कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
6 Jul 2014 - 7:59 pm

ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही!
आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin*
................................

सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धडाधड आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या घरासमोरच्या वावरा'त पळत गेलो त्यातून आलेली ओलसर श्रद्धा अढळणारे, टराटर(मनास-मोकळे करणारे! *biggrin* ) आवाज न काढण्याची, तसा वात् प्रचार करु न देण्याची दडपशाहीची, बद्ध-कोष्ठाची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (सक्काळी ना...,{लागली नै तरी!}जायलाच हवे असे मत, का कशासाठी{असते}ते ठाऊक नसले तरी चालेल )...म्हणे!!! ;)

[*>>> कूंssssथुनी..वर्गा#त सार्‍या..वास माझा वेssगळा हे या तत्वाच्या लोकांचं जीवन सूत्रच!!!
#<--> इथे वर्ग या शब्दाचा अर्थ,सामाजिक..शालेय..जातीय असा आपापल्या मतीप्रमाणे हावा-तो घ्यावा.नंतर उगीच धागाकर्त्याच्या नावानी कुंथू नये! *biggrin* कारण कोणत्याही वर्गात काहिच अर्थ नसता,तर कुणी तरी त्यात-बसलं असतं का? ..असो!]

जुन्या कुंथीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच टारटूर/कूंन्थू..आणि घाई'ची लागणार्‍यांचा-हुतुतू..)असे बरेच वाSतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूSSSळा'कडे जाण्याची प्रेरणा{ढर्रढर्रढरढर...इथे नित्यानुभवाप्रमाणे, भस्सकन कॉक दाबून पाणी सोडल्याचा आवाज आला..} आणी कुंथुन कुंथुन करण्याचा प्रयत्न सर्व वावरां'मध्ये आढळतो. मी आणि मो.फोन, खादाडजग/बद्धकोष्ठी-सृष्टी कशी निर्माण झाली??? इ.इ. चा शोध मानवाने याच कक्षात सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात(भिंतींवर)आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे तिथल्या कार्य-क्रमाचाचा गाडा (सुळूक.सुळूक..)चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे विशेष-पटकन होण्यास मदत होते असे पाली,झुरळं इ.भयप्रद..व वर'च्या कक्षातून गळणारा ठिबक-सिंचनाचा पाऊस(मंजे-वरुन*) {*-म्हणून तो वरुण!..काय अगाध तर्कसंगती लागली...च्यामायला! *biggrin* }, आणि टाकिचे पाणि संपल्यावर नळातून येणारा(नुस्ताच)वारा इ. ना (पटकन होण्याच्या प्रांतातील)देव मानण्याची प्रथा सुरु झाली. बद्धकोष्ठमुक्ती औषधांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी (सर्वसाफ)नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'सांभाळण्या'चे काम सुरु होऊन त्यांना *च-कूपात{*-हा शब्द उघड वाचतांन्नाही अनेकांना अजुन अशौच-येतं..म्हणून फुली टाकली..क्षम-स्व! ;) ..) आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. त्यांचे हाती अनेक (विविक्षीत जागी) ऐनवेळी गुदगुल्या करवणारी अस्त्रे दिली गेली. आणि मग,(होइल की नाही???)या भितीपोटी त्यांची भक्ति सुरु झाली.

सुरुवातीला अस्सल परिणामी असलेले हे षड-तंत्र हळूहळू आलेल्या बर्‍याच नवरोगांमुळे टिकेचे लक्ष बनले.

काळाच्या ओघात टाइट झालेली आणि (काहिशी) सुटत आलेली,ढेरी इ. निकष मानून मजबूत केली गेलेली आतडीव्यवस्था ह्यांच्या-आतून,ढामढूमधडामधुडूम..आवाजी-मुख्य-कर्म आणि त्याचे कार्यस्थान असलेला परम-अर्थ सातत्याने पोट-कैदेत राहिला. सातत्याने होणारी खाद्यीय आक्रमणे,जिभेची गुलामगिरी,अकारण खाद्यार्थ-हिंसा(ए....कोण रे तो नॉनव्हेज खाणं..म्हणतोय!?), हार्ड वारूणी-करुणा यामुळे त्या पोटातील खाद्यात्मिक सूज आलेला स'माज,खर्‍या (प्रातःकालीन)परमार्थापासून सतत वंचितच राहिला.

याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच चिकटलेले आणि कधीही पटकन न होऊ-देणारे भ्रम (इल्यूजन){इथे..लूजमोशन का ऐकू आलां रां*&%चं .. ;) ..),प्रमाद(भका/भका खाण्याचा स्वभाव), करणापटव* (लिमिटेशन्स){*लोकहो..हे एरंडेल तेलासारखं बुळ्ळुक्कन बाहेर काढणारं..एखादं आयुर्वेदीक औषध असावं का?}, विप्रलिप्सा* (लोभीपणा){*-लोकहो,मला हे(पण) ,एरंडेला'सारखच जागा-मोकळी करणारं,कागद-सुरनळी-मयुरपिसाराफुलवासन..तंत्रातलं..औषध वाटतं!...आपल्याला काय वाटतं??? =)) } हे केवळ कल्पनेनी कळणारे-तदोष्ठशोषात्मक-दोष आपल्याला आपल्या त्या मूळ जागेचा ठाव घेण्यास सहाय्य तर करतातच पण त्यातही एखाद्या खाद्यविरोधी-वर्णाच्या अहंकारापोटी इतर समाजाला तसा अभास मिळण्यापासूनही वंचित-खुर्चीत* ठेऊ शकतात.{*--हे आसन भा'रतीय नाही,म्हणून संस्कृतीप्रेमी-आध्यात्मिक लोक..त्याचाही कचकाऊन निषेध करतात म्हणे..कै कै वेळेला..त्या'च्यावरच-बसायची वेळ आलेली असतांन्नाही!...असो!}

असा कुंथित, सगळ्यांपासून लांम(ब), मोकळे होण्यात-लाचार,सांस्कृतीक लेंग्याच्या नाडीनी अवळला गेलेला, स्व-तंत्र वात्-प्रचार न करु शकणारा{मंजे *सक्या सोडणारा..खराखुरा दांभिक) समाज आहारतज्ञांच्या आहारी गेला तर नवल काय? तिथे..आत-गेल्यावर निरिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची भित्ती-मनोरंजनाची साधने नाहीत, गळणारी डबडी नाहीत, खिडकीग्रंथ मिळालाच तर पाहाण्यापलिकडे आणि वरवर वाचना पलिकडे त्यातला-कूटार्थ कळत नाही अशा---परिस्थितीत* करणार काय?{*सांगा..सांगा...काय??????...} तेव्हा...हे-सगळे भाकड-सुरु झाले. रुपके ऐकताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरु'पणकार,{या विषयी अधिक खुलासा,व्य.नि.तून मिळेल..कृपया इथे छळून त्या उन्मनी अवस्थेचा बेरंग करू नये!} Kee'र्तनकार{मंजे,ज्यांना यात..सॉरी यातली,चावी-मिळालेली आहे,,ते!} देखील (त्याच) त्या अत्यावश्यक गोष्टी रंगवून रंगवून सांगू लागले आणि त्या ऐकून भस्सकन झाल्या'सारखा नि'श्वास टाकला गेला...

खरे तर (यात)वावरा'त-बसणार्‍या व्यक्तिंनुसार,आणि या व्याधितल्या भ्रातृ'वर्गा*नुसार{*वर्गा'चा अर्थ सुरवातीला विशिदिलेला आहेच!} फरक करणे अपेक्षित आहे. खाद्यांन्नांची आणि खादाडीची मांडणी खरे तर ८०% कडक-स्वयंपाक-कांड, १६% व्यायामोपासना आणि ४% ध्यान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा खर्‍या खाद्यांन्नांची माहिती नसलेला असा आहे. त्यांना नेमाने, काहीतरी चांगले खायला मिळेल असे आमिष दाखवून,नायतर अपचन होईल.. अशी भीती घालून प्राचीन खादाडीकडे वळवणे त्यांच्याकडून काही खाद्यान्नयज्ञ, खाद्यव्रते, दंभोSपास, असे काहीतरी करवून एक पुरावा मागितला..तरी फुटवता येईल अशा परिस्थितीत आणणे हे असल्याकर्मकांड्यां'चे मुख्य काम(असते.) त्यानंतर त्यातील-(उपासनेनी)वाकलेल्या लोकांना (सुटकेची आशा दाखवून)दिलेले काम,(इच्छाविरोधी)पंथ पूजन, मजा न येणारी-पूजा ही(असली-नकली :-/ ..)उपासना आणि त्यानंतर त्यांनाच पिळायचे कुभांड.. असे(दिव्य..यात) अपेक्षित आहे.(असते.)

