१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
पृथ्वीचा अंत १६ मार्च २२८० साली झाला. अनेक वर्षे पृथ्वीवरील खगोलशास्त्रज्ञ एका महाप्रचंड उल्केवर नजर ठेवून होते आणि ३ मैल व्यास असलेली (१९५०-डीए असे नामकरण केलेली) ही उल्का वरील दिवशी पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज होता. १९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ जशी येऊ लागली तसे तिचा पृष्ठभाग खरवडण्याचे प्रयत्न व तिचा मार्ग बदलावा, अश्या हेतूने पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता. परंतु उल्केचे दोन तुकडे होऊन, छोटा पाचरीसारखा तुकड्याने पृथ्वीचा कपचा उडवला, मोठ्या तुकड्याने आपल्याबरोबरच चंद्रसुद्धा नष्ट केला, लहान कपच्याचा मिळालेल्या गतिज ऊर्जेमुळे, ३२ कि मी व्यासाचा, ४१२ कि मी पृथ्वीपासून दूर लघुउपग्रह झाला, आश्चर्यकारकरित्या तिथे जुन्या पृथ्वीसारखी जीवसृष्टीपोषक परिस्थिती राहिली, व त्या लघुग्रहवर त्याच्या ६ मिनिटाच्या परिभ्रमणा वेगामुळे, होणार्या सेंट्रीपीतळ ऊर्जेमुळे, गुरुत्वाकर्षणसदृश स्थिती आली. उल्केच्या धक्क्यामुळे मात्र, पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली, वनस्पती सर्वं नष्ट झाल्या तर काही प्राणी वाचले, भूगर्भातील सूक्ष्म वेगाने सरकणारे महाकाय खडक (प्लेट्स), अस्थिर होऊन ऐक विचित्र संरचना निर्माण झाली.
इतिहासचे क्लोक रिसेट झाले, २२८० पासून नवीन सिविल इतिहासच नवीन मानवास माहिती राहिला. बाकी सगळे विस्मृतीत गेलं.
लघुग्रहावर मात्र जवळ जवळ (९९.९९९ टक्के) मानवांसारखीच, पण अतिप्रगत तंत्राद्यान बाळगणाऱ्या परग्रहावरील इवांची वसाहत झाली. त्वचेचा निळसर रंग सोडला तर मानव व इवात जीवशास्त्रानुसार कोणताही फरक नव्हता, दोघांमध्ये अगदी रक्तदान ते ऑर्गनट्रान्सप्लांट काहीही करता येवू शकत होते. ते स्वतः च्या लघुगृहाला उप्सला (मातृभूमी) व पृथ्वीला अस्लुग (शुद्रभूमी) म्हणायचे. पृथ्वीवरील खनिजे मिळवणे व वसाहतीमधील rdioactive कचरा पृथ्वीवर डम्प करणे यासाठी त्यांनी शुद्र मानवांना कामावर ठेवलं होत, त्याबदल्यात मानवांना अन्न मिळे व अनेक रोबोकडून पृथ्वीवर प्रशासन ठेवण्यात येत. सन २३१४ मध्ये, अस्लुग-सेक्टर ४ मध्ये, वैमानिक कप्तान परशुराम, हा ऐक देखणा राजबिंडा अधिकारी नियुक्तीत होता, परशुराम हा ऐक बुद्धिमान, आणि धाडसी, सचोटीने कार्य सिद्धीस नेणारा अधिकारी होता, तरुण वयातच अनुभवाच्या जोरावर त्याने, ट्रान्सपोर्ट चेन ऑप्सवर प्रभुत्व मिळवून, यानातून, कमी इंधनात जास्त खनिजे वाहून नेण्याचे शास्त्र प्रकाशित केलेले असते, म्हणूनच कि काय, त्याला उप्सला-फेडरेशनकडून हायकमांडकडून सूचना मिळाली होती कि, उप्सला-फेडरेशनचे ऐक मात्तबर गोरोंग यांची कन्या, गोमेरी हिला, तिच्या ऑप्सरिसर्च च्या प्रयोगासाठी सह्हाय करावे. खरे तर गोरोंग यांचा, गोमेरीने पृथ्वी सारख्या धोकादायक ठिकाणी जाऊन रिसर्च करणे पसंत नसते, पण एकुलत्या ऐक कन्येच्या हट्टापुढे त्यांना नमते घ्यावे लागते. म्हणूनच ते तिला १० दिवसांची परवानगी देतात. पुढं व्हायचं तेच होत, तरुण गोमेरी, परशुरामवर भाळते, तोहि तिला आपले हृद्य देवून बसतो.
