आजकाल...
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो.