विरंगुळा

अक्कलदाढ - एक काढणे

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 1:28 am

सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा...

अक्कलदाढ - एक काढणे

विनोदप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

हरवले ते गवसले का? व कसे? भाग 7 किस्सा चोराला धोपटल्याचा...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 11:37 pm

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.

मौजमजाअनुभवविरंगुळा

मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 7:40 pm

हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?

हे ठिकाणसमाजजीवनमानमाहितीविरंगुळा

रस्ता - रस्सा

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
24 Jul 2014 - 9:15 pm

दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले ..
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ...
आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य ..
तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही"
तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे)

(प्रोक्षण - प्रक्षोण)
Continental - Contentinental

असो

कटी पतंग

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
23 Jul 2014 - 1:18 pm

तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली.

कथामौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

धाग्याचे नामकरण

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jul 2014 - 1:06 pm

आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली.
अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'एकोळी'
'जिलबी'
'पाटी'
एत्यादी
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

स्फूर्ती - साभार इथे पहा

रश्श्याचे नामकरण

भिंगरी's picture
भिंगरी in काथ्याकूट
23 Jul 2014 - 12:33 am

आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला.
अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'अंगापुरता रस्सा'
'थपथपित
'दाटसर'
'जाडसर'
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 4:30 pm

मांडणीविरंगुळा

शब्द छटा - देणे - एक कला... भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Jul 2014 - 12:48 am

*scratch_one-s_head*

मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!

देणे - एक कला...

अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते.
देणे ही एक कला म्हणून पाहू जाता -

शब्दक्रीडाविरंगुळा

शब्द छटा - खडा भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Jul 2014 - 12:38 am

मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!

शब्दक्रीडाविरंगुळा