२१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची सा'मान्य खाद्यभक्तांत आलेली क्षमता यामुळे या असल्या योग्यांना..पुराणातल्या गोष्टी /वानग्या नित्य (आजही..)व्यवहारात याव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे (जातकांवर टाकायचे..) टप्पे आहेत आणि ते अत्यंत अर्क*शुद्ध आहेत हेही (आपण)समजून घेतले(च) पाहिजे. {*अर्कशुद्ध म्हणायचे..कारण हव्या त्या समर्थनीय स्तराला जाणारे,यांच्या इतके या प्रांतांमधले जे ,त्यांना..अर्क'चम्हणायला हवे..त्याशिवाय कैसी शुद्धता??? नै का!?..असो!}

खादाडांन्नो जपून खा'हो। स्व'धर्म वेळेवर होवो। जो जे..पचवील तो ते खावो। (मग..)तुमचं काय जाssतं??? ॥ :p . :p . :p

संस्कृतीधर्मविडंबनसमाजजीवनमानमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 4:51 pm | बॅटमॅन

कमीतकमी डोकं वापरायला तरी आम्ही प्रतिबंध करत नाही, पण त्याला प्रतिबंध होणार असेल तर पुस्तके चार असोत नैतर फार, अंधश्रद्धाळूपणा काही जाणार नाही. शेवटी भोंदूंची दुकाने आमच्या ओरडीमुळे बंद होण्याइतकी आमची पावर नाही हे माहितीच आहे ओ, पण त्यामुळे समोरच्याचा मार्ग हा डोके बंद करायला शिकवतो इतके दाखवले तरी लोक पिसाळतात. स्वतःच्या अंधश्रद्ध विचारांना संतवचनांचा मुलामा लावल्यामुळे आपली वैचारिक बेइमानी झाकली जाते अशा भ्रमात कुणी राहू नये इतकेच जमेल तेव्हा आहे. आवाज किती क्षीण आहे याचा त्याच्या सत्यासत्यतेशी संबंध नसतो.

तेव्हा चालूद्या. :)

प्यारे१'s picture

9 Jul 2014 - 5:00 pm | प्यारे१

अहो डोळे उघडून बघण्याचा उद्देश नेमका काय आहे ते समजायला हवं की!

तुम्हाला जनतेला 'सत्य' दाखवायचं असतं ते कोणत्या प्रकारे दाखवताय त्यावर अवलंबून आहे की बरंच. उगा ह्या ह्या काळी हे हे लोक अशा अशा प्रकारे वागत होते हे सत्य जनतेला दाखवून त्यातून कुणाचाच फायदा होत नसेल किंबहुना असलेल्यांच्या श्रद्धा मोडकळीस येत असतील तर त्यात तथ्य ते किती? उकीरडा सगळ्यांकडेच असतो. घरात कमी असेल पण असतो. (केराची बादली) पण म्हणून उकीरडा झाकायचा की उघडा पाडायचा हे सत्यान्वेषणाच्या नादात समजणं किंवा उमजणं हे जास्त उपयुक्त.

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 5:07 pm | बॅटमॅन

घरात कमी असेल पण असतो. (केराची बादली) पण म्हणून उकीरडा झाकायचा की उघडा पाडायचा हे सत्यान्वेषणाच्या नादात समजणं किंवा उमजणं हे जास्त उपयुक्त.

चला, उकिरडा आहे हे कबूल केलंत हेही नसे थोडके. आता उकिरडा झाकण्याने कुणाचा नक्की काय फायदा होतो म्हणे? घरात कचरा साठला असेल तर तो कार्पेटखाली किती दिवस सारणार? त्याचा मोठा ढिगारा होऊन असह्य वास मारून, अळ्या-किडे होईपर्यंत वाट पाहणार की थोडासा कचरा असताना तो साफ करायला शिकवणार हे समजणं महत्त्वाचं. साफसफाईचं शिक्षण दिल्यास उकिरडा स्वच्छ होईल आणि त्यावर आधारलेले दुकान नष्ट होईल असं वाटत असेल तर एक व्यावसायिक भावना (काँपिटिशनचा तिरस्कार इ.इ.) म्हणून त्याला मी समजू शकतो, मात्र 'चिंता करितो विश्वाची' छाप आव असलेल्यांना त्यानं फरक का पडावा हे समजत नाही.

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार असतो. त्याला जास्त ताणून चालत नाही.

