विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
27 Aug 2014 - 12:31 am

भाग-१३
मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प!
=============

समाजविरंगुळा

वर्धमान ते महावीर

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
26 Aug 2014 - 11:46 pm

सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

कथासमाजजीवनमानप्रवासविचारआस्वादलेखविरंगुळा

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
19 Aug 2014 - 2:30 pm

नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.

या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ठिकाणकलाजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 8:58 pm

१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव".
२. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला.
३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले.
४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले.
५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं.

बालकथाविडंबनविरंगुळा

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 11:42 am

ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही.
प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती.
शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती)

जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन.

धर्मवाङ्मयमुक्तकविनोदजीवनमानप्रवासअर्थकारणशिक्षणमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छासमीक्षाअनुभवसंदर्भप्रश्नोत्तरेप्रतिभाविरंगुळा

मेरा नाम करेगा रोशन .....

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 12:20 am

शाळेतील दिवस म्हणजे गोल्डन मेमरीज असतात.शाळेतील प्रत्येक दिवस म्हणजे एक मजाच असायची.शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.पण खोड्या काढण्याची मजा काही वेगळीच असते.

मौजमजाविरंगुळा

फेकूचंद...

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
7 Aug 2014 - 4:05 pm

आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कुणी ना कुणीतरी फेकूचंद उर्फ थापाडया भेटलेला असतो. मग तो ग्रुपमधला असू शकतो/शकते, ऑफीसमधला किंवा नातेवाईकांमधे पण असू शकतो/शकते.(आपण पण आयुष्यात कधीतरी फेकूगीरी केलेली असतेच. खोटं का बोला!) पण काही लोकांना सतत थापा मारायची सवयच असते. अशा लोकांना आम्ही "बंदुक्या" किंवा "ठ्ठो " असे चिडवायचो.
काही काही थापा मात्र कायम लक्षात रहातात. आमच्या ऑफीसमध्ये असाच एक बंदुक्या होता. आमच्या साहेबाचा पी.ए.! साउथ इंडीयन होता. आपण त्याचे नाव अय्यर होते असे समजू. (खरे नाव देत नाही.)

विनोदविरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
3 Aug 2014 - 11:50 pm

http://misalpav.com/node/28048 >>>
आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही
............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ
गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!!
असा टाइम'बॉम्ब उडवतो...
मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============

संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

हवा हवाई

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
2 Aug 2014 - 11:18 pm

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर
अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो.

खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो. काहितरी अघटित घडले असावे असे समजुन प्रेक्षक आपल्या खुर्चीवर अधिक सावधान होवुन संपूर्ण लक्ष पडद्यावर लावुन बसतात.

बालकथाजीवनमानचित्रपटआस्वादशिफारसविरंगुळा

पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
1 Aug 2014 - 9:59 pm

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
गीतः-सौमित्र
================

समाजजीवनमानविरंगुळा