वाचं. तुंबलेत बिचारे! ;)
- ट्यार्पी शील
9 Jul 2014 - 4:02 pm | बॅटमॅन
स्वतःचे ते (आध्यात्मिक) विचार, दुसर्याचे ते बोळे. :)
9 Jul 2014 - 4:06 pm | प्यारे१
+१२३
स्वतःचे ते (तार्किक) विचार, दुसर्याच्या अंधश्रद्धा! :)
9 Jul 2014 - 4:11 pm | बॅटमॅन
अंधश्रद्धेला अंधश्रद्धाही म्हणू न देणे ही एक अंधश्रद्धाच. त्याला सेल्फराइचसपणे परेड करणे हे खरे तर मोठ्या अस्वस्थतेचे लक्षण. पण असो. 'जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो' असं ज्ञानेश्वर म्हणून गेलेलेच आहेत.
9 Jul 2014 - 4:12 pm | सूड
रती कशाला येईल वाढायला, बाकीचे वाढपी पाणक्ये कुठे गेले म्हणे? ;)
9 Jul 2014 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले
आणि रती वाढायला आली तर जेवण कोणाला जाईल ? *man_in_love*
9 Jul 2014 - 4:22 pm | बॅटमॅन
हम्म्म, तुमच्या बोलण्यात बिंदू आहे ओ प्रसादराव :D
9 Jul 2014 - 4:15 pm | प्यारे१
+१११ खरंच आहे. :)
आपल्याला दिसतं ते नि तेवढंच खरं मानणारांना लाल सलाम!
(बुवा, किती करायचेत?)
9 Jul 2014 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
@आपल्याला दिसतं ते नि तेवढंच खरं मानणारांना लाल सलाम!>>> स्वत:वरचे आरोप दुसय्रांना "अजुन" लावा! ;) मंजे मग "पाहिजे" तेव्हढे होतील. :p
9 Jul 2014 - 4:18 pm | बॅटमॅन
चार पुस्तके वाचून प्रचिती आल्याच्या थाटात आपल्याला सगळंच दिसतं असं मानून 'लाल' करणारांना त्याहीपेक्षा कडक सलाम!
9 Jul 2014 - 4:25 pm | प्यारे१
असेच म्हणतो! :)
(बुवा नि बॅट्या दोघांनाही)
9 Jul 2014 - 4:29 pm | बॅटमॅन
'हे तो प्रचितीचे बोलणे' या थाटात पैशाला पासरी संतवचने पेरून कोण प्रवचने देत बसते हे पाहिले तर लोकांना समजून येईलच म्हणा. :)
9 Jul 2014 - 4:40 pm | प्यारे१
आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी कुठले तरी!
ज्ञान ना तुम्हाला ना आम्हाला. दोन्हीकडं माहितीचा साठा. तुमचा फार मोठा, आमचा चार पुस्तकांचा. चालायचं!
असो!
@ सगळी गँग: आम्ही टैमप्लिस!