रेडीओ
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घरा