आपण सारे विक्रम (कथा: पृथ्वीचा अंत)
१५ ऑगस्ट २९४७ रोजी, वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा टायटन ग्रहाकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
पृथ्वीचा अंत १६ मार्च २२८० साली झाला. अनेक वर्षे पृथ्वीवरील खगोलशास्त्रज्ञ एका महाप्रचंड उल्केवर नजर ठेवून होते आणि ३ मैल व्यास असलेली (१९५०-डीए असे नामकरण केलेली) ही उल्का वरील दिवशी पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज होता. १९५०-डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी २२४७ रोजीपासून सतत दिसली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ जशी येऊ लागली तसे तिचा पृष्ठभाग खरवडण्याचे प्रयत्न व तिचा मार्ग बदलावा, अश्या हेतूने पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता. परंतु उल्केचे दोन तुकडे होऊन, छोटा पाचरीसारखा तुकड्याने पृथ्वीचा कपचा उडवला, मोठ्या तुकड्याने आपल्याबरोबरच चंद्रसुद्धा नष्ट केला, लहान कपच्याचा मिळालेल्या गतिज ऊर्जेमुळे, ३२ कि मी व्यासाचा, ४१२ कि मी पृथ्वीपासून दूर लघुउपग्रह झाला, आश्चर्यकारकरित्या तिथे जुन्या पृथ्वीसारखी जीवसृष्टीपोषक परिस्थिती राहिली, व त्या लघुग्रहवर त्याच्या ६ मिनिटाच्या परिभ्रमणा वेगामुळे, होणार्या सेंट्रीपीतळ ऊर्जेमुळे, गुरुत्वाकर्षणसदृश स्थिती आली. उल्केच्या धक्क्यामुळे मात्र, पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली, वनस्पती सर्वं नष्ट झाल्या तर काही प्राणी वाचले, भूगर्भातील सूक्ष्म वेगाने सरकणारे महाकाय खडक (प्लेट्स), अस्थिर होऊन ऐक विचित्र संरचना निर्माण झाली.
इतिहासचे क्लोक रिसेट झाले, २२८० पासून नवीन सिविल इतिहासच नवीन मानवास माहिती राहिला. बाकी सगळे विस्मृतीत गेलं.
लघुग्रहावर मात्र जवळ जवळ (९९.९९९ टक्के) मानवांसारखीच, पण अतिप्रगत तंत्राद्यान बाळगणाऱ्या परग्रहावरील इवांची वसाहत झाली. त्वचेचा निळसर रंग सोडला तर मानव व इवात जीवशास्त्रानुसार कोणताही फरक नव्हता, दोघांमध्ये अगदी रक्तदान ते ऑर्गनट्रान्सप्लांट काहीही करता येवू शकत होते. ते स्वतः च्या लघुगृहाला उप्सला (मातृभूमी) व पृथ्वीला अस्लुग (शुद्रभूमी) म्हणायचे. पृथ्वीवरील खनिजे मिळवणे व वसाहतीमधील rdioactive कचरा पृथ्वीवर डम्प करणे यासाठी त्यांनी शुद्र मानवांना कामावर ठेवलं होत, त्याबदल्यात मानवांना अन्न मिळे व अनेक रोबोकडून पृथ्वीवर प्रशासन ठेवण्यात येत. सन २३१४ मध्ये, अस्लुग-सेक्टर ४ मध्ये, वैमानिक कप्तान परशुराम, हा ऐक देखणा राजबिंडा अधिकारी नियुक्तीत होता, परशुराम हा ऐक बुद्धिमान, आणि धाडसी, सचोटीने कार्य सिद्धीस नेणारा अधिकारी होता, तरुण वयातच अनुभवाच्या जोरावर त्याने, ट्रान्सपोर्ट चेन ऑप्सवर प्रभुत्व मिळवून, यानातून, कमी इंधनात जास्त खनिजे वाहून नेण्याचे शास्त्र प्रकाशित केलेले असते, म्हणूनच कि काय, त्याला उप्सला-फेडरेशनकडून हायकमांडकडून सूचना मिळाली होती कि, उप्सला-फेडरेशनचे ऐक मात्तबर गोरोंग यांची कन्या, गोमेरी हिला, तिच्या ऑप्सरिसर्च च्या प्रयोगासाठी सह्हाय करावे. खरे तर गोरोंग यांचा, गोमेरीने पृथ्वी सारख्या धोकादायक ठिकाणी जाऊन रिसर्च करणे पसंत नसते, पण एकुलत्या ऐक कन्येच्या हट्टापुढे त्यांना नमते घ्यावे लागते. म्हणूनच ते तिला १० दिवसांची परवानगी देतात. पुढं व्हायचं तेच होत, तरुण गोमेरी, परशुरामवर भाळते, तोहि तिला आपले हृद्य देवून बसतो.