गोमेरी घरी गेल्यावर वडिलांना, परिस्थितीची कल्पना देते, वडील रागावतात, ते तिला म्हणतात, "पहा, तरीच मी म्हणालो होतो, हे मांस खाणारे पृथ्वीवरची लोक, डोकं गरम असतं त्यांचं, अगोदरच कळायला पाहिजे होतं तुला, त्यांनी तुला फूस लावली ..." वै. वै . ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश वडिलांनी तिच्या दादाला देतात.
इकडे पृथ्वीवर, परशुरामच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपला मुलगा उप्सला चा जावई होणार आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! परशुरामचे वडील त्रागा करत म्हणाले, सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पृथ्वीवरचे पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या पृथ्वीवरच्या माणसाशीच! अरे ती सेक्टर २ मधली शबाना आहे न, चांगली माइन सुपरवाईसर आहे, किंवा ती सेक्टर १ मधली मप्न्ग्वा आहे. हि काय अवदसा आठवली तुला. अरे मानव व इवात कधीहि संबंध जुळू शकत नाहीत जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! "
ऐके दिवशी परशुरामच्या स्क्रीनवर संदेश झळकतो, 'आज मला International Space Station ग्रगोन २१४ वर UTC-२३१५ वाजता भेटायला ये ' . . गोमेरी
एवढे बोलून वेताळ थांबला. विक्रमाने त्याचे उर्वरित उत्तर ऐकण्यासाठी कान टवकारले. वेताळ पुढे म्हणाला, "राजन् ! तू मौन बाळगलंस. त्याबरोबर मी तुला हि गोष्ट सांगून शेवटी कूट प्रश्न विचारत आहे आणि उत्तरांचे पर्याय देत आहे, उत्तर येत असूनही गप्प राहिलास तर तुझ्या डोक्याची हजारो शकले होतील.
बरोबर उत्तर दिलेस तर १० करोडचा मी साईन करून इथे ठेवलेला चेक तुझा होईल"
१. गोमेरी चा भाऊ, परशुरामाला ग्रगोन २१४, फसवून बोलावेल, मित्रांच्या सह्हायाने त्याला हालहाल करून, International Space Station गळफास लाऊन लटकावेल
२. इवांची कोर-कमिटी दोघांनाही मृत्युदंड फर्मावेल, (प्लानेटच्या रीतीबाहेर जाऊन वर्तन केल्याबद्दल ) , व परशुरामाच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल
३. परशुराम-गोमेरी आकाशगंगे बाहेर पळून जाऊन लग्न करतील, इवांची कोर-कमिटी , गोमेरीच्या भावाला , त्या दोघांना शोधून, इवांची प्रतिष्ठा कमी केल्याबद्दल शासन करायला सांगतील
४. कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगात असून , त्यानुसार वर्तन करतील.
काही प्रतिक्रिया व्यक्त न करता विक्रमादित्य तसाच विचार करत राहिला, आणि उत्तरला …
प्रतिक्रिया
30 Jun 2014 - 5:47 pm | पगला गजोधर
४. कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगात आहोत याचे भान ठेऊन, त्यानुसार वर्तन करतील.
2 Jul 2014 - 12:11 am | काळा पहाड
२२८०-२२४३=३७ वर्षे. म्हणजे ही उल्का ३८०००*२४*३६०*३७=१२,१४७,८४०,००० मैल म्हणजे १२+ बिलियन मैल अंतरावरून सतत दिसत होती? उल्का? (टीपः सूर्यापासून पृथ्वीचं अंतरः ९२,९३५,७०० मैल अर्थात अंदाजे ९३ मिलियन मैल)
3 Jul 2014 - 9:41 am | पगला गजोधर
कालापहाड काका, मी उल्केच्या अंतराळातील प्रवासाच्या वेगाचा (Traveling Velocity) कुठेही उल्लेख केलेला नाही, (ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज impact velocity बाबत होता. आणि ह्या वाक्याबद्दल तुम्ही बोलत असावा कदाचित, चू भू दे घे )
तर (पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेरील, अवकाशात तरंगणारे स्थिर ऑब्जेक्ट्स सुद्धा, एकदा का गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आले कि ते पृथ्वीवर आदळतात तेव्हा त्यांचा आदळण्याचा वेग (impact velocity), Gravitetional Acceleration मुळे कैक मैल प्रती तास, असू शकतो.