कचरा एका विशिष्ट खोलीमध्ये असेल तर तो तिथं तेवढ्यापुरता जमा होणं हे काळानुरुप होत असते. पण कचरा काढायच्या नादात सगळंच गुंडाळा नि फेकून द्या ह्या गोष्टीला विरोध होता, आहे नि राहील. त्याउप्पर आज जी गोष्ट कचरा म्हणून वाटत आहे ती गोष्ट पूर्वी कधीतरी उपयुक्त होती नि ती वापरात होती, तिला आजच्या काळानुसार मोजून मापून कचरा म्हणून तिचा कचरा करणं कधीच शहाणपणा ठरणार नाही.

असो!

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार असतो. त्याला जास्त ताणून चालत नाही.

दिलेली अ‍ॅनॉलॉजी उलटली की असा सोयीस्कर बचाव सुरू होतो, पण तेवढा रडीचा डाव चालायचाच.

पण कचरा काढायच्या नादात सगळंच गुंडाळा नि फेकून द्या ह्या गोष्टीला विरोध होता, आहे नि राहील.

ज्योतिषादि कचर्‍याला हात घातल्याने हिंदूधर्माचा सगळाच गुंडाळा फेकायला निघालोत हा तुफ्फान विनोदी जावईशोध लावल्याबद्दल प्रथम अभिनंदन. स्वच्छतेचा मनापासून कंटाळा असला, की एक कपटा उचलला तरी नको नको चा धोशा सुरू होतो.

त्याउप्पर आज जी गोष्ट कचरा म्हणून वाटत आहे ती गोष्ट पूर्वी कधीतरी उपयुक्त होती नि ती वापरात होती, तिला आजच्या काळानुसार मोजून मापून कचरा म्हणून तिचा कचरा करणं कधीच शहाणपणा ठरणार नाही.

सर्व समाजसुधारकांनी याप्रमाणे आचरण केले असते तर सतीप्रथा, बालविवाह, विधवांचे केशवपन, जातिभेद -एक ना अनेक प्रथा आजही चालू राहिल्या असत्या. सगळे समाजसुधारक किंवा लिखाणातून मूर्खपणावर कोरडे ओढणारे तुमचे लाडके संतही या बाबतीत मग शहाणे ठरणारच नाहीत. 'नवसे पोरे होती तरी कासया लागे पती' म्हणणारे तुकोबा नैतर 'तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी' असे रोखठोकपणे सांगणारे गाडगेबाबाही तुमच्या लेखी मूर्खच असतील, नै?

जराही बदलायची नावड हेच या प्रतिसादाचे मूळ आहे. समाजाच्या आळशी आणि झापडं लावून बसलेल्या मनोवृत्तीची उत्तम झलक तुमच्या प्रतिसादातून आयतीच दाखवल्याबद्दल धन्यवाद. :)

प्यारे१'s picture

9 Jul 2014 - 6:35 pm | प्यारे१

गोळ्या झाडायला हरकत नाही. एकही लागलेली नाही. कारण अशा प्रकारचा माझा एकही प्रतिसाद नाही.

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 6:37 pm | बॅटमॅन

मंत्रसामर्थ्य आणि ज्योतिषाबद्दलची चर्चा सुरू होती तेव्हाचे तुमचे प्रतिसाद बोलके आहेत. असो.

प्यारे१'s picture

9 Jul 2014 - 6:49 pm | प्यारे१

मंत्र सामर्थ्य आहेच.
त्याला तू अंधश्रद्धा म्हणायला काहीही हरकत नाही.
त्याउप्पर मंत्रांचं काम हरवलेल्या वस्तू शोधून द्यायचं नसतं हे तिथंही लिहीलेलं आहे.
बाकी ज्योतिषा च्या समर्थनाबद्दल एकही प्रतिसाद दिलेला नाही. असल्यास शोधून द्या.

इन्क्रिमेण्ट झाली का? ;)

प्यारे१'s picture

9 Jul 2014 - 6:49 pm | प्यारे१

मंत्र सामर्थ्य आहेच.
त्याला तू अंधश्रद्धा म्हणायला काहीही हरकत नाही.
त्याउप्पर मंत्रांचं काम हरवलेल्या वस्तू शोधून द्यायचं नसतं हे तिथंही लिहीलेलं आहे.
बाकी ज्योतिषा च्या समर्थनाबद्दल एकही प्रतिसाद दिलेला नाही. असल्यास शोधून द्या.

इन्क्रिमेण्ट झाली का? ;)

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 6:58 pm | बॅटमॅन

इन्क्रिमेण्ट झाली का?