गोमेरी घरी गेल्यावर वडिलांना, परिस्थितीची कल्पना देते, वडील रागावतात, ते तिला म्हणतात, "पहा, तरीच मी म्हणालो होतो, हे मांस खाणारे पृथ्वीवरची लोक, डोकं गरम असतं त्यांचं, अगोदरच कळायला पाहिजे होतं तुला, त्यांनी तुला फूस लावली ..." वै. वै . ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश वडिलांनी तिच्या दादाला देतात.
इकडे पृथ्वीवर, परशुरामच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपला मुलगा उप्सला चा जावई होणार आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! परशुरामचे वडील त्रागा करत म्हणाले, सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पृथ्वीवरचे पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या पृथ्वीवरच्या माणसाशीच! अरे ती सेक्टर २ मधली शबाना आहे न, चांगली माइन सुपरवाईसर आहे, किंवा ती सेक्टर १ मधली मप्न्ग्वा आहे. हि काय अवदसा आठवली तुला. अरे मानव व इवात कधीहि संबंध जुळू शकत नाहीत जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! "
ऐके दिवशी परशुरामच्या स्क्रीनवर संदेश झळकतो, 'आज मला International Space Station ग्रगोन २१४ वर UTC-२३१५ वाजता भेटायला ये ' . . गोमेरी
एवढे बोलून वेताळ थांबला. विक्रमाने त्याचे उर्वरित उत्तर ऐकण्यासाठी कान टवकारले. वेताळ पुढे म्हणाला, "राजन् ! तू मौन बाळगलंस. त्याबरोबर मी तुला हि गोष्ट सांगून शेवटी कूट प्रश्न विचारत आहे आणि उत्तरांचे पर्याय देत आहे, उत्तर येत असूनही गप्प राहिलास तर तुझ्या डोक्याची हजारो शकले होतील.
बरोबर उत्तर दिलेस तर १० करोडचा मी साईन करून इथे ठेवलेला चेक तुझा होईल"
१. गोमेरी चा भाऊ, परशुरामाला ग्रगोन २१४, फसवून बोलावेल, मित्रांच्या सह्हायाने त्याला हालहाल करून, International Space Station गळफास लाऊन लटकावेल
२. इवांची कोर-कमिटी दोघांनाही मृत्युदंड फर्मावेल, (प्लानेटच्या रीतीबाहेर जाऊन वर्तन केल्याबद्दल ) , व परशुरामाच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल
३. परशुराम-गोमेरी आकाशगंगे बाहेर पळून जाऊन लग्न करतील, इवांची कोर-कमिटी , गोमेरीच्या भावाला , त्या दोघांना शोधून, इवांची प्रतिष्ठा कमी केल्याबद्दल शासन करायला सांगतील
४. कथेतील नातेवाईक व समाज आपण २३ व्या शतकात जगात असून , त्यानुसार वर्तन करतील.
काही प्रतिक्रिया व्यक्त न करता विक्रमादित्य तसाच विचार करत राहिला, आणि उत्तरला …
वाचने
18611
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
दुरुस्ती
१९५०-डीए ही उल्का प्रथम २३
In reply to १९५०-डीए ही उल्का प्रथम २३ by काळा पहाड
ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल हा अंदाज impact vel बाबत
जमलं नाही.
In reply to जमलं नाही. by भृशुंडी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
कथा वाचून तिचे नाव "आपण सारे
ऑ?
13689 वाचने
In reply to 13689 वाचने by तुमचा अभिषेक
13689 वाचने... ७ प्रतिसाद ???
13689 वाचने... ७ प्रतिसाद ???ती उल्का मिपाच्या काउंटरवर आदळण्याने झालेला परिणाम असावा !In reply to 13689 वाचने... ७ प्रतिसाद ??? by डॉ सुहास म्हात्रे
नाही....
In reply to नाही.... by चौकटराजा
नाय हो राजे
In reply to 13689 वाचने by तुमचा अभिषेक
तुम्ही या कथेतील विक्रमाच्या जागी असता, तर कोणता पर्याय निवडला ?
पर्याय ४
सन २३१४ म्हणजे २४ वे शतक २३
In reply to सन २३१४ म्हणजे २४ वे शतक २३ by मराठी कथालेखक
गोमेरी च्या मेंदूंतून
पगला गजोधर माझा येरवड्याच्या
ब्याटम्यान गुर्जी, माझे गोथ्याम मधले आवडते शिक्षक.
In reply to ब्याटम्यान गुर्जी, माझे गोथ्याम मधले आवडते शिक्षक. by पगला गजोधर
हा हा हा नाईस ट्राय
In reply to हा हा हा नाईस ट्राय by बॅटमॅन
पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे....
In reply to पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे.... by बबन ताम्बे
म्हंजे???????
In reply to पो.पा. मॅडम, लुनावाले ब्रम्हे.... by बबन ताम्बे
बबन पण मिपा वर फेमस आहे
In reply to बबन पण मिपा वर फेमस आहे by पगला गजोधर
बबन पण मिपा वर फेमस ....
तांबेतात्या माफी करा
In reply to तांबेतात्या माफी करा by पगला गजोधर
इट्स ओके.