बाकी तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !
3 Jul 2014 - 3:47 am | भृशुंडी
जमलं नाही.
3 Jul 2014 - 9:41 am | पगला गजोधर
भृशुंडीतात्या,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !
6 Jul 2014 - 2:57 pm | नगरीनिरंजन
कथा वाचून तिचे नाव "आपण सारे चक्रम" असे का नाही असे वाटले.
अशुद्ध लेखनातून वाट काढत अर्थ समजून घ्यायची कसरत वाचकांना करावी लागेल इतका पगला लेखक असू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
पण असो.
जे काय लिहीलंय त्याचा अर्थ लावून झाल्यावर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय १ जास्त वास्तविक वाटतो.
6 Jul 2014 - 3:08 pm | एस
नक्की?
6 Jul 2014 - 7:13 pm | तुमचा अभिषेक
13689 वाचने
७ प्रतिसाद ???
माझ्याकडे वाचने चुकीची दिसताहेत का?
कथेबद्दल बोलायचे झाल्यास, ते लोक काय करतील हे आपल्याला कसे सांगता येईल? आपण त्यांच्या जागी आहोत असा विचार करायचा आहे का? आणि मग नक्की कोणाच्या जागी? तसेही तांत्रिक गोष्टींनीच डोक्याचा जास्त भुगा केला आणि शेवटी निघाले वेगळेच :(
6 Jul 2014 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
13689 वाचने... ७ प्रतिसाद ???
ती उल्का मिपाच्या काउंटरवर आदळण्याने झालेला परिणाम असावा !
10 Jul 2014 - 6:25 pm | चौकटराजा
ती वाचने सांगली हून पुण्यात आल्याने वाढलीयत.
11 Jul 2014 - 10:04 am | पगला गजोधर
नाय हो राजे, ती वाचने, खुप्प खुप्प काळापूर्वी, कॉकेषस पर्वतरांगातून सिंधूभूमीत आल्याने, वाढलीत !
7 Jul 2014 - 9:32 am | पगला गजोधर
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला आसता ? व का ? हे जाणून घ्यायला उत्सुक आहे !
7 Jul 2014 - 10:09 am | भिंगरी
कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगत असून,त्यानुसार वर्तन करतील
मग आपण कशाला बोलून डोक्याची १०० शकले करून घ्यायची?
7 Jul 2014 - 12:16 pm | मराठी कथालेखक
सन २३१४ म्हणजे २४ वे शतक २३ वे नव्हे !!
बाकि तुम्ही काहीतरी काल्पनिक/विज्ञानकथा लिहीत आहात, त्यात वाचकांस प्रश्न विचारायचे प्रयोजन कळत नाही. खरेतर ही कथाच हवी ओढून ताणून काथ्याकूट का केला ते समजत नाही. आणि प्रश्न विचारायचाच तर तो ओपन क्वेश्चन राहू द्यायचा ना, चार पर्याय देवून वाचकाने त्यातूनच एक निवडावा हा हट्ट का ? वाचकांना त्यांची कल्पनाशक्ती लढवू द्या ना.
माझ्या मते गोमेरीचा बाप , भाऊ ई संगणक तसेच आधूनिक यंत्र ई. च्या सहाय्याने गोमेरी च्या मेंदूंतून परशूरामाच्या भेटीच्या स्मृती अलगद नाहीशा करतील. गोमेरीच्या सर्व हार्मोन्स आणि जीन्सचा कसून अभ्यास केला जाईल आणि पुन्हा ती कुणा मानवाच्या प्रेमात पडू नये याकरिता तिच्या जीन्स व हार्मोन्स मध्ये आवश्यक ते बदल केले जातील. तसेच राजनैतिक दबाव वापरुन पृथ्वीवरील अधिकार्यांना अशाच प्रकारे परशूरामच्या मेंदूतून सदर स्मृती नष्ट करण्यास भाग पाडतील.
आपण चांगले लिहू शकतो हा आत्मविश्वास असावा, पण आपण चांगले(च) लिहतो हा भ्रम असू नये. असो.पुलेशू.
7 Jul 2014 - 3:12 pm | तुमचा अभिषेक
पण तिने शहाणपणा दाखवून कुठेतरी बॅकअप घेऊन ठेवला असेल तर ..
तसेही प्रेमाचा मेंदूशी काही संबंध नसतो, ते थेट हृदयातून उमलते.
संदर्भासाठी सलमान आणि अरबाज खानबंधूंचा "हेल्लो ब्रदर" बघा.
7 Jul 2014 - 3:19 pm | बॅटमॅन
पगला गजोधर माझा येरवड्याच्या शाळेतील विद्यार्थी. आधीपासूनच मोठा कल्पक, शिवाय जे शिकवेल ते लगेच आत्मसात करणार. मी असंबद्ध आणि तुटक-तुटक शिकवत असल्याने तोही पुढे तसेच करू लागला. एकदा शाळेचे इन्स्पेक्शन सुरू असताना दिपोटींनी माझ्या वर्गाला निबंध लिहायला सांगितला, "तुम्ही सुपरमॅन असता तर". झाले, गजोधरने लगेच निबंध लिहिला सर्वंआच्या अगोदर आणि दिपोटींना दाखवला. त्यात क्रिप्टॉन आणि लेक्स ल्यूथर वगैरेंचा उल्लेख सोडून तुम्ही चड्डी कशी घट्ट बांधली असती इ. चा उहापोह पाहून दिपोटी भडकले तर त्यांना हा म्हणतो कसा, ते सगळं जाऊद्या सर, त्याच्या जागी तुम्ही असता तर काय केले असतेत? झालं मग दिपोटी आणि हेडसर दोघेही भडकले आणि माझी पुन्हा नानावाड्यात बदली केली.
-पोतदार-पावसकर म्याडम.
7 Jul 2014 - 3:39 pm | पगला गजोधर
ब्याटम्यान गुर्जी, माझे गोथ्याम मधले आवडते शिक्षक. पण ते त्यांची लुना, सॉरी, आपलं हे ते, हा. . ब्याटमोबीलवरून गोथ्यामविद्यापीठ रोड वरून फिरायचे, विद्यार्थिनींना होस्टेलपर्यंत लिफ्ट द्यायचे, वर ४००० ब्याट - डॉलर्स रोख हातावर ठेवायचे. गोथ्यामविद्यापीठात त्यांचा ब्याटमोबीलसकट पूर्णाकृती पुतळा उभारूया का गुर्जी ? असं इचारल अन गुर्जी माझ्यावर रागावले.
7 Jul 2014 - 3:42 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
नाईस ट्राय :)
7 Jul 2014 - 3:51 pm | बबन ताम्बे
सकाळ मुक्तपिठवाले पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे मिपा वर पण फेमस का?
7 Jul 2014 - 3:51 pm | बॅटमॅन
यात काय सौंशयच नाय!
10 Jul 2014 - 3:57 pm | पगला गजोधर
पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे बरोबरच, 'हागणदारीमुक्त वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणणारा बबन पण मिपा वर फेमस आहे. ;)
10 Jul 2014 - 6:12 pm | बबन ताम्बे
हो. पण तो वेगळ्या विदर्भवाला बबन मी नव्हे बरं का !
मुपि वर त्याने प्रत्येक लेखाखालील प्रतिसादात वेगळ्या विदर्भाचे तुणतुणे लावलेय. अगदी सप्तर्षींच्या मांजरा च्या लेखातदेखील "वेगळा विदर्भ झालाच पाहीजे " अशी त्याची कॉमेंट सापडेल. लोक अक्षरशः पिडले आहेत .
11 Jul 2014 - 10:09 am | पगला गजोधर
तांबेतात्या माफी करा, पण तुन्तुण्याचा पिवळटपणा करणारे डांबिस तुम्ही नाही, हे कळून बरं वाटलं.
11 Jul 2014 - 12:33 pm | बबन ताम्बे
तुम्हाला माफ केलेय :-)
बाकी तो वेगळ्या विदर्भवाला बबन वाचकांना मुद्दाम इर्रीटेट करायच्या भावनेने सतत ती एकच कॉमेंट सगळीकडे टाकत असावा. इग्नोअर करणे हेच उत्तम.