उकिरडा दाखवल्याबद्दल धन्यवाद. :) कमरेखालच्या प्रवासाला शुभेच्छा!

योग्य मुद्दे संपल्यानंतर उठताबसता अध्यात्म तोंडी लावणार्‍यांची झेपही शेवटी इन्क्रिमेंटसारख्या भौतिक गोष्टीपर्यंतच गेल्याचे पाहून 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या म्हणीचे रोकडे प्रत्यंतर आले. मनातला हा उकिरडा साफ करण्यासाठी देव तुम्हांला सुबुद्धी देवो. :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2014 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा

@मंत्र सामर्थ्य आहेच.>>> होय ना? द्या बरं एखादं उदाहरण.. आणि मंत्रसामर्थ्य, म्हणजे "तुंम्हाला" काय वाटतं? ते ही सांगा.
.
.
.
मालाही कळेल. ;)

प्यारे१'s picture

10 Jul 2014 - 12:23 pm | प्यारे१

:)

धन्या's picture

9 Jul 2014 - 5:19 pm | धन्या

उकिरडा किती दिवस झाकून ठेवणार. आज ना उद्या त्याची दुर्गंधी येणारच. त्यापेक्षा उकिरडा आहे हे वास्तव स्विकारुन जेव्हढया लवकर साफसफाई होईल तेव्हढं उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2014 - 5:40 pm | प्रसाद गोडबोले

जेव्हढया लवकर साफसफाई होईल तेव्हढं उत्तम.

ह्यावरुन एक श्लोक आठवला !

पाटातील तुंब निघेना | तरी मग पाणीच चलेना |
तैसे जनांचिये मना | कळले पाहिजे || -दासबोध समास २७ दशक १७ श्लोक ३३३

अर्र्रे, परत एकदा रेफरन्स चुकला :ड

प्यारे१'s picture

9 Jul 2014 - 4:41 pm | प्यारे१

आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी कुठले तरी!
ज्ञान ना तुम्हाला ना आम्हाला. दोन्हीकडं माहितीचा साठा. तुमचा फार मोठा, आमचा चार पुस्तकांचा. चालायचं!

असो!
@ सगळी गँग: आम्ही टैमप्लिस!

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2014 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा || असं समर्थांनी लिहुन ठेवलय दासबोधात दशक २१वा समास ११ वा ...श्लोक क्र. १०८ *biggrin*

अरेरे ... रेफरन्स चुकला तुकारामबुवांनी लिहुन ठेवलय ... कुठेतरी.... *lol*

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2014 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा

आजही हापिसात काम नाही वाटतं!!!? :D

नाखु's picture

10 Jul 2014 - 9:53 am | नाखु

तुमचा हा "त्रिफळा"(चूर्ण) लेख आहे.
ज्याला जसा पाहीजे तसा समजू द्या काय?
काही अडचणीलाच त्रिफळा"(चूर्ण) घेतात तर काही सवयीने.
शेवटी मोकळे होण्याशी मतलब.

पैसा's picture

9 Jul 2014 - 4:47 pm | पैसा

बुवांच्या इतक्या गंभीर धाग्यावर इतके अवांतर विनोदी प्रतिसद पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटलि!

वरीलवाक्यातलेशब्दवेगवेगळेलिहिल्यानेहाप्रतिसादफाऊलधरण्यातयेतआहे.

स्पा's picture

9 Jul 2014 - 6:38 pm | स्पा

१००

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2014 - 10:35 am | प्रसाद गोडबोले

मिपावरील काथ्याकुट/धाग्यांमध्ये मधे बर्‍याचदा कोणीतरी एक बॅटींग करत असतो अन कोणीतरी बॉलिंग अन बाकीचे फील्डींग लाऊन बसलेले असतात असा क्रिकेटचा सामना बर्‍याचदा पहाय्ला मिळालाय , कधीकधी दोन कंपु मिळुन मिळाला चान्स की हाण प्रतिसाद असा फुटबॉलचा सामनाही पहायला मिळालाय ....
पण ह्या इथे मिपा धाग्यावर "मधलं माकड" हा शुध्द भारतीय खेळ चाललाय हे पाहुन एक मिपाकर म्हणुन अभिमान वाटला =))

बुवांच्या इतक्या गंभीर धाग्यावर इतके अवांतर विनोदी प्रतिसद पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटलि!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2014 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

*mosking* *pleasantry*