डोंबिवली कट्टा वृत्तांत
कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले.
